Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva
Showing posts with label Our culture and festivals. Show all posts
Showing posts with label Our culture and festivals. Show all posts

"Dhikkar" - Book by Sampat Thanakar

धिक्कार.......आदिवासी मने पायदळी तुडविणारांचा धिक्कार....परकीय शक्तींचा धिक्कार
____________________________________________________

आदिवासी संस्कृतीवर होणा-या अन्यायाला वाचा फोडणारे श्री संपत ठाणकर यांच्या 'धिक्कार' या पुस्तकाविषयी थोडक्यात.....

-------------------------------------------------------------------------
धर्म शब्दाच्या अनेक व्याख्या आहेत. त्यातील अत्यंत सोपी व्याख्या मी आपणास सांगतो,
‘’धारण करण्याचा मार्ग म्हणजे धर्म होय.’’
इथे संस्कृती धारण करण्याचा अर्थ अभिप्रेत आहे.
जगात आज विविध धर्म आपापल्या तत्त्वांनुसार अस्तित्वात आहेत. यात हिंदू, मुसलमान, बौध्द, ख्रिश्चन आदी धर्म आपापले विचार व्यक्त करत आहेत. सर्व धर्मांची नावे वेगवेगळी असली....किंवा या धर्मांचे प्रेषित वेगवेगळे असले तरी मानवाचे कल्याण साधण्याचा विचार सर्वांमधून मांडला जातो. परंतु आज धर्माच्या नावाखाली काही तथाकथित धर्मगुरु आपली पोळी भाजत असल्याचे चित्र आपणास पाहावयास मिळत आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्येचा असणारा हा धर्म आज आदिवासींच्या मुळावर उठला आहे.....दिव्याखाली अंधार वाढत आहे.......आणि त्याचा सर्वाधिक तोटा आदिवासी समाजाला बसत आहे. आदिवासी माणूस हा स्वताचा निसर्ग धर्म जपण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. परंतु हिंदू धर्मीय लोकांशी अधिक जवळीक आल्याने कायद्याच्या चौकडीत अनपेक्षितपणे हिंदू नावाच्या लेबलखाली आदिवासींचा समावेश करण्यात आला. परंतु असो....आजही आदिवासी हि स्वतंत्र ओळख सिध्द करण्यासाठी आदिवासींची महान संस्कृती जपली जात आहे.
परंतु अलीकडच्या काही वर्षात तलासरी, डहाणू या भागात ख्रिस्ती मिशन-यांनी आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेवून त्या भागात आपले ख्रिस्ती धर्म प्रसाराचे कार्य सुरु केले. येशु ख्रिस्त यांनी खरच समाजाला अतिशय चांगला मार्ग या धर्मातून सांगितला आहे. परंतु या भागात धर्मगुरू म्हणून काम करणा-या थोतांड लोकांनी बायबलचे विचार गुंडाळून ठेवून आपले विकृत विचार आदिवासी लोकांमध्ये पेरायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात शिक्षण, दवाखाने आदींच्या माध्यमातून सुरु झालेले कार्य नंतर चर्चच्या माध्यमातून अधिक विस्तारले. एवढेच नाही तर भारत सरकार कडून आलेल्या निधीवर चालणा-या ख्रिस्ती मिशनरीन्च्या या भागातील शाळा चक्क फक्त ख्रिस्ती धर्म प्रसाराचे काम करत आहेत....नव्हे नव्हे आदिवासी समाजाच्या अस्तित्वावर खूप मोठा घाला घालत आहेत.
तलासरी, डहाणू भागातील आदिवासींची सारी दैवते नासविण्याचे काम अतिशय नियोजनबध्द केले जात आहे. आदिवासी विचारांमध्ये परकीय विचारांचे विष कालवले जात आहे. धर्मगुरूंची घरे दारूचे अड्डे बनत आहेत. यातून आदिवासी माणूस वेगळ्या वळणाला जात आहे. चुकीच्या प्रबोधनाच्या सहाय्याने आदिवासी स्त्रियांना नासवले जात आहे. आदिवासींना चर्चमध्ये बोलावून आळशी, उद्धट, रागीट बनविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आदिवासी धर्माची पायमल्ली करून येथील आदिवासींचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचे कटकारस्थान आपल्या लेखणीतून स्पष्ट आणि परखडपणे मांडण्याचे काम संपत ठाणकर यांनी आपल्या ‘धिक्कार’ पुस्तकातून केले आहे.
पुस्तकातील अनेक संदर्भ स्वतः लेखकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत...आदिवासी मनात चीड आणणारे असेच काही अनुभव यात त्यांनी मांडलेले आहेत. वसई येथील फादर आदिवासी तरुण, कोवळ्या मनाला मोहिनी घालून मुलींबरोबर लैंगिक संभोग करून कशा आदिवासी कळ्या आपल्या क्रूर हातांनी धर्माच्या नावाखाली कुस्कारत आहेत याचे वर्णन तर राग आणणारे असेच आहे. येथील स्थानिक ग्रामपन्चायत कशी या लोकांची गुलाम बनवून नागवली जात आहे याचे वास्तव चित्रण आदिवासी भविष्य किती विकृत असेल याचा धोका आपणास दाखविते.
आदिवासी समाजाचे लचके तोडणा-या या परकीय शक्तींविरोधात जर आपण आज आवाज उठविला नाही...तर उद्या या परकीय शक्ती नक्कीच आपल्या आदिवासीपणाला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून आपल्यामध्ये जागृतीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी वारली प्रकाशन, जीतगाव यांनी प्रकाशित केलेले संपत ठाणकर लिखित ‘धिक्कार’ हे पुस्तक नक्की वाचा. हे फक्त पुस्तक नसून या भावना आहेत. नक्कीच या आपल्या मनाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाहीत. या पुस्तकाच्या लेखनामुळे या आदिवासी लेखकाच्या जीवाला धोका निर्माण होवूनही त्यांनी पुढाकार घेवून न डगमगता हा विचार आपल्या पर्यंत पोहचविण्याचे महत्तम कार्य केले आहे. आपल्या वाचनाने लेखकाच्या कार्याला बळकटी मिळणार आहे.
पुस्तकाची किंमत ५० रुपये असून आपण सदर पुस्तकाच्या खरेदीसाठी लेखक श्री संपत देवजी ठाणकर, मु.जीतगाव, पो.दापचरी, ता. डहाणू, जि.ठाणे, पिन-४०१६१० या पत्त्यावर संपर्क साधून घेवू शकता.
या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी भाषेतील कठीण अलंकारिक शब्दप्रयोग टाळून आदिवासी वारली बोलीभाषेचा व सरळ साध्या मराठी भाषेचा वापर केला आहे. यातून आदिवासी समाजाच्या अन्यायाची दाद मागण्यासाठी नव्या दिशेने वाटचाल सुरु होत आहे....
संपत ठाणकर यांचे विचार फक्त पुस्तकात कैद राहावेत असे नक्कीच नाहीत....आदिवासी समाजाचे भले जोपासणारांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे....या विचारांच्या प्रसारातून आदिवासी मने जोडली जावून क्रांतीची मशाल आग बनून प्रज्ज्वलित झाली पाहिजे अशी अपेक्षा......!!!
आदिवासी समाजापुढे अस्तित्वाची लढाई!
ठाणे ग्रामीण परिसरात पारंपारीक आदिवासी संस्कृतिक ओळख पाश्चिमात्य शक्तींकडून नियोजितपणे मिटवली जात आहे
आदिवासी लेखक, अभ्यासक यांच्या लेखणीतून
धिक्कार
संस्कृती संकट ओळखण्या साठी जरूर वाचा !
लेखक :
संपत देवजी ठानकर
9975670275

Tarpa Mahotsav 2013 @ Dahanu - Sanchita Satvi

तारपा नृत्य ,बोहाडा ,गौरी नृत्य ,ढोल तसेच डांगी नृत्य अशा विविध भागातील आदिवासी नृत्यांचा थरार!… वारली चित्रकलेने सजलेली दुकाने,आदिवासीच्या साध्या परंतु समाधानी स्वावलंबी राहणीमानाची साक्ष देणारी शेणामातीने सारवलेली झोपडी !तांदळाचे लाडू,पापड्या,सावेली,नाचणीची भाकरी तसेच कोहळ्याची भाजी यांचा सुटलेला घमघमाट! प्रचंड संख्येने उलटलेला जनसागर आणि या सर्व ऐतिहासिक क्षणाची साक्षठेवणारा डहाणूचा नयनरम्य समुद्र किनारा!
                    हे दृश्य होते डहाणू बीच ,पारनाका येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय (दि . २१डिसें २०१३ ते २३ डिसें  २०१३ ) तारपा महोत्सवाचे !
                 प्रस्तुत स्थळी जेव्हा प्रवेश केला तेव्हा प्रथम तर डोळ्यांवरती विश्वासच बसेना ,कारण हजारोंच्या  संख्येने लोटलेला जनसागर आणि त्यात घुमणारा ताराप्याचा सुर…! हे दृश्य निदान मी  तरी पहिल्यादांच पाहत होते . शाळकरी मुलांपासून ते क्लास १ ऑफिसर पर्यंत आणि शेंबड्या पोरांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कुणीही स्वताला या महोत्सवात सामील होण्यापासून रोखु शकले नव्हते .
                मग आमची आयुशची टीम पण मागे कशी राहणार … ?आदिवासी युवा शक्ती - आयुश ची टीम महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सकाळीच मोठ्या उत्साहाने प्रस्तुत स्थळी हजार झाले ,मग वारली चित्रकलेची दुकाने सजवण्यापासून ते 'वारली आर्ट सेशन ' मध्ये भाग घेण्यापर्यंत टीमचा उत्साह ओसंडून वाहत होता . या वेळेत आपल्या वारली तरुण चित्रकारांनी एक नवीन ट्रेंड सुरु केला तो म्हणजे taoo गोंदवून देण्याचा! शरीरावर tatoo गोंदवणे काही नवीन नसले तरी ,या tatoo मध्ये वारली चित्रकलेतील चिन्हांचा वापर करून नवीन fashion चा शुभारंभ आमच्या वारली कलाकारांनी केला . आणि त्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .
              या महोत्सवात आयुश टीमच्या सर्व वारली चित्रकारांनी आपापली चित्रकला व हस्तकलांचे प्रदर्शन भरवले होते ,हस्तकला वस्तू ,वारली चित्रकला ,बांबू आर्ट यासारख्या इविध वस्तू या प्रदर्शनात विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या. आमच्या या दुकानांना या तीन दिवसात  हजारोंच्या संख्येने आलेल्या सर्व पर्यटकांनी तसेच बऱ्याच विदेशी पर्यटकांनी सुद्धा भेटी दिल्या . पर्यटकांची वारली चित्रकलेबद्दलची उत्सुकता व पसंती हि खरेच वाखाणण्याजोगी होती ,प्रत्यक्ष पेंटीग शिवाय विविध वस्तूंवर वारली कला साकारलेल्या वस्तूंकडे स्त्री वर्गाचा  कल जास्त दिसून येत होता . यामध्ये शोभेच्या वस्तू ,दागिने तसेच कपड्यांवर केलेल्या वारली कलेला खूप मागणी असल्याचे दिसून आले ,हि आपल्या कलाकारांसाठी खूप महत्वाची बाब आहे . आमच्या कलाकारांनी आलेल्या पर्यटकांना कलेबद्दलची माहिती व योग्य मार्गदर्शन करून आदिवासी कलेचा प्रसार करण्याचे उत्तम कार्य केले . .
             खरे पाहता ते तीन दिवस आम्ही खऱ्या अर्थाने 'आदिवासी 'म्हणून जगलो ,तारपा नृत्यावर मनसोक्त ठेका धरून नाचण्याचा मोह तर आम्ही कसाबसा आवरला ,परंतु मन मात्र 'भिंदोडत … भिंदोडत… 'करतच होते .
             तीनही दिवस आपल्या आदिवासी स्त्रियांनी बनवलेल्या अस्सल 'tribal food ' पुढे आजचे पिझ्झा बर्गरही कस्पटासमान वाटू लागले आहेत ,विविध भागातून आलेल्या आपल्या आदिवासी बंधुभागीनींनी सादर केलेली नृत्ये व त्यातील थरारक कसरती पाहून तर एखादा action पटसुद्धा फिक्का वाटावा !सर्व वातावरणाच जणू 'आदिवासिमय' झाले होते.  कधी नव्हे तेव्हडा उत्साह व अभिमान आदिवासींच्या डोळ्यात अवतरला होता .
              संपुर्ण जगाला आदर्श घालून देणारी व साधी परंतु स्वावलंबन शिकवणारी आदिवासी संस्कृती प्रत्यक्ष अनुभवली व आदिवासी असण्याचा अभिमान डोळ्यात अवतरला ,कारण तसे आपल्यासारख्या सुशिक्षित आणि स्वतःला mordenसमजणाऱ्या आदिवासी जनतेला हे सर्व नवीनच ,नाही का …?
              परंतु मोठ्या प्रमाणावर एकत्र जमलेल्या आदिवासी तरुणाईने घेतलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहुन आपली संस्कृती नक्कीच जपली जाईल ,अशी अशा वाटू लागली आहे .
      एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या सौजन्याने आयोजित या तारपा महोत्सवाचे हे प्रथम वर्ष !डहाणू परिसरात आदिवासी भागात पर्यटनाचा विकास व्हावा,व आदिवासी संस्कृतीची ओळख सर्व दहानुकारांना व्हावी हा या मागचा उद्देश ! 
      एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे तत्कालीन प्रकल्पाधिकारी मा. श्री. शैलेश नवाल यांच्या सुंदर कल्पनेतून साकारलेल्या या तारपा महोत्सवामुळे डहाणू परिसरात पर्यटनाचा विकास होण्यास नक्की हातभार लागेल . 
       खरेतर आम्हाला आमचीच संस्कृती अनुभवायला महोत्सवात जावे लागतेय हीच मोठी खेदाची बाब आहे . कारण आपली संस्कृती हि आपल्या दैनंदिन जीवनातुन प्रकट होत असते ,ती आपण रोज जगायला व अनुभवायला हवी ,त्यासाठी चतुर्थी व एकादशीची गरज नसते.  असे असूनही आपल्या उत्सवाचे प्रतिक समजल्या जाणारा  'तारपा नृत्य 'पाहायला आज आपल्याला u tube वर सर्च करावे लागत आहे . 

      हि परिस्थिती आपल्यासारख्या शिक्षित पिढीमुळेच  निर्माण झाली आहे . आपल्या पूर्वजांनी जपलेला सांस्कृतिक वारसा जपण्यास व तो आपल्या पुढच्या पिढीला देण्यास आपण असमर्थ ठरलो आहोत,कारण आधुनिकीकरणाच्या नावाखाली व सांस्कृतिक मुल्यांची ओळख न करून घेता ,आपण भलतीकडेच भरकटू लागलो आहोत , व यामुळेच आपल्याला आपलीच संस्कृती तुच्छ वाटू लागली आहे .
     परंतु हीच महान संस्कृती अभ्यासायला जेव्हा पांढरपेशी व विदेशी लोक येतात,तेव्हा मात्र आम्हा सुशिक्षितांना (?) प्रश्न पडतो कि, "ज्या संस्कृतीचा आदर्श आज जगात घालून दिला जातोय ती संस्कृती नाकारणारे आम्ही  खरेच सुशिक्षित आहोत का… ? हा प्रश्न पडू लागला आहे. 
         म्हणता म्हणता ते तीन दिवस संपलेही ,आणि हा तारपा महोत्सव आम्हा शिकलेल्यांना खूप काही शिकवून गेला 
    कल्पना प्रत्यक्षात कशा उतरवता येतील यांचे उत्तम उदाहरण मा. श्री. नवाल यांनी घालून दिले. त्यांच्या या कार्याबद्दल आयुषच्या संपूर्ण टीमतर्फे अभिनंदन व खूप खूप आभार !
                    हा महोत्सव असाच चालू राहावा, असे वाटत असतानाच नाईलाजाने त्याला निरोप द्यावा लागला.परंतु येणाऱ्या तारपा महोत्सवाची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय ,निदान या निमित्ताने तरी समाजापासुन भरकटत चाललेल्यांना 'आदिवासी 'असण्याचे महत्व कळेल !

Sanchita Satvi 

आपल्या सर्वांमध्ये या न त्या रूपाने 'बिरसा' आहेत

आज भगवान बिरसा मुंडा यांची १३८वि जयंती सर्व आदिवासी बांधव दिमाखात साजरे करतील,बिरसा मुंडा यांच्या महान कार्याला सलाम करत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील,भाषणे देण्यात येतील दिवसा अखेर सर्व जन आपल्या मनात बिरसांना वंदन करत पुढची जयंती कशी साजरी करावी हे ठरवतील …? करणारच!...  का नाही कारण बिरसा मुंडा हे नावच आपल्या समाजासाठी इतके प्रेरणादायी आहे,मग त्यांची जयंती आपण नाय साजरी करणार तर कोण करणार …?
 आज प्रत्येक आदिवासी तरुण फेसबुक सारख्या माध्यमातून आपल्या मनात 'भगवान बिरसा मुंडा' यांना नमन करताना बघून खूप अभिमान वाटतोय ,आपल्या तरुणात पसरत असलेली हि जागरुकता खरेच समाजाच्या दृष्टीने हितावह आहे.
        भगवान बिरसा मुंडा हे आदिवासींच्या अधिकारांसाठी स्वाभिमानासाठी लढले अमर झाले,मातृभूमीच्या रक्षणासाठी ते झटले. समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी शस्त्र हाती घेतले.
        आज आपण स्वतंत्र असूनही गुलामासारखे वागवले जातोय,हे पाहून बिरासांनी पुन्हा अवतरावे असे वाटते,परंतु आपल्या एक लक्षात येतेय का कि आपल्यात 'बिरसा' आजही जिवंत आहेत, त्यांच्या विचारांच्या रुपात! आदिवासी समाजासाठी खऱ्या मनाने झटणारा प्रत्येक जण  'बिरसा' आहे . आदिवासींसाठी जागृती करणारा प्रसंगी मोर्चे बांधणी करून पोलिसांचा मार खाणारा,तर ज्ञान रुपी शस्र हाती घेवून कायद्याने आदिवासींसाठी लढणाराही बिरसाच आहे !
       इतकेच काय आपल्या सर्वांमध्ये या त्या रूपाने 'बिरसा' आहेत फक्त त्यांना ओळखणे आपल्यात लपलेल्या या 'बिरसा' रुपी विचारांना कृतीत उतरवण्याची गरज आहे . केवळ आजच्याच दिवशी नाही, तर रोजच बिरासांचे नमन करुयात  ,त्यांच्या विचारांचे अवलोकन रोजच केले तर ती त्यांना खरी सलामी असेल.
        आपल्या तरुण पिढीला बाकीचा इतिहास तोंडपाठ असतो परंतु आपल्या आदिवासी विरांबद्दल फारशी माहिती नसते,आपण शिकलेल्यांनी पुढे येवून जर हा इतिहास पुढे आणला तर, आपल्या आदिवासी वीरांच्या महान कार्याला सलामी ठरेल   येणाऱ्या पिढीला हा ज्ञानकोश उपलब्ध करून देउ  शकतात . केवळ बिरसाच नाही तर असे अनेक क्रांतिवीर होऊन गेले,जे आपल्या समाजासाठी झटले ,त्यांचा इतिहास आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.
       केवळ आजच्या दिवशी बिरसांच्या कार्याला सलामी करण्यापेक्षा बिरसांच्या विचारांना कृतीत उतरवून त्यांना रोजच सलामी देउयात. बिरासांची आज आपल्या समाजाला खरेच गरज असताना आपल्यातील प्रत्येक जण जर 'बिरसा' झाला तर खरोखरच 'उलगुलान' होईल! आणि 'आपण सुरु केलेल्या उलगुलान चा कधीच अंत होणार नाही' हा बिरसांचा विश्वास सार्थकी लागेल. यासाठी प्रत्येकाने शस्र घेवून मैदानात उतरणे शक्य नसले, तरी जे आपणाकडून शक्य होईल ते आपल्या समाजासाठी करणे गरजेचे आहे .
     भगवान बिरसा मुंडा हे आपले नायक आहेत,आज या नायकाला त्यांच्या १३८ व्या जयंती निमित्त नमन करून आपल्या समाजासाठी बिरसांसारखे कार्य करण्याचा प्रण करूयात !


-    संचिता सातवी

आदिवासी विकासाचा दृष्टीकोन

"सर्वसाधारणपणे आदिवासींचे जीवन, यांचा पूर्वेतिहास व संस्कृती यांच्या अभ्यासाची क्षेत्रे अत्यंत व्यापक आहेत. पण त्यामानाने अभ्यासाची साधने फारच मर्यादित आहेत. महाराष्ट्रातील आदिवासींच्या बाबतीत तर ही उणीव प्रकर्षाने जाणवते. केवळ ज्ञानमींमासा तृप्त करण्यासाठी नव्हे तर आदिवासी लोकांसंबंधीच्या प्रत्यक्ष माहितीच्या आधारे त्यांचा नियोजनपूर्वक विकास घडवून आणण्यासाठी व पुढील अभ्यासाला उत्तेजन देण्याच्या हेतूने आदिवासी लोकांचे जीवन, इतिहास व संस्कृती यासंबंधी अधिकाधिक उपयुक्त व भरीव माहिती मिळविणे गरजेचे आहे. तसेच उपलब्ध असणारी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे."

आदिवासी समाजाचा इतिहास गौरवशाली आहे असे आपण नेहमी म्हणतो. हे सत्य आहे...परंतु आजच्या तरुणपिढीला जर या गौरवशाली इतिहासाची जाणीव किंवा माहिती नसेल तर आपल्या जनजागृतीच्या कार्यात भविष्यात अनेक अडचणी येवू शकतात. म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या जमातींची माहिती, आपल्या क्रांतीकारकांची माहिती पोहोचणे गरजेचे आहे. यातून समाज अधिक बळकट करण्यास मदत मिळेल. म्हणून सर्वांनी आपल्याकडे असणारी माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे अत्यंत महत्वाचे आहे.

- Rajoo Thokal

International Day of the World's Indigenous Peoples


(Langauge English)




(Langauge Marathi)



Share VDO with your friends

1) Marathi VDO : http://youtu.be/jAK48O8QI44 
2) English VDO : http://youtu.be/kGF8HfXp5ag 


आदिवासींच्या विकासातील प्रगत आदिवासींची भूमिका


आदिवासींच्या विकासातील प्रगत आदिवासींची भूमिका

जंगलातील फळे, फुले, कंदमुळे आणि शिकार यावर आपली उपजीविका भागवणारा आदिवासी समाज काही प्रमाणात चाकोरीच्या बाहेर जाऊन आपले जीवन जगू लागला आहे.त्याचेच एक उदाहरण म्हणजे आज आदिवासी समाज आणि संस्कृतीचे दर्शन जगाला करून देण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. अनेक पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे, इत्यादींमधून अनेकवेळा वेगवेगळे लेख, कविता छापून येतात. त्यातच भर म्हणजे फेसबुकवर सुद्धा आदिवासी संस्कृतीशी निगडीत अनेक ग्रुप आहेत.

देशाच्या एकूण लोकसंखेच्या ८.२ % असलेला हा आदिवासी समाज एका संपन्न लोकपरंपरेचा एक भाग आहे. परंतु इंग्रजांच्या आगमनानंतर आदिवासी जमातींच्या स्वायत्त, संपन्न आणि स्वच्छंद जगण्यावर अनेक बंधने आली. स्वातंत्र्यानंतर गोर्या साहेबांच्या जागी आलेल्या देशी साहेबांनीसुद्धा आदिवासिंचे जगणे असह्य केले. परिणामी आज १० कोटींहून अधिक असलेले आदिवासी आपले स्वत्व हरवून बसले आहेत.

आधुनिकीकारानाच्या, प्रगतीच्या आणि जागतीकरनाच्या नावाखाली आजचा समाज आदिवासिंचा मूळ धर्म, संस्कृती, कला, नृत्य, वाद्य, औषधोपचार अशा सर्व मौलिक गोष्टींचा त्याग करत आहोत. मूळ आदिवासींना प्रगतीचा पुढचा टप्पा म्हणजे पांढरपेशा वर्गासारखे जीवन जगणे असे वाटते, तर अन्य समाजाला या हरवत चाललेल्या आदिवासिपणाची पर्वा नाही असे चित्र आज देशातील सर्वच आदिवासीबहुल भागात दिसतेय. देशभर विखुरलेल्या आदिवासी जमातींमध्ये होत असलेल्या या सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतराचे परिणाम भयंकर आहेत.

आदिवासींचा विकास करताना त्यांचे आदिवासीपण जपण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. अन्यथा न्यूझीलंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, व अमेरिकेतील आदिवासी जसे म्युझियममध्येच पाहायला मिळतात, तशी अवस्था आपल्याकडेही होईल कि काय अशी भीती वाटते.

आज प्रगत आदिवासी बांधवांनी आपल्या आदिवासी लोकांना प्रेम, सम्मान, सहानुभूती, शिक्षण, मार्गदर्शन दिले केले पाहिजे. या आपल्या समाज बांधवांना आपले प्रेम, सम्मान, सहानुभूती, शिक्षण, मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. जर आपण त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले तर ते खूपच आनंदी होतील. जर अशी मानाशिकाता देशातील १० करोड आदिवासींची निर्माण झाली तर हजारो वर्षापूर्वीचा सुवर्णकाळ पुन्हा यायला उशीर होणार नाही.

Happy shimaga & holi!

आपल्या भारतात सणांना अनन्यसाधारण महत्व आहे. भारताच्या सर्वच प्रदेशात सणांचे आगळेवेगळे वैशिष्टपुर्ण रुप आपणांस पहावयास मिळते.प्रत्येक प्रदेशाच्या चालीरीती,भाषा,तेथील संस्कृती यांनुसार सण साजरे करण्याच्या पद्धतीही भिन्न भिन्न आहेत.
आपल्या येथील सणांच्या मांदीयाळीतील एक वैशिष्टपुर्ण सण म्ह्णजे "होळी".
हा सण फार पुर्वीपासूनच मोठया आनंदात अनं उत्साहाने साजरा केला जातो.ग्रामीण भागात तर ह्या सणाला मोठया उत्सवाप्रमाणे साजरा करतात. ग्रामीण भागात तर "एक गाव एक होळी" अशीच प्रथा आजपण आहे. होळी पेटविण्याच्या निमित्ताने सर्व गावाने एकत्र यावे हा यामागचा मुख्य हेतु.होळीची एक मजेशीर गंमत आहे बघा! इतर सणांना आपण मंगलमय वातावरण तयार करत असतो पण या सणाला चक्क होळीच्या भोवती फ़िरुन सर्वजण बोंब मारत असतात. हे करण्यामागचा एकच उद्देश की होळी हा सण समाजातील वाईट प्रवृत्ती आणि दुर्गुंण नाश करण्यासाठी असतो. अमंगल ते जाळायचं आणि अनिष्ट अशा गोष्टींच्या नावानं बोंब ठोकायची.
आदिवासी संस्कृतीत तर हा सण अगदी छानश्या पद्धतीने साजरा केला जातो.लहान होळी आणि मोठी होळी अश्या दोन टप्यात हा सण साजरा केला जातो. लहान होळीच्या दिवशी पाड्यातली लहान मुले एकत्र येऊन लहान लहान सुकलेली लाकडे गोळा करून लहानशी होळी करून तिच्याभोवती नाचतात. म्हणूनच बहुतेक याला लहान होळी असे म्हणतात. ह्या दिवशी तांदळाच्या पापड्या करतात अनं उन्हात सुकत घालतात. नंतर त्या पापड्या घरात ठेवल्या जातात.लहान होळीच्या आदल्या दिवशी घरातले सगळेजण एकत्र बसून आंबा खातात, याला आंबा खाणे असे म्हणतात, या नंतर सगळे जण औपचारिकतेने आंबा खायला सुरवात करतात. दुसऱ्या दिवशी मोठ्या होळीला गावातील सगळी माणसे वाळलेली लाकडे गोळा करतात.गावातील सगळी माणसे एकत्र जमल्यानंतर पूजेला सुरवात होते, होळीची पुजा गावातील भगतांकडून केली जाते. गावकरी घरी बनविलेले तांदळाचे पापड नैवद्य म्हणुन घेऊन येतात. पूजा झाल्यावर होळीला अग्नी दिला जातो. असे मानले जाते की वाईट प्रथा आणि वाईट सवयींचे होळीत दहन केले जाते.
अजुन एक छानशी रीत ह्या सणाच्या निमित्ताने असते ती अशी की ह्या वर्षी नवीन लग्न झालेले दांम्पत्य होळी भोवती प्रदक्षिणा घालुन नाचतात. होळीच्या सुरवातीस अर्पण केलेले नारळ अग्नी मुळे भाजून बाहेर येतात, ते गरम नारळ प्रसाद म्हणून वाटले जातात. पारंपारीक गाणी म्हटली जातात. आणि त्यानंतर सगळे जण आपल्या घरी परतून पापड्या टाळायला सुरवात करतात. होळीच्या दिवशी तयार केलेल्या पापड्यांना ह्या दिवशी विशेष महत्व असते त्यामुळे प्रत्येक घरात त्या बनविल्या जातात, इतर ठिकाणी धिंडऱ्या, भाकरी इत्यादी बनविले जाते. लहान होळीच्या दिवशी शिमगा खेळला जातो, एकमेकांच्या अंगावर पाणी/भेंडीचा रंग लावला जातो. त्या दिवशी गावातील काही लोक सोंग घेऊन, वेग वेगळे रूप घेऊन, नाच करून पोसत / फगवा गोळा करतात आणि त्यानंतर एकत्र बसून मेजवानी केली जाते. शिमग्याच्या दिवशी अशी प्रथा आहे की शेजाऱ्यांची एखादी वस्तू लपवायची, प्राथमिकता कोंबडा लपवण्यास दिला जातो, म्हणून ह्या लहान होळीला ’कोंबड होळी’ असेही म्हटले जाते. लहान मुलांना विविध नाच आणि सोंगकरण्या साठी एक प्रकारची पर्वणीच असते.
आपल्याकडे होळीला उत्तरभारतासारखे रंग खेळले जात नाहीत. त्याऎवजी धुळवड(धुलिवंदन) आणि रंगपंचमीला रंग खेळले जातात. रंगपंचमीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जीवनातले वाईट रंग झटकून देवून नवीन उमेदीच्या रंगाने रंगून जावे तसेच एकमेकांमधील व्देषाचा रंग घालवून परत एकदा एकमेकांना प्रेमाच्या, आपुलकीच्या,मैत्रीच्या रंगात रंगवावे हाच या मागचा उद्देश.
आपलॆ हॆ पुर्वापार चालत आलेले सण,उत्सव प्रत्येक सणांमागील विविधपद्दती आपण जपल्या पाहिजेत.आधुनिकीकरणाच्या या युगात आपल्या उत्सवांचा तोच थाट, तीच शैली आपण जपली पाहिजे. अनं हे उत्सव किती मंगलमय वातावरणात सर्वांच्या सोबतीने आपण साजरे करु यांकडे लक्ष पुरविले पाहिजे.
पण हे सर्व करत असतांना काही महत्वाच्या बाबींकडॆ ही आपण लक्ष दिले पाहिजे. जसे की,होळीच्या निमित्ताने दरवर्षी बेसुमार वृक्षतोड केली जाते. आपल्या काही क्षणांच्या आनंदासाठी कितीतरी वृक्षांचा आपण बळी देत असतो ही वृक्षतोड थांबवून आपण होळीसाठी वाळ्लेली लाकडॆ वापरली पाहिजॆत.’एक गाव एक होळी’ यांसारख्या संकल्पना रुजविल्या पाहिजेत.जेणेकरुन एकाच गावात अनेक होळ्या साजऱ्या करतांना वापरली जाणारे लाकडे वाचतील.धुळवड(धुलिवंदन),रंगपंचमी ह्यासारख्या सणांना रंग खेळायला हरकत नाही पण रंगामुळे डोळे,कान,नाक यांना अपाय होत असेल तर तो रंगांचा बेरंग नाही का?रंगातल्या रसायनांमुळे डोळ्यांना इजा होऊ शकते क्वचित अंधत्व येऊ शकतं त्वचेचा आजारही जडू शकतो.हे सर्व टाळण्यासाठी कृत्रिम रंगाऎवजी नैसर्गिक रंग वापरले पाहिजेत.

आपण जर अशाच काही छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या तर आपल्या आनंदाला कुठेही गालबोट लागणार नाही आणि आपण आपले सणवार अशाच मोठ्या उत्सहात, दिमाखात साजरे करु शकू. अश्याच आनंदमय अन मांगल्यमय वातावरणात यंदाची होळी इकोफ़्रेन्ड्ली साजरी करण्यासाठी आम्ही आयुशच्या वतीने प्रयत्न करत आहोत.
मग देणार ना साथ?
अधिक माहितीसाठी संपर्क साधा. ayush@adiyuva.in
AYUSH let us do it together – www.do.adiyuva.in

Our culture & festivals




We are here to preserve our culture. As current life style & many people’s are relocated in different cities our traditional things are slowly vanishing. We will be sharing the our “paramparik chali riti” so new generation can easily understand about our culture.
Also according to current life style & to suite our young generation life style we propose few changes ensuring “to preserve our culture long life, instead vanishing it by outdated methods”. Hope this will help us to give new look & long life even in cities to our tribal culture.

As cultural activities will be differ by localities. Initially we will be share information about all localities starting from Dahanu from thane district. So requesting you to send information about cultural activities in your area. So commonly we can know tribal culture.

AYUSH culture team crations

Birsa Munda Jayanti

पितर बारस




पितर बारस
पितर बारस हा उत्सव भाद्रपद काळोखि बारसिला होत असतो. हा उत्सव कौटुम्बिक कुलदेवतन्च्या वार्षिक पुजनाचा दिवस समजला जातो. ठाणे जिल्ह्यातिल डहणु तालुक्यातिल महालक्ष्मि मन्दिरातिल अदिवसि समाजाचे पुजारि देवस्थानावर बारषिच्या दिवशि फडाचि देवि, हिमाई, भराडि, बसेरा ह्या देविच्या पुजा स्थानिक सातवी कुटुम्बातिल लोक करित असतात. सम्पुर्ण ठाणे जिल्ह्यातुन आदिवसि लोक तारपि घेउन येतात आणि रात्रभर देवळाच्या चारहि बाजुला तारपा नाचाचि पेरणे (फेरे) धरतात. रात्रभर स्त्रि पुरुष तारपा नाच नाचत असतात. पितर बरसि हा सर्वजनिक उत्सव आदिवसि व बिगर आदिवसि लाखोन्च्या सन्खेने उपस्तित रहुन करतात.




Now, send attachments up to 25MB with Yahoo! India Mail. Learn how.

४. नवा भात खाने (नवखाने)

भाद्रपद
४. नवा भात खाने (नवखाने)
ह आदिवसीचा पारम्परिक सण आहे. पुर्वी काळि कुडई कलीव, दुल्हा अशा प्रकरच्या भाताच्या जाति तिन महिन्यात म्हन्जे भाद्रपद महिन्यात तयार होत असत. यच्यातिल काही जाति आज अस्तित्वत नाहित. भात तयार झले कि भद्रपदातिल एखद्या मन्गलवारि किवा सोयिच्या वारि तयार झलेले भात कापुन घरि आनुन भाताचि पुजा करुन मग मळनि करतात. सन्ध्याकाळि त्या भाताचे पोहे व जेवण करतात. नव्या भाता सोबत नव्या भाज्या पहिजेत म्हनुन आळुचे देठ, माठ, दान्गर, मासे, खेकडे, अशी भजि करुन रात्रि कुलदैवत हिरवा देवाला दिवा लाउन सर्व लहन मोठि मन्डळि एकत्र बसतात. एक वडिल मणूस ताटात पोहे घेउन सर्व मन्डलिन्च्या हातावर पोहे देतो. सर्वाना पोहे वाटल्या नन्तर वाटनारा माणुस सर्वाना उद्देशुन पुरले कि नहि विचारतो. जमलेल्या मणसाकडुन हो पुरले असा जाब अल्यावर वाटनारा सान्गतो, "आपल्या कष्टची नवि कणसरी अथा सगलि जना खा." नवा भात {पोहे} खातान एक मेकाना भेटतात व वडिलधारया मणसान्च्या पाया पडतात. नन्तर दारु सोबत नवभजिचा चाखना करुन वडील मन्डळि दारु पिवुन झाल्यावर जेवण करतात. जेवण झाल्यावर कधि कधि कामडि नाच, तर कधि तारपा नाच करुन नव्यभाताच्या पिकाचा, नव्या सणाचा आनन्द साजरा करतात.

३. नागपचवी (नाग पन्चमी)

श्रावण
३. नागपचवी (नागपंचमी)
नागपंचमी हा श्रावण शुध्द पंचमी या दिवशी साजरा करतात. या दिवशी शेतकरी नागर्नीचे काम करित नाहि. या दिवशी उपवास करतात. जंगलात नागाच्या ठिकाणी (बिळाजवळ) अदिवसी पुरुष दुध व ज्वारिची फुले (लाह्या भुरुन्गल्या) वहुन पुजा करतात. महिला आणि कुमारिका रात्रि घरि पाटावर तिळ, तान्दुळ, उडिद यांचे नवु नाग करुन गोडेतेलचा दिवा लावुन थेरडा, गोमेठी, करटोल, शिरोळी अश्या वेलि, वन्स्पति, ज्वरिची फुले व दुध वहुन नाग देवताचि पुजा करतात. काहि भगात उपवास करणाऱ्या बाया घरोघरि जावून एकमेकान भेटतात, मोठ्यांचे आशिर्वाद घेतात. व आपल्या कडिल ज्वारीची फुले (लाह्या) त्यांना देतात. भाऊ आणि बहिनि भेटतात, ह्या सनाला बहिणिने भावाकरता उपवास असेहि मानले जाते. रात्रि जेवन झाल्यवर गौरि नाचायला सुरवात होते. रात्रभर ढोलकिच्या तलावर पायाला घुंगरू बांधून स्रि-पुरुष मुले-मुलि नाचत असतात. या दिवसा पसुन गौरि नाचायला सुरवात होते. अशा प्रकारे नागपंचमी हा सण सजरा करतात.

२. कोळीभाजी -

२. कोळीभाजी -
कोळिभजीचा सण जेठ महिन्यात साजरा करतात. पाऊस पडल्या नंतर कोळिभाजी निघाली की, गावकरी एकत्र जमून वर्गणी जमा करतात. आणि मंगळवारी वाघोबाच्या स्थानाजवळ एकत्र जमून गावच्या भगता कडुन (गाव पुजारि) देवाला सेंदूर लावतात आणि कोळी भाजी ठेवतात. नंतर नारळ फोडुन कोंबडा किवा बकऱ्याचा बळि देतात. देवाला धार देवून प्रार्थना केलि जाते कि, "हे गाव देवी-वाघोबा देवा चार महिन्यांचे रात आलि आहे, आमची पोरटोर, गुरढोर. किड्या -कट्यात फिरतील ति तुझ्या ताब्यात ठेव. शेतात चांगले पिक येवू दे, रोगराई पासून गावाचे रक्षण कर. तुला येत्या मार्गशीष साथ भरुन तुझा नवस फेडु" असा सवाल करुन जमलेले गावकरी नारळ व कापलेल्या कोंबड्या, बकऱ्याचा प्रसाद करुन वाटुन खातात. तसेच गावातील पाड्या पाड्यावर , घरा घरात सर्व लोक आपापल्या कुलदेवला दिवा लावून शेतावरच्या देवाला सेंदूर लावून सर्व कुटुंबातील माणसे एकत्र बसून कोळि भाजि खाण्याचा कार्यक्रम करतात. कुटुंबातील वयस्कर व्याक्ति हातात कोळिभाजी देवून. सर्वाच्या हातावर कोळिभाजी देवून, सर्वाना उदेशून म्हणतो, चार महिन्याची रात आलेली आहे, कोणि भांडण तंटा करु नका. शेतिचि चांगली लागवड करा. सुख दुखाला एक मेकांना मदत करा. असा बजावतात आता सगली कोळी खा असा सर्वाना आदेश देतो.
वडील व्यक्तिचा अदेश होताच बाया सर्व मंडळी पाया पडतात, भेटतात आणि सार्वजन कोळी भाजी खातात. वयस्कर स्त्रि-पुरुष दारु पितात व एकत्र बसून जेवन करतात. जेवन झल्यावर कामड नाच सुरु करतात. या दिवसा कामडि नचाला सुरुवात होते. या कोळिच्या सणाला नवीन लग्न करुन दिलेल्या मुलीना व जावयांना खास मुळ (आमंत्रण) करुन बोलावले जाते. अशा प्रकारे कोळी सण साजरा केला जातो.

१. आखातीचा सण

वैशाख
१. आखातीचा सण
वर्षाच्या सुरवतीचा सण म्हणजे अखातीचा सण होय. हा सण बहुतेक कोकण समाजात साजरा केला जातो. वैशाख शुध्द प्रतिपदे पासुन कोरया टोपलित अठरा प्रकारची धान्ये पेरुन त्याची गौरी (लक्ष्मी) म्हणुन पुजा करतात. पेरलेल्या धान्याची रोपे स्त्रिया डोक्यात माळतात. आणि गौराई सारखे फेर धरुन नाच गानी करतात. या दिवशी म्रुत व्यक्तिच्या कावू घास घालतात. अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो.

ठाणे जिल्ह्यातील अदिवासी समाजतील देव देवता आणि सणाच्या कार्यपधतीची थोडक्यात महिती.

आदिवसी युवा शक्ति.
ठाणे जिल्ह्यातील अदिवासी समाजतील देव देवता आणि सणाच्या कार्यपधतीची थोडक्यात महिती.

आदिवसी जमतिचे सण हे इन्ग्रजी महिन्या नुसार होत नसुन मराठी महिन्यान्च्या तिथि नुसार होत असतात. ठाणे जिल्ह्यातील आदिवसी जमातीतील होळि (शिमगा) हा वर्षातील सर्वात शेवटच सण मानला जातो व आखातीच सण हा वर्षातील पहिला सण माणला जातो.

आपले सन आणि आपले उत्सव

आपले सन आणि आपले उत्सव
१ कोळी भाजी
२ नागपन्चमि
३ पोळा
४ गौरि गणपति
५ साकर चवुत
६ नवभात खाने (नवखने)
७ सर्व पितरि अवास/ओमस्या
८ दिवाळ बारस / वाघ बारस
९ दसरा
१० दिवळि
११ साथिचा देव
१२ सकरात (सन्क्रान्त)
१३ होळी / शीमगा
१४ महाबिज
१५ गुडिपाडवा
१६ आखाति
१७ बोहाडा (गावुत्सव)
१८ खळ्याचा देव

अपले नाच -

अपले नाच -
१ ढोल
२ तारपा
३ ढेरा
४ टिपरि
५ टबला
६ धुमशा (तुर)
७ कामडि
८ मान्दोळ
९ गौरि (गवरि)
१० सन्गड नाच
११ रिरेटि
१२ घोरनाच

आपले देव देवता

आपले देव देवता
१ कुलदेवता
हिरवा , चिता, झोटिन्ग, हिमाय, कनसर्या बाळ, बैलचा तान्डा, नरान देव, बहिरम देव, फडाची देवि, बहिरि भवनि, महादेव, खन्डेराव, महालक्ष्मि
२ ग्रामदेवता -
गावशिवारि - गाव देवि, तोरणी चेडा, मखरि चेडा, गावचे मेट्करी,
३ अरध्य दैवत -
चान्द सुर्या, हतोबा, भिल्लोबा, विर, गवळि चेडा, सवर्या, बाया गवला.

आपलि वाद्य

आपलि वाद्य
१ तारपा
२ धोल
३ पावा
४ मोहरि पावा
५ ढोलकि
६ घान्गळि
७ काहळि
८ साम्बळ
९ तुणतुणा
१० टबला
११ धुमशा (तुर)
१२ डाका
१३ आउज
१४ डेरा
१५ रिरेटि
१६ मान्दोळ
१७ घुन्गुरकाठि
१८ चाळ
१९ काठा

Find us on Facebook