[Details Coming Soon]
[निहरी] …. काय लिहूं? लिंहून काहीं होंल?
In Case Fonts not visible, kindly read from [PDF File]
बारकीं पोरां जल्माला येत तव्हां पायसीं ते सरणांवर ठेवींत
तांव काहीं ना काहीं सुख दुख तं चालायंचाच, त्यां तं आहेच. पहले पायसीं आथां हलूं हलूं सगलां बदलायां लागलाहें.
रस्तं,
बिल्डिंगा, साला, लायटी, गाड्या, मोबाईल, मसनीं, कारखानं, दुकानां ना त्याचे हारीं भलतां काहीं आलाहें. य्या तं
होतूचं रेहेल, बदलतूच
रेहेल. जसां हींव पानीं आलां का आपले पांघरून ना कापडां बदलूं तसां ज्यां काहीं
बदलत जाय त्याचें हारीं आपल्यानाहों बदलाय तं लागलूच. पन काय काय,
कोढांक, कंव्हा, कोन्हानं, कसाक बदलाया पाहज त्याहों आपले बेसबरां समजून घेंन सगल्याहीं ठरवाया पाहजं.
जेनेकरून आपले लोखांच्या अडचनीं कमी होतील नां सुखान बेस रेहतीला.
आपलें जुनें लोखांहीं कसांक परतेक गोष्ट तपासून,
वापरून, परयोग दसं करून एक पिढीं बीजीं पिढीं करून करून तयार करेल
आहें. ज्यां काहीं रीतीं, खानपान, काम,
समजुतीं आहांत त्या एखादें फार जुनें पुस्तकांत लिहेल आहांत
ना आथां डोलं ओडकुन तासांचं करायचां असां नीहीं, वाडघां फार भारीं सांगत “जसं तुमचं दिस येतील तसां तुम्हीं
तुमचां करंजास, आम्हीं त जुनीं मानसां.” माना क्यां कायजून पण परतेक वेलस जुने वाडघांना नांगुन कसांक तरीं होंय.
कागदीं पुस्तकां ना डिगरी करायचे धावपलीत त्यांचेकडसीं भलतां काहीं शिकायचा रेहून
गेलां, ना
त्यांचे समोर डोकां रीताच दसां वाट. ना आपले बोगस मानुस आंहुत असां वाटत रेहे.
त्यांच विचार करींत होतुं, का य्या क्यां होंत हंवां, त ध्यानात आलां कां बारिंक पायसीं तं गावां पायसीं दूर,
सिकाया दूर रेहेल, हॊस्टेल ला सिकाया, मोठां सिकाया हो पके दूर. कव्हां कव्हां सुटेला येव पन सुटी
पुरतां,
सुट्या त कच्चा निंबू होयाच खपून जात. गावांतल्या रीतीं
निहीं माहित पडत ओलखिं नीहीं, सन नीहीं माहित होत, सुख दुःखांत नीहीं येवं. हलूं हलूं जव्हां जमल तंव्हा
शिकववं पन फरक पडेलूच. पुस्तकांत काय काय शिकवज, होस्टेल वालीं त्यांचं विचार सीकवीत,
बीजीं मानसां त्यांचा काहीं सांगत रेहेत. ते गडबडीत आपलां
ना आपले लोखांकड नांगाया चस्मा बिज्यांचा लागून जाय, त्यां समजायाच भलतीं वारसां जात. तसां होन होन आपलीं लोखांची वाटनीं दसीं होन रेहें. वेगलीं
वेगलींच होन रेहेत.
आपले लोखांची एकी करायचिं होवीं तं बारिंक पायसीं त्यांचे
हारीं चीं नाल जोडून ठेवाया काहीं कराया लागल. पहलें हरींचं रेहुन नवीन पिढी सिकत
जांय. आथां नवे जमान्यात नवे परकार नी आपल्याना नवा मारग गावसाया लागल नाल जोडाया.
मसनीं,
फोन, मानसां, पुस्तकां,
आवाज, नाच, मिटींगा, सम्मेलना,
आंदोलन, गोष्टी, कार्टून, स्पर्धा, चर्चा, संवाद, यात्रा, एकत्रीकरण, पुस्तक, पिचर, गाना, चित्रां ज्यां होंवा त्या, ज्या जमल त्यां गवसून काढून काहीं कराया पाहज. आपले
लोखांसाठी ज्या काहीं अडचनीं येत आहांत त्या सोडवायची विद्या तयार कराया आपल्यांना
परत एक होया लागलं. कोन्ही सिकेल होंवा कोन्ही नोकरीला होंवा कोन्ही धंदा करींत
होंवा कोन्ही सायेब होंवा जे कोन्ही होवं ते आपले
आपले जुगती परमान हातभार लावतील, त फार भारीं होल.
आपले सगलीं मानसां आहुंत मसनीं नीहीं तं आवडीं निवडींत फरक
तं पडायचाच. ज्याला जो झेंडा आवडल त्यांचे हारीं काम करतीला पन जंव्हा आपले लोखाना
एक होयाची गरज पडलीं तं सगल्या हीं एक होयाची सवय पाडाया पाहज. जसां जमल तसां ज्या
जमल त्यां आपले लेखांसाठी कराया पाहज. नकरीला लागलां का फक्त सवतां पुरतां यो
विचार सोडून, आपले
आपले हरिंचें मानसांचे वतीनं आहुं, जंव्हा लागल तंव्हा लोखांचे
हारीं येन लोखांचे कामीं येन असी सोय करून ठेवाय पाहज परतेकान.
जुवानांना, नोकरीला, रिटायर होदेल त्यांना एकदाच लोखांसाठी कामा कराया सांगून
निहीं काहीं होयाचां. बरिंक पायसीं त्यांची नाल जोडायचा काम कराया लागलं तय तीं
महोटीं होन आटोमेटिक लेखांचे कामाला येतीलां, एक होन काम कारातीलां, कोन्हाला सांगाय हो नीहीं लागायचा. गायचेन यासाठीं आपल्याना
काहीं कराया लागल पाडा, गाव,
साला, कॉलेज, तालुका, जिल्हा, राज्य, देश पातलीवर जाणकारांची समित्या बनवून ते ठिकानच्या अडचनीं
ते ठीकानी सोडवून ते ते ठीकानी एकी करून बेस
माणसांना निवडला तं परतेक ठिकानी
आपलीं बेस मानसां रेहतील. कामां पटापट होतीला, काहीं जागी आपलीं मानसां निहीं होवीं तरीं आपले मानसांची
एकीं नांगुन आपले हारीं चुकिचा निहीं होल.
आपली नाल जोडतांना आपल्याना वाडघाहीं सांगेल काहीं गोष्टी
लकस्यात ठेवाया लागतील. दिसायाच्यां गोष्टीं बदलत रेहेत,
बदलत रेहतीला. आपलीं विद्या असीं पाहज कां पानीं,
निंबर, वारा, हींव, पूर ज्या आलां त्यां पन आपलां काम टीकायां पाहज. वायलं झेंड,
वायलं देव, वायलं सन, वायलं नेतं, वायलीं सालां ना वायलां सीक्सन होवां तरीहों आपलीं पोरां,
जुवान, लोखां आपले लेखांसाठी पटकन एक होतीलां. नवीन जुगुत करून बेस
विद्या तयार कराया लागलं. सोशिअल स्ट्रॅटेजी का
काय सांगत त्यां तयार करून सगल्यां पांवत पोहचवायां लागल.
नवे जमान्यात आपले गांव देव, कुलदेव, आपलं सन, जल्म, लगीन, मरन रीती ना त्या करनारीं आपलीं मानसां सवासीन,
धवलेरी, सोयीन, भगत, तारपकरी, पंच,
आझूक जीं आहांत तीं सगलीं आपलीं लोखां,
नवी पिढी, सिकाय नोकरेला दूर सहराला रेहनारीं आपलीं लोखां,
बारकें बारकें सहारांत बदलणारीं गावां,
हलूं हलूं आपले लेखांचा कमीं होणारां परमान,
आपले लोखांच्या कमी होत जनाऱ्या सावलतीं. य्या सगल्याचा
विचार करून आपले जानकाराहीं मारग ठरवाया पाहजं.
आपले नवीन पिढीच्या सवयींहो नांगाया लागतीला. त्यांची भीती
कमीं करुन ज्या काहीं बेस आहें त्याहों पका सिकावया लागल. निसती डिगरी नीहीं
सवताचे पाह्यांवर उभा रेहाया ज्या ज्या कराया लागल त्या जामलां पाहज. यां करून
त्यांत आपलें लोखांचे कामांत इया पाहज. आपले कड ज्या काहीं काम तयार होय तथ आपलीं
मनासां पाहजत, फक्त
कामाला नीहीं मालक हो आपलाच पाहजत, सायबां हो आपलीच पाहजत.
ना य्या सगलां करताना आपल्यांना काहीं सोयी करून ठेवेल
आहांत सांग संविधानात, ना वेगल्या वेगल्या योजना येत त्यांचा हो अभ्यास करून सगलीं खातीं बेस काम
करीत का नीही, साला
बेस चालत का नीही, पोरां बेस सिकत का नीहीं त्याहों नंगाया लागल. कोन्ही कोठं कमी पडत होंवा, चुकत होंवा त त्या बेस करायसाठी त्यांना
सांगता आलां पाहजं.
आथा नांगा ना राज्यपालान आपल्यांसाठी आपलेकडचे नोकर भरतीत
वाटा ठेवेल पन ओढीं वारसां झालीं तर्ही आझूक हो नीही भरेल. त्याचा काहीं उपाय
कराया आपले सगल्याहीं एकीं करून म्होटा गाज कराया
पाहज. आपले लोखांच्या जमिनी म्होटे म्होटे परकल्पना दिजत,
आपलं डोंगर खणून टाकीत, जंगल तोडून टाकीत, नयीत व्याट पानीं टाकीत. आपले बाजारांचे/टेसन/हायवे चीं गांवातसीं
आपलीं लोखां चाखन्यालाहों निहीं दिसत, थोडीफार आहांत तींहो खपत जातं आहांत. वाटा ठेवेल जागेवरसीं
आपलीं मानसां निवडून जात पन आपले साठीं काहींच निहीं करींत होवीं तं काय कामाचीं?
नांगा बर आथां सांगाया तं राष्ट्रपती आपलां मानुस आहें. पन
आपले लोखांवर ओढा व्याट होय त्या बदल एकदाहो बोलवत नीहीं होंवा तं काय कामाचां.
तसांच उंद्या पंत परधान नीहीं त मुख मंतरी हो होल आपला पन जर आपले लेखांचे कामाला
नीहीं आला तं काय कामाची ती खुर्ची. तय नाव ना कागदाचे दाखल्यावरसीं आपला मानुस
गवसायचा सोडून काम नांगून आपलीं मानासां गवसून
जोडाया लागतीला घडवायां लागतीलां.
आजकाल सवलतीला कागदवले आदिवासींची कमी नीहीं आहे, रोज भलतं तयार होत.
लोखां तं गायचेन डोकीं बदलून रेहेल आहांत. तोंडासमोरसीं
पानी सहराला नीज, उरेल सुरेल आहें त्यांत हो गटारीं सोडजतहांत, जंगल त कंव्हाच खपवेल, जमिनीं वर तं टुकून पडेल आहांत,
आपले लेखांचे हातातसीं निसटून जाताहात,
वाय वायलीं केमिकल धोर प्लास्टिक खाल मासीं,
पाखरां, जनावरां, मानुस हो खपवाया सुरु होंदेल आहे. आपले सिकेल
लोखांच्यात आदिवासीत्व हो खपल्यातुच जमा आहे. असां सगलां आहें त काय करसींल
काहीं मारग आहे? आहे
काय काहीं मारग, सांग माना....
आयेबा भलते जोर्ह्यात आराडत होतुं नीजत. दादूं बिहला,
विचारीं काय झालां? मेहयान सांगला कांही नीही ना परत चादर बोन्गडून निजलुं.
रोहिदास दा ना त्यांचे टीम दोन तीन वारसांपायसीं माना सांगत होतीं ना फार दिस झालं, मानां आपले बोलीत काहीं लिहाया सांगेल होतां, पन कामाचे गडबडीत जमलाच नीही, लिहाय घेय त काय लिहूं त्याच नीही समज. त मन एक काम करींतु ज्या काहीं माझे सपनात डोक्यांत इधेल त्याच लिहून पाठवलाहें. नांगजास काहीं चुकेल होवा तं संभालूंन घिजास. नाल जोडायजोग काहीं मारग होवा त दाखवजास, बेस रेहजास. जोहार!
सचिन सातवी, वाघाडी, तालुका डहाणू, जिल्हा पालघर, महाराष्ट्र
…. काय लिहू? नाळच तुटलीय तर
… जन्मापासून ते मृत्यू पर्यंत आपण जे सुख दुःख अनुभवतो ते
जीवन आहे प्रत्येक जण ते जगतो. सध्याचे सार्वजनिक जीवन पूर्वीपेक्षा बरच बदललंय
आधुनिक तंत्रज्ञान, यंत्र
सामुग्री, साधने यांच्या उपयोगाने अधिक सुखकर होते आहे.
वेळेनुसार ते बदल अविरत होत राहतील. पण या बदलांप्रमाणे समाज म्हणून आपण आपल्यात
कोणते अनुकूल बदल करतो आहोत, कोणती मूल्य जगतो आहोत ते महत्वाचे आहे. ते समाज म्हणून
विचारपूर्वक नियोजन करून अवगत केल्यास समाजाची समाधानी जीवनाचा इंडेक्स वाढू शकतो.
आपल्या आधीच्या पिढ्यांनी प्रत्येक गोष्ट स्वतः प्रत्येक्ष
करून, अनुभव घेऊन, सुधारणा
करून त्यात सतत विकसित करून अनेक पिढ्यात जतन केली आहे आणि त्यात इतकी लवचितकता
आहे कि भविष्यात पण येणारे बदल सहज आत्मसात करून पुढे जाऊ शकता येते. आणि या जीवन
मूल्यात फक्त माणूस नाही तर सभोवताली जीवश्रुष्टी, निसर्ग, पर्यावरण
प्रत्येकाचा विचार करून एकमेकांना पूरक असे जगायची दिशा आहे. बहुतेक याच कारणांनी मला दोन पिढ्या आधीचे कुणी दिसले कि त्यांचे खूप
कौतुक वाटते आणि स्वतःला खूप रिकामे असल्यासारखे वाटते. कागदी शिक्षणाच्या गडबडीत
बहुतेक आधीच्या पिढीकडून वैयक्तिक पातळीवर जीवन मूल्य घेणे राहून गेल्याची खंत
आहे.
खरे बघता याला सध्या उपलब्ध असलेली शैक्षणिक पद्धती पण काही
प्रमाणात कारणीभूत असावी. खूप कोवळ्या वयात शिक्षणासाठी गावापासून लांब आश्रम
शाळेत. सभोवताली असलेल्या परिसराचा काहीच संबंध नसलेला अभ्यासक्रम. आधी तर प्रमाण
भाषा मराठी शिकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. मग दूर कुठल्या तरी जिल्ह्यातून आलेले
शिक्षक कि ज्यांना येथील भाषा आणि संस्कृती ओळख नाही त्यांच्याकडून पुस्तकातला
अभ्यास शिका. त्यांच्या वागण्यातून, पुस्तकातून तयार होणारी प्रतिमा, परिसरातील साधनात
असणारी माहिती यांच्या सगळ्या मुळे स्वतःच्या संस्कृती, समाजा
बद्दल नकळत न्यूनगंड तयार होतो आणि पुढे नोकरी लागल्यावर तर त्याला वेगळेच स्वरूप
प्राप्त होते. अशा परिस्थितीत स्वतःच्या पोरांना अलिप्त/शहरी ठेवण्यासाठी धडपड
सुरु होते. कदाचित नाळ तुटण्याची हीच ती सुरवात.
पूर्वी सामूहिक जीवनात सहज असलेली सामाजिक नाळ जर आपल्याना
नवीन पिढीत जिवंत ठेवायची असल्यास, आता बदलत्या काळानुसार उपलब्ध पद्धतींचा नियोजनपूर्वक उपयोग करून काही
उपक्रम आखल्यास त्याचा उपयोग नवीन पिढीला नक्की होऊ शकेल. जिथे लहान पणापासून
इत्तर प्रभाव तयार होतो त्या ऐवजी सामाजिक जाणीव, बांधिलकी
आणि संवेदना जिवंत राहील आणि अशा वातावरणात तयार होणारी नवीन पिढी भविष्यात कुठेही असेले तरी ती समाजाशी असलेला
ऋणानुबंध कायम ठेवेल. आपली सांस्कृतिक ओळख कायम ठेवेल आपली सामाजिक नाळ
कायम ठेवेल.
वैयक्तिक अनुभव, आवड निवड, दृष्टिकोन, प्राथमिकता
या नुसार काही फरक असणारच, आपण मशीन नाहीत. उपलब्ध विविध
राजकीय आणि सामाजिक प्रवाहात असून, जिथे असू तिथून समाज
हिताचे काम करणे महत्वाचे आहे. तसेच जेव्हा जेव्हा समाज म्हणून एकत्र यायची
आवश्यकता असेल तेव्हा एकत्र यायची सवय असायला हवी. आपण जे शिक्षण घेतले आणि नोकरी
मिळवली ती फक्त माझ्या मेहनतीच्या जोरावर मी केले या पेक्षा आपल्या समाजाचे
प्रतिनिधित्व म्हणून तिथे संधी मिळाली आहे असा दृष्टिकोन ठेवून आणि जेव्हा जेव्हा शक्य होईल तेंव्हा समाजहितासाठी हातभार
लावण्यासाठी पुढाकार घेत राहीन हि भावना हवी.
आपण एक आवाहन केले आणि सगळे युवा, नोकरवर्ग, निवृत्त
कर्मचारी समाज हिताच्या कामाला लागले आणि सामाजिक परिवर्तन झाले असे लगेच होणार
नाही. आपल्याना नवीन पिढी घडवताना हि सगळी मूल्य रुजवावी लागतील, समाजातुन सामूहिकतेचे प्रोत्साही आणि मार्गदर्शक वातावरण देणे गरजेचे आहे,
त्यासाठी अवश्य व्यवस्था उभारणी गरजेचे आहे. प्रत्येक ठिकाणी निर्णय
प्रक्रियेत आपले जागृत प्रतिनिधित्व हवे, पाड्या पासून ते
राष्ट्रीय पातळीवर विविध प्रश्न हाताळणाऱ्या
नेतृत्वाची फळी / समित्या समाजातून बांधणे गरजेचे आहे. जेणेकरून
संबंधित पातळीवर आपले समाज हित जपले जाईल किंवा आवश्यक असल्यास दबावगट कामी आणता
येईल
सामाजिक उपक्रमांची सांगड घालताना, संस्थात्मक जाळे उभारताना, नेतृत्वाची फळी उभारताना त्यांचे स्वरूप काळानुरूप राहील, नवीन पिढीच्या प्राथमिकता, कायमस्वरूपी उपाय,
सर्वसमावेशक, एकमेकास पूरक, स्वावलंबन आणि आदिवासीत्व लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे आहे. जेनेकरून
विविध मतप्रवाह ची माणसे पण आदिवासीत्व च्या दिशेने एकमेकांना पूरक काम करण्याची
प्रेरणा घेतील. आपल्याकडे उपलब्ध ज्ञान, कौशल्य, ऊर्जा सहज
समाज हितासाठी कामी आणून रचनात्मक सामाजिक उपक्रमांचे वातावरण बनविले पाहिजे.
वातावरणानुसार अनुकूल बदल करून घेणे हे आदिवासी
जीवनमूल्यांचे वैशिष्ट्य आहे. बदलत्या जीवनमानानुसार अनेक बदल होत आहेत आणि राहतील
त्याशी सुसंगत अशी जीवनपद्धती आणि सामाजिक मूल्य अवलंबणे गरजेचे आहे ज्या गतीने
शहरीकरण/बाजारीकरण/भौतिक बदल होत आहेत त्यातून होणारे नुकसान, तसेच आपले साविंधानिक अधिकार, कायद्यात होणारे बदल, आपले अस्तित्व इत्यादींसाठी
आवश्यक उपाय योजना समाजातून उभे राहिले
पाहिजेत.
नवीन प्राथमिकतांनुसार जी काही कौशल्य, मूल्य, ज्ञान आवश्यक
आहे ते त्या त्या वेळेस नवीन पिढीला मिळण्यासाठीची आवश्यक व्यवस्था आणि त्यावर
लक्ष ठेवणाऱ्या समित्या गाव पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीवर बनवणे गरजेचे आहे.
आपल्या परिसरात जे काही सेवा, उद्योग, व्यावसाय
चालत आहेत त्यात आपला सहभाग आणि प्रतिनिधित्व हवे
फक्त कामगार म्हणून नाही तर निर्णय घेणाऱ्या पातळीवर आणि मालक म्हणून.
हे सगळे करताना आपल्याना समाजातून आवश्यक दबाव गट तयार करणे
गरजेचे आहे. प्रत्येक ठकाणी समाज हित जपले जातेय का सगळे उपक्रम, योजना, सेवा अपेक्षित
पद्धतीने राबवल्या जाताहेत काय. संविधानिक अधिकार आणि पॉलिसी मेकिंग साठी लागणार
आपला आवाज आणि नेतृत्वाची फळी बांधणीसाठी आवश्यक
पाठपुरावा यंत्रणा समजावून जिवंत ठेवणे गरजेचे आहे.
आता हे बघा ना अनुसूचित क्षेत्रातील १७ पदांच्या भरती आणि
१००% आरक्षणासंबंधी. कित्येक वर्षे होऊन गेली, त्या विषयी योग्य जागरूकता, प्रतिक्रिया, प्राथमिकता, असलेल्या सरकार कडून संबधी उपाय काढून
घेणे आपल्याना आणि आपल्या लोकप्रतिनिधींना शक्य झाले नसेल तर नक्कीच हे चित्र
चांगले नाही. मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट च्या नावाने आता जल जंगल जमीन जैवविविधता
आणि आपले स्वावलंबन गमावतो आहोत. हळू हळू अनुचित क्षेत्रात आदिवासींचे प्रमाण कमी
होत आहे, जर आपले लोकप्रतिनिधी या विषयी समाज म्हणून आक्रमक
भूमिका घेत नसतील तर आपण कुणाला कशासाठी निवडून देतो याचा विचार करणे गरजेचे आहे.
चांगले प्रभावी पर्याय समाजातून घडवणे गरजेचे
आहे.
आणि सामाजिक काम करताना त्याचे नाव/जमाती पेक्षा त्याचे काम
लक्षात घेणे गरजेचे आहे. समाजाला अपेक्षित कार्य आपण करतो आहोत का, आपल्या सामाजिक
संवेदना जिवंत आहेत का. प्रत्येक संविधानिक किंवा
प्रशासकीय पदी त्या ठिकाणच्या दायित्व आणि नियमा नुसार काम करणे अपेक्षित असते.
तरी सांगायला सध्या आपल्या देशाचे राष्ट्रपती पद आदिवासी महिलेकडे आहे, उद्या पंतप्रधान किंवा मुख्यमंत्रीही आदिवासी बनतील पण जर समाजासाठी
पुढाकार घेऊन समाजाची किंवा समाजासाठी स्पष्ट आग्रही भूमिका मांडत नसतील आणि
समाजाच्या कामी येत नसतील तर काय कामाचे असे पद? किंवा
प्रशासनात अनेक अधिकारी आहेत, आहेत त्या ठिकाणी प्रामाणिक
प्रभावी काम करणे हे प्राथमिक आहे आणि सोबत समाज हिताच्या उपक्रमांना सक्रिय पाठबळ
दिले तर त्यांचा समाजासाठी उपयोग होईल. आणि जर समाजासाठी कामी नसतील येत तर
त्यांच्यात आणि बोगस आदिवासींत फार काही फरक नाही असे वाटते.
बघाना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीपण आपल्याना झोपेतून
उवत नाही, आपल्या समोर आपले पाणी शहरांना नेले जाते,
उरलेल्या नदी प्रदूषित होत आहेत. जमिनी शासकीय पद्धतीने अधिग्रहित
होत आहेत, खाजगी खरेदी करून कुरतडल्या जात आहेत. जंगल आधीच
संपवले आहेत आता उरलेले डोंगर पण खणुन नेत आहेत. औद्योगिक कारखाने आपल्या जगेल
प्रदूषण येथे आणि तेथील रोजगाराच्या संध्या इत्तर राज्यातील कामगारांना, अधिकारी आणि मालक दुसऱ्या जिल्ह्याचे. आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यात
आपल्याना समाजातून स्थानिक प्रभावी नेतृत्व तयार करून पुढे आणता येत नसेल तर खरच राजकारण अधिक चांगल्या पद्धतीने शिकून त्यात कुशलता वाढवणे
गरजेचे वाटते. भौतिक विकास जरी दृश्य स्थिती बदलत दिसेल रंगीत इमारती,
अनेक पदरी रस्ते, चकचकीत दुकाने, गाड्या, पाट्या, ब्यानर पण
समाज म्हणून आपले स्वावलंबन बघणे गरजेचे आहे आपली नवीन पिढी स्वतःच्या पायावर उभी
आणि इतरांसारख्या उंचीवर पोचते आहे का सामान संधी मिळते आहे का हे लक्षात घेणे
गरजेचे आहे. खर्रर्रर्र ट्र्र्रर्र्र .. हॅलो येतोय ना माझा आवाज, हॅलो हॅलो... उप्स, स्वप्न होते. थंडी लागली होती,
ब्लॅंकेट सरकले होते, ब्लॅंकेट ओढले आणि
पुन्हा झोपलो.
रोहिदास दा आणि त्यांच्या टीम ने गेल्या काही वर्षांपासून
माझ्याकडे लेखासाठी विनंती केली होती, पण मला जमलेच नव्हते. या वर्षीपण अनेक दिवसांपासून त्यांनी सांगितले होते
बोलीभाषेतील लेख पाठवा, पण मला सुचतच नव्हते काय लिहू,
एक विषय घेतला कि मोठी यादी तयार होते विषयांची कि जे आदिवासी
समाजासाठी खूप महत्वाचे आहेत आणि त्या गोंधळात लिहनेच राहून गेले, म्हणून कदाचित डोक्यात विषय सुरु असताना असे स्वप्न पडले. म्हणून मग मधला
मार्ग काढला जे काही डोक्यात आले होते तेच लिहून काढले. काही चुकीचे असल्यास
क्षमस्व पण आदिवासीत्व जतन करून समाज हिताचे उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी समाज एक कुटुंब म्हणून संवाद करून आवश्यक प्रयत्न करत
राहूया. let’s do it together! जल जंगल जमीन जीव
जोहार आदिवासीत्व!
सचिन सातवी, वाघाडी, तालुका डहाणू, जिल्हा पालघर, महाराष्ट्र
"Tata Volunteering Program" उपक्रम
"Tata Volunteering Program" उपक्रमात आयुश ची निवड झाली आहे, या माध्यमातून जगभरातून *टाटा समूहातील इच्छुक कर्मचारी, निवृत्त आणि कुटुंबी स्वयंसेवक म्हणून आठवड्यातून वेळ काढून आयुश च्या कामाला हातभार लावतील.* पहिलाच अनुभव, आयुश टीम ला शुभेच्छा!
|| आंतराष्ट्रीय जागतिक आदिवासी दिवस ||
|| आंतराष्ट्रीय जागतिक आदिवासी दिवस ||
International Day of the World’s Indigenous Peoples
आपल्या माहितीसाठी UN माध्यमातून जागतिक आदिवासी दिनाची थीम यादी, यावर नक्कीच विचार करून आवश्यक उपक्रमात सहभागी होऊन कृतीत आणूया. आपल्या संपर्कात फॉरवर्ड करण्यासाठी विनंती
💡 2021:
Leaving no one behind, Indigenous peoples and the call for a new social contract
▪️ कोणाला मागे न ठेवणे, आदिवासी आणि नव्या सामाजिक करारांची हाक
2020:
COVID-19 and indigenous peoples’ resilience
▪️ कोविड आदिवासींचे स्थितिस्थापकत्व
2019:
International Year of Indigenous Languages.
▪️ आदिवासी भाषा वर्ष
2018:
Indigenous peoples’ migration and movement
▪️ आदिवासींचे स्थलांतर व आंदोलन
2017:
United Nations Declaration on the Rights of Indigenous Peoples (UNDRIP)
▪️ संयुक्त राष्ट्र संघ आदिवासींचे अधिकार घोषणापत्र
2016:
Indigenous Peoples’ Right to Education
▪️ आदिवासींचा शिक्षणाचा अधिकार
2015:
Ensuring indigenous peoples’ health and well-being
▪️ आदिवासींच्या आरोग्य आणि कल्याणाची खात्री
2014:
Bridging the gap: implementing the rights of indigenous peoples
▪️ अंतर कमी करणे : आदिवासींचे हक्क अंमलबजावणी
2013:
Indigenous peoples building alliances: Honouring treaties, agreements and other constructive arrangements
▪️ आदिवासींची एकता : करार, कायदे, नियमावलीं यांचा सन्मान करणे
2012:
Indigenous Media, Empowering Indigenous Voices
▪️ आदिवासी मिडिया, आदिवासींचा आवाज प्रभावी करणे
2011:
Indigenous designs: celebrating stories and cultures, crafting their own future
▪️ आदिवासी डिझाईन्स : कथा, संस्कृतीचे उत्सव आणि भविष्य निर्मिती
2010:
Celebrating Indigenous Film Making
▪️ आदिवासी चित्रपट उत्सव
2009:
Indigenous Peoples and HIV/AIDS
▪️ आदिवासी आणि एड्स
2008:
Reconciliation between States and indigenous peoples
▪️ आदिवासी समाज आणि राज्यव्यवस्था यात समन्वय
2007:
Urgent need to preserve indigenous languages
▪️ आदिवासी बोली भाषा जतन करण्याची तातडीची गरज
2006:
Indigenous Peoples: human rights, dignity and development with identity
▪️ आदिवासी माणसे : मानवी अधिकार, स्वतःच्या ओळखी सह विकास
2005:
The Cause of Indigenous Peoples is Ours
▪️ आदिवासींचे विषय आपल्या सर्वांचे आहेत
..............................................................
देशभर वाढत असलेला उत्साह आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. हि जबाबदारी ची भावना एका दिवसापुरती न राहता नित्य आयुष्यात पण वाढत जावी या साठी प्रयत्न करूया. आपल्या परिसरात आवश्यक उपाय योजनात सहभागी होऊन कायम स्वरूपी व्यवस्था तयार करण्यासाठी हातभार लावूया. आदिवासीत्व जतन करुया. Let’s do it together!
जल जंगल जमिन जीव. आदिवासीत्व... जोहार !
..............................................................
[मराठी] https://youtu.be/jAK48O8QI44
[English] https://youtu.be/kGF8HfXp5ag
AYUSH Warli Painting Cluster - DC Handicraft ID Card Distribustion
AYUSH Warli Painting
Cluster |
|||
No |
Name of Artisan
(Alphabetically) |
||
1 |
AashaRaghunathSambre |
||
2 |
Ajay
ChaituTembare |
||
3 |
Ajay
PandurangBij |
||
4 |
AkashGajananPawar |
||
5 |
Amit
AnantBasavat |
||
6 |
Amit
MahaduVadaliya |
||
7 |
AmolValmikKatkari |
||
8 |
Anjali Roshan
Gavali |
||
9 |
AnkitaParshuramMalavkar |
||
10 |
AnkitaSaduMedha |
||
11 |
Ankush Ramesh
Khanjode |
||
12 |
Anuja Ashok
Somda |
||
13 |
Arun Prakash
Zirwa |
||
14 |
Arun Ramesh
Gawali |
||
15 |
ArunRatanSonalkar |
||
16 |
AshwiniDevramKini |
||
17 |
AtulParshuramMalavkar |
||
18 |
Bhagyashri
Mahesh Bhoye |
||
19 |
BharatiBabajiParhad |
||
20 |
BhargavSaduMedha |
||
21 |
BhikalyaLadakyaDhinda |
||
22 |
Bhushan Narayan
Govari |
||
23 |
Chandu Shankar
Kusal |
||
24 |
Chandu Shankar
Parhad |
||
25 |
Chirag Prakash
Pagi |
||
26 |
DeepikaDilipKorda |
||
27 |
DilipLahanuKorda |
||
28 |
DipakDhakalSahare |
||
29 |
Ganesh
BaluVartha |
||
30 |
Ganesh Ramesh
Dabaka |
||
31 |
HarshalaNareshBhagat |
||
32 |
JagdishKrushnaGhatal |
||
33 |
JanhviJitendra
Mali |
||
34 |
JayramDhakalSurum |
||
35 |
JayramSakharamKhirari |
||
36 |
Jitendra Anil
Dhangada |
||
37 |
Jitesh Krishna
Vaghat |
||
38 |
JiteshNanduUmbarsada |
||
39 |
JyotiBaluramChaudhari |
||
40 |
Kalpana Santosh
Dodka |
||
41 |
KapilMadhukarFufane |
||
42 |
Kiran
KashinathGhatal |
||
43 |
Krishna
ChanduKadu |
||
44 |
LaxmanBalyaKadu |
||
45 |
ManeshSitaramLahange |
||
46 |
Manisha
DashrathGovari |
||
47 |
Mayuri Prakash
Vayeda |
||
48 |
Meena Sanjay
Parhad |
||
49 |
Minakshi Mohan
Tare |
||
50 |
NareshLahanyaBhagat |
||
51 |
NarlyaDamuMahya |
||
52 |
Nayan Prakash
Vayeda |
||
53 |
NileshBhivaGhoda |
||
54 |
NileshPandurangVanga |
||
55 |
Nirmala
LadkaDandekar |
||
56 |
PradipGanpatRinjad |
||
57 |
Prakash
MahyaPagi |
||
58 |
Prakash Rama
Zirwa |
||
59 |
PranayRameshwarParhad |
||
60 |
Pratik
LakshaBonge |
||
61 |
PravinKrushnaChaure |
||
62 |
Priyanka
BhivaKinjara |
||
63 |
Radhika Rajesh
Khadake |
||
64 |
Rahul
RaghyaUmbarsada |
||
65 |
RajnikantGanpatVad |
||
66 |
Rakesh Ashok
Kol |
||
67 |
Rakhi Nitin
Salunke |
||
68 |
Rasika Rajesh
Medha |
||
69 |
RatnakarNavasuTokare |
||
70 |
RavindraLaxmanBhawar |
||
71 |
RohitKisanGawali |
||
72 |
RohitShantaram
Diva |
||
73 |
RupeshBabuRandhe |
||
74 |
RupeshSantuVadu |
||
75 |
Sachin Suresh
Kharpade |
||
76 |
SakshiSudhakarBelkar |
||
77 |
SanjanaSandeshSambare |
||
78 |
Santosh
BhiwaLakhan |
||
79 |
Santosh
PandurangVanga |
||
80 |
Santosh Suresh
Dodka |
||
81 |
SatyawanBabuPagi |
||
82 |
Savita
ArunSonalkar |
||
83 |
ShaileshRamchandraKharpade |
||
84 |
Shankar
LaxmanKolha |
||
85 |
SheetalBhargavMedha |
||
86 |
ShirishBhalchandraBhurkud |
||
87 |
ShitalJayramGorkhana |
||
88 |
Shiva
KhurasanDalavi |
||
89 |
Shweta
EknathRasal |
||
90 |
SitaramMarhyaParhad |
||
91 |
Subhash Suresh
Radya |
||
92 |
SuchitaPrabhakarJadhav |
||
93 |
Sugan Rama
Kachara |
||
94 |
Sujata Sunil
Sambre |
||
95 |
Sunil Vasant
Talha |
||
96 |
SurajLaxmanSutar |
||
97 |
Surendra Ashok
Vasavale |
||
98 |
SuvarnaSaduSambre |
||
99 |
Taresh Vishnu
Umbarsada |
||
100 |
Vaishali Vilas
Jadhav |
||
101 |
VasantiChandu
Chauhan |
||
102 |
Vijay
YashwantBhoye |
||
103 |
Vilas
JaswantFesarda |
||
104 |
Vilas Prakash
Dokphode |
||
105 |
Vinod
PandurangaVanga |
||
106 |
Vivek Vilas
Kusal |
||
107 |
YogitaRamchandraBombade |
||
108 |
YogitaShantaramJadhav |
||
109 |
YuvrajBhagwanKadu |