नेतृत्व गुण शिबीर आणि आदिवासी सशक्तीकरण कार्यशाळा



उदघाटन समारंभ : (संयुक्त कार्यक्रम -नेतृत्व गुण शिबीर आणि आदिवासी सशक्तीकरण कार्यशाळा )

कार्यशाळेचे उदघाटन माननीय एड्वोकेट चिंतामण वानग, आमदार (व माजी खासदार) यांच्या तर्फे युवा शक्तीचे प्रतिक म्हणून मशाल प्रज्वलित करून व आदिवासी समाजाचे आराध्य दैवत कणसरी पूजन करून करण्यात आले. आदिवासी विकास प्रकल्प डहाणू आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे आभार मानून कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुश अध्यक्ष श्री सचिन सातवी (इंजिनियर व सामाजिक कार्यकर्ता) यांनी केले. उद्घाटन सोहळ्यात श्री पांडुरंग बेलकर (माजी सभापती, समाज कल्याण, जिल्हा परिषद ठाणे) व एड्वोकेट काशिनाथ चौधरी (नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य) यांनी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, युवक युवतींना आयुश सारख्या व्यासपिठाची आदिवासी समाजाला गरज असल्याचे नमूद करून आदिवासींची सद्यस्थिती, समस्या व आपली भूमिका त्याचप्रमाणे अशा प्रशिक्षणाची आवश्यकता याबाबत संबोधित केले..

उदघाटन भाषणात आमदार चिंतामण वानग यांनी आयुश च्या नाविन्य पूर्ण उपक्रमाचा तपशील देवून आयुश प्रगतीची, गती, वाटचाल व यशाबद्दल अभिनंदन केले. युवक युवतींच्या हातात संपूर्ण राष्ट्र - समाजाचे भविष्य आहे, त्या मुळे काळाच्या ओघात, योग्य दिशेने, योग्य वेळी, उचित पूल उचलणे अतिशय महत्वाचे असून. त्या साठी माहिती, ज्ञान आणि सतत कष्ट करण्याची मनाची तयारी असणे असल्याचे नमूद केले. या साठी आयुश सारखे व्यासपीठ आदिवासींच्या सार्वभौम विकासासाठी, भविष्य काळासाठी गरजेचे व आवश्यक असून, आदिवासींची एकजूट, एकशक्ती व कृतीचे प्रतिक आयुश व्हावे या साठी सुभेच्छा दिल्या.

उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री वसंत भासरा यांनी केले. सूत्र संचालन निवेदनात श्री भासरा यांनी आदिवासींची विविध नावाखाली होणाऱ्या हेलसांडीचा निषेध करून, दिनांक १/३/२०१२ रोजी मुंबईच्या बातमीत "आदिवासी नरभक्षक" असा उल्लेख करणाऱ्या स्टार माझा या वृत्त वाहिनीवर न्यायालयीन खटला का चालवू नये? असा प्रश्न करून या वाहिनीचा निषेध केला. आपल्या गावामधील आदिवासी भूमिहीन होत आहे, गावातीलच दलाल लोकांच्या संगनमताने पैशेवले, शहरातल्या बड्या व्यक्तींच्या हाती कावडीच्या किमतीत जमिनी जात आहेत. हे कुठे तरी थांबवावं, अन्यथा आपण गुलाम आणि घरगडी- सालगडी म्हणून राबण्याच संकट दूर नाही अशी भीती-खंत व्यक्त केली.

व्यासपीठावर प्राध्यापक चेतन गुरोडा (मुंबई विद्यापीठ), प्राध्यापक सुनील भुसरा ( बांदोडकर महाविद्यालय विद्यालय, ठाणे), माननीय मुरलीधर बांडे, माननीय रघुनाथ महाले, आयुश अध्यक्ष्य सचिन सातवी उपस्थित होते. या कार्यशाळेचा लाभ डहाणू, तलासरी, विक्रमगढ,वाडा, पालघर, वसई तालुक्यातील एकूण ३० ते ३५ सरपंच / सदस्य / कार्यकर्ते व ३० ते ३५ युवक युवती यांनी घेतला. उद्घाटन सत्र नंतर लागलीच मार्गदर्शन सत्राला वेळा पत्रकाप्रमाणे सुरवात झाली .





See VDO at :

1)      Leadership Program :  http://youtu.be/DCIDeD32d60

2)      Tribal Empowerment program :  http://youtu.be/cW2jzvMjZoE



See Photograph at:


2)      Tribal empowerment Workshop :

AYUSH | feedback

About AYUSH

about us
AYUSH is self volunteer group of professionals who wants to take initiative to develop & unified our tribal community for future competitions
 our basic aims are
 - To bring together all individuals, groups, organizations and initiatives that believe in innovation and development of tribal’s, and to translate their energies into achievements that impact the way and quality of life and society
 - To connect peoples from different professions & create knowledge pool for knowledge & experience sharing
 - To guide/help rural students for their career & future with the help of knowledge pool
 - To create awareness about business opportunities & employment
 - To connect the rural & urban peoples to update about the future trends & competitions
 - create confidence among tribal’s & make prepare for future competitions
 - create awareness about art & culture, promote to preserve art & culture with considering modern lifestyle
 - remove the subtribism in tribal community & to promote strong unity under single tribal banner
 - remove the dependency & make tribal youth self dependant, confident & sucessfull
 - To create awareness about use of latest technology in regular life & for social activates
our vision
A – Ambition of Growth
Y – Youth Power
U – Unity of Adivasi
S – Surety of Support
H – Helping Hand Always
why we are here?
 -  To utilise our peoples talented, skill & knowledge to help/guide our students fo there bright future
 -  To connect the peoples from different locations to our community & have good communication between rurals & urbans
 -  To act as stage for those who wants to something for our community & translate their energy for developing our community
 -  We are enjoying Satisfaction of having tried To make a difference and the pride of being & making a successful tribal
how we can do ?
 -  By connecting different peoples [by internet, mail, sms, forums, etc]
 -  By Communication & discussion with all connected peoples [peoples, professionals & students]
 -  By conducting different programs [career guidance, educational guidance, art seminar, cultural festival, debate, etc]
 -  These programs will create confidence among tribal’s which will help to ensure our success
we expect
 -  The peoples connected by internet are expected to guide & support our mission & activities
 -  The rural peoples & professionals are expected to support & arrange different programs at local level
connect with us
 - Our aim is to reach each & every tribal’s, we will be happy if you help us connect more peoples 
- To receive regular updates Join AYUSH google group, you can join group by sending name & mail id to ayush@adiyuva.in
 - If you wish To join us, please mail us your details so we will reach to you
let us do it together
 -  You can support us as per your availability & interest, to know how you can support us requesting you to visit "support us" at our home page
- Expecting your valuable support to make faster our dream comes true
AYUSH - ensuring tribal success
www.adiyuva.in | ayush@adiyuva.in

about AYUSH [ marathi ]


आयुश विषयी काही

आयुश म्हणजे आदिवासी तरुणांनी एकत्र येऊन आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशासोबत, आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या सामाजिक यशासाठी आणि सामाजिक जाणीवा करून देण्यासाठी उभारलॆलॆ एक हक्काचॆ मुक्तव्यासपीठ आहॆ. जिथॆ तुम्ही तुमच्या विचारांची मुक्तहस्तानॆ दॆवाणघॆवाण करु शकता अन आपल्याकडॆ असलॆल्या कौशल्यांचा उपयोग आपल्या समाजासाठी कसा करता यॆईल याचा तपशील मांडु शकता.

आपले ध्येय
आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणारे वैयक्तिक, समुह किंवा संस्था यांना एकत्र आणून त्यांच्या मदतीने आदिवासींचा विकास करणे
- वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना एकत्र आणून त्यांचे अनुभव आणि ज्ञान वाटण्या साठी ज्ञानाचे जाळे बनविणे
- ज्ञानाच्या जाळ्याचा उपयोग करून ग्रामीण विद्यार्थ्यांना मदत / मार्गदर्शन करणे
- ग्रामीण विद्यार्थांना व्यवसाय आणि शिक्षणासाठी मार्गदर्शन आणि मदत करणे
- आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग दैनंदिन आयुष्यात आणि समाजोन्नती च्या कामात करून घेण्याकरीता जागरुकता निर्माण करणे
- शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना सोबत आणणे आणि सध्याच्या तसेच भविष्यातील स्पर्धेची ओळख करून देणे
- आदिवासी तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि भविष्यात सामोऱ्या जावा लागणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांना तयारकरणे
- पारंपारिक कला आणि संस्कृती यांविषयी जागरुकता निर्माण करणे आणि सध्याच्या जीवनमाना नुसार पारंपारिक कला आणि संस्कृती ह्यांचे जतन करणॆ आणि त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे.
- जाती भेद आणि पंथ भेद रोखणे आणि अखंड आदिवासी समाजा ची एकता टिकवणे
- परावलंबी पण नाहीसा करून आदिवासी तरुणांना स्वावलंबी बनविणे

आपली दृष्टी
आदिवासी संस्कृती जपूया
यु युवकांनो एकत्र येऊया
शक्ती एकवटून जगाशी भिडूया
आयुश का ?
आपल्या समाजात अनुभवी, हुशार, होतकरू असे बरेच लोक आहेत. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग आपल्या समाजातील गरजूंना करीता करुन घेण्यासाठी
- आपल्या समाजातील बरेच लोक विविध शहरात राहतात, पण अशा लोकांचा गावासोबतचा संबंध तुटत चालला आहे अशा लोकांचा गावासोबत संबंध प्रस्थापित करणे तसेच ग्रामीण भागातील किंवा समाजातील समस्या सोडविण्यात त्यांना सहभागी करुन घेणे
- ज्या लोकांना आपल्या समाजासाठी काही करण्याची इच्छा असते. अशा लोकांसाठी खास आदिवासी समाजासाठीचे स्वतंत्र आणि आजच्या काळा नुसार ध्येय आणि उद्देश असलेले योग्य व्यासपीठ म्हणुन काम करणे.
आपण कसे करणार?
- वेगवेगळ्या लोकांना जोडणे [ मेल, ब्लोग्स, संकेतस्थळे, सामाजिक जाळे, चर्चा आणि समूह, internet, sms चा उपयोग करून]
- वेगवेगळ्या चर्चा आणि संवाद आयोजित करणे [ अनुभवी माणसे, विद्यार्थी, व्यावसायिक, प्रतिष्ठीत इ ]
- सामाजिक, शैक्षणिक, व्यवसाय मार्गदर्शन, सांस्कृतिक तसॆच इतर अनॆक असे विविध कार्यक्रम भरवणे
- जेणेकरुन अश्या कार्यक्रमांद्वारे आदिवासी तरुणांमध्यॆ आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांना आपले ध्येय पूर्ण करण्यास मदत होईल

कोण करणार?
- संपर्कात असलॆल्या विविध माणसांकडून आपल्या ध्येय पुर्तीसाठी मार्गदर्शन आणि सहकार्य अपेक्षित आहे ज्याचा उपयोग करुन आपण समाजविकासाच्या कामांना गती देवू शकतो
- संपर्कात आलेल्या ग्रामीण भागातील तरुणांकडून विविध कार्यक्रम आयोजित करणॆ .

संपर्कात या
- जर आपणाला सोबत यावेसे वाटत असेल तर जरूर मेल करा
- आपले ध्येय आहे सगळ्या आदिवासी पर्यंत पोहोचणे, म्हणून आणखीन लोक जोडण्यास आपले सहकार्य अपेक्षित आहे.
चला सोबत करूयात
- आयुश च्या कार्यात मदत/सहकार्य करू इच्छित असणाऱ्यांचे स्वागत आहे, अधिक माहिती साठी "support us " मध्ये आयुश च्या संकेत स्थळावर पहा
AYUSH - ensuring tribal success
www.adiyuva.in | ayush@adiyuva.in

सुसरी धरण विरोधी संघर्ष समिती

सुसरी नदीवर धरण होऊ देणार नाही, होवू देणार नाही
जाहीर सभा
ठिकाण कासा केंद्र दिनांक ९ ओक्ट २०११ रोजी सकाळी १० वाजता
सुसरी नदीवर नियोजित धरण प्रस्थावित आहे. या धारणा मुळे मौजे रानशेत, आवढाणी, महालक्ष्मी, धानिवरी , दहीगाव, ओसुर, असरविरा, नवनाथ आणि गनेशबाग (रानशेत) येथील आदिवासींच्या जमिनी व वनजमिनीचे सुमारे १००० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. या धरणातील ५४ दश लक्ष घनमीटर पाणी पाईप लाईन द्वारे वसई, विरार व नवघर माणिकपूर व नालासोपाऱ्याला नेण्यात येणार आहे. या धरणाला आमचा प्रखर विरोध आहे. आजवर अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा सारख्या प्रकल्प द्वारा मुंबई ला पाणी नेण्यात येऊन ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील पाण्याची लुट करण्यात आलेली असून तेथील प्रकल्प ग्रास्तांचे पुनवर्सन झालेले नाही आणि आता मुंबई उपनगरे या भागात राहिलेल्या पाण्याची साधने हडप करू पाहत आहे. यातून आदिवासी साठी काहीही शिल्लक राहणार नाही.
म्हणूनच आतापर्यंत झाले इतके पुरे झाले, असे सरकारला ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. या पुढे आदिवासी नियोजनहित नागरीकरणाचा बोजा सहन करणार नाही. दूरवर आदिवासी भागात धरण बांधण्या एवजी वसई तालुक्यात असलेल्या पाण्याच्या स्त्रोताचा वापर करायला हवा. सिडकोने या साठी कामन, खोळ्सा पाडा, उसगाव, सातिवली, इत्यादी जागा सुचविल्या असून या ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोताचा वापर केला गेल्यास. दर दिवशी १२४ एम एल डी एव्हडे पाणी उपलब्ध होवू शकेल असे म्हटले आहे. सुसरी धरणात मिळणाऱ्या पाण्या पेक्षा हे मिळणारे पाणी किती तरी पटीने अधिक असेल या खेरीज पाईप लाईन तसेच बांधकाम खर्चाचीही बचत होवू शकेल. मात्र ठेकेदारांच्या लॉबीला बळी पडत सरकारने या सुचणे कडे दुर्लक्ष केले आहे. आमच्या भागातील काही राजकारणी लोकांनी आदिवासी कल्याणाचा विचार करण्या एवजी या धरणाचे समर्थन करत स्वतःची तुंबडी भरण्याच्या उद्देशाने मागे लागले आहेत.
आमच्या नद्याचे पाणी आमच्या मालकीचे आहे त्याच्या वापरावर आमचा अधिकार आहे आम्हालाच जर पिण्या साठी पाणी नाही तर आम्ही येथील पाणी वसई विरार ला का पाठवावे ? आणि त्यात तर शहराच्या मागण्या रोज वाढत आहेत. तसेच शहरी भागात दर माणसी पाण्याचा वापरही जास्त केला जातो. शहराच्या नवीन वसाहतींच्या गरजा भागवण्य साठी अधिका अधिक धरणे बांधली जातील. वसई विरार मधली बिल्डर लॉबीने चालविल्या नियोजनशून्य आणि अनिर्बंधित वाढीमुळे येथे पाण्याची कमतरता भासत राहणार आहे. सूर्या प्रकल्पाचे पाणी आदिवासींची शेती फुलाविन्या साठी दिले जाणार होते परंतु ठेकेदारांनी पद्धतशीर पणे वसई विरार सारख्या योजना मधून हे पाणी अन्यत्र कसे वळवता येयील हे काम केले आहे. आदिवासी भागाचे वसाहतीकरण आणि त्यांचे पाणी इत्तर साधनांनी लुट या पुढे थांबवा असे सरकारला सांगण्यासाठी कासा येथे एकत्र जमायचे आहे.
सुसरी धरण विरोध संघर्ष समिती
अध्यक्ष : श्री नरेश हाल्या बोलाडा
उपधक्ष्य : श्री चंदू सोनू वरठा
सचिव : श्री देविदास नंदकुमार तल्हा
खजिनदार : श्री सुरेश बाबू कडू

Happy shimaga & holi!

आपल्या भारतात सणांना अनन्यसाधारण महत्व आहे. भारताच्या सर्वच प्रदेशात सणांचे आगळेवेगळे वैशिष्टपुर्ण रुप आपणांस पहावयास मिळते.प्रत्येक प्रदेशाच्या चालीरीती,भाषा,तेथील संस्कृती यांनुसार सण साजरे करण्याच्या पद्धतीही भिन्न भिन्न आहेत.
आपल्या येथील सणांच्या मांदीयाळीतील एक वैशिष्टपुर्ण सण म्ह्णजे "होळी".
हा सण फार पुर्वीपासूनच मोठया आनंदात अनं उत्साहाने साजरा केला जातो.ग्रामीण भागात तर ह्या सणाला मोठया उत्सवाप्रमाणे साजरा करतात. ग्रामीण भागात तर "एक गाव एक होळी" अशीच प्रथा आजपण आहे. होळी पेटविण्याच्या निमित्ताने सर्व गावाने एकत्र यावे हा यामागचा मुख्य हेतु.होळीची एक मजेशीर गंमत आहे बघा! इतर सणांना आपण मंगलमय वातावरण तयार करत असतो पण या सणाला चक्क होळीच्या भोवती फ़िरुन सर्वजण बोंब मारत असतात. हे करण्यामागचा एकच उद्देश की होळी हा सण समाजातील वाईट प्रवृत्ती आणि दुर्गुंण नाश करण्यासाठी असतो. अमंगल ते जाळायचं आणि अनिष्ट अशा गोष्टींच्या नावानं बोंब ठोकायची.
आदिवासी संस्कृतीत तर हा सण अगदी छानश्या पद्धतीने साजरा केला जातो.लहान होळी आणि मोठी होळी अश्या दोन टप्यात हा सण साजरा केला जातो. लहान होळीच्या दिवशी पाड्यातली लहान मुले एकत्र येऊन लहान लहान सुकलेली लाकडे गोळा करून लहानशी होळी करून तिच्याभोवती नाचतात. म्हणूनच बहुतेक याला लहान होळी असे म्हणतात. ह्या दिवशी तांदळाच्या पापड्या करतात अनं उन्हात सुकत घालतात. नंतर त्या पापड्या घरात ठेवल्या जातात.लहान होळीच्या आदल्या दिवशी घरातले सगळेजण एकत्र बसून आंबा खातात, याला आंबा खाणे असे म्हणतात, या नंतर सगळे जण औपचारिकतेने आंबा खायला सुरवात करतात. दुसऱ्या दिवशी मोठ्या होळीला गावातील सगळी माणसे वाळलेली लाकडे गोळा करतात.गावातील सगळी माणसे एकत्र जमल्यानंतर पूजेला सुरवात होते, होळीची पुजा गावातील भगतांकडून केली जाते. गावकरी घरी बनविलेले तांदळाचे पापड नैवद्य म्हणुन घेऊन येतात. पूजा झाल्यावर होळीला अग्नी दिला जातो. असे मानले जाते की वाईट प्रथा आणि वाईट सवयींचे होळीत दहन केले जाते.
अजुन एक छानशी रीत ह्या सणाच्या निमित्ताने असते ती अशी की ह्या वर्षी नवीन लग्न झालेले दांम्पत्य होळी भोवती प्रदक्षिणा घालुन नाचतात. होळीच्या सुरवातीस अर्पण केलेले नारळ अग्नी मुळे भाजून बाहेर येतात, ते गरम नारळ प्रसाद म्हणून वाटले जातात. पारंपारीक गाणी म्हटली जातात. आणि त्यानंतर सगळे जण आपल्या घरी परतून पापड्या टाळायला सुरवात करतात. होळीच्या दिवशी तयार केलेल्या पापड्यांना ह्या दिवशी विशेष महत्व असते त्यामुळे प्रत्येक घरात त्या बनविल्या जातात, इतर ठिकाणी धिंडऱ्या, भाकरी इत्यादी बनविले जाते. लहान होळीच्या दिवशी शिमगा खेळला जातो, एकमेकांच्या अंगावर पाणी/भेंडीचा रंग लावला जातो. त्या दिवशी गावातील काही लोक सोंग घेऊन, वेग वेगळे रूप घेऊन, नाच करून पोसत / फगवा गोळा करतात आणि त्यानंतर एकत्र बसून मेजवानी केली जाते. शिमग्याच्या दिवशी अशी प्रथा आहे की शेजाऱ्यांची एखादी वस्तू लपवायची, प्राथमिकता कोंबडा लपवण्यास दिला जातो, म्हणून ह्या लहान होळीला ’कोंबड होळी’ असेही म्हटले जाते. लहान मुलांना विविध नाच आणि सोंगकरण्या साठी एक प्रकारची पर्वणीच असते.
आपल्याकडे होळीला उत्तरभारतासारखे रंग खेळले जात नाहीत. त्याऎवजी धुळवड(धुलिवंदन) आणि रंगपंचमीला रंग खेळले जातात. रंगपंचमीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जीवनातले वाईट रंग झटकून देवून नवीन उमेदीच्या रंगाने रंगून जावे तसेच एकमेकांमधील व्देषाचा रंग घालवून परत एकदा एकमेकांना प्रेमाच्या, आपुलकीच्या,मैत्रीच्या रंगात रंगवावे हाच या मागचा उद्देश.
आपलॆ हॆ पुर्वापार चालत आलेले सण,उत्सव प्रत्येक सणांमागील विविधपद्दती आपण जपल्या पाहिजेत.आधुनिकीकरणाच्या या युगात आपल्या उत्सवांचा तोच थाट, तीच शैली आपण जपली पाहिजे. अनं हे उत्सव किती मंगलमय वातावरणात सर्वांच्या सोबतीने आपण साजरे करु यांकडे लक्ष पुरविले पाहिजे.
पण हे सर्व करत असतांना काही महत्वाच्या बाबींकडॆ ही आपण लक्ष दिले पाहिजे. जसे की,होळीच्या निमित्ताने दरवर्षी बेसुमार वृक्षतोड केली जाते. आपल्या काही क्षणांच्या आनंदासाठी कितीतरी वृक्षांचा आपण बळी देत असतो ही वृक्षतोड थांबवून आपण होळीसाठी वाळ्लेली लाकडॆ वापरली पाहिजॆत.’एक गाव एक होळी’ यांसारख्या संकल्पना रुजविल्या पाहिजेत.जेणेकरुन एकाच गावात अनेक होळ्या साजऱ्या करतांना वापरली जाणारे लाकडे वाचतील.धुळवड(धुलिवंदन),रंगपंचमी ह्यासारख्या सणांना रंग खेळायला हरकत नाही पण रंगामुळे डोळे,कान,नाक यांना अपाय होत असेल तर तो रंगांचा बेरंग नाही का?रंगातल्या रसायनांमुळे डोळ्यांना इजा होऊ शकते क्वचित अंधत्व येऊ शकतं त्वचेचा आजारही जडू शकतो.हे सर्व टाळण्यासाठी कृत्रिम रंगाऎवजी नैसर्गिक रंग वापरले पाहिजेत.

आपण जर अशाच काही छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या तर आपल्या आनंदाला कुठेही गालबोट लागणार नाही आणि आपण आपले सणवार अशाच मोठ्या उत्सहात, दिमाखात साजरे करु शकू. अश्याच आनंदमय अन मांगल्यमय वातावरणात यंदाची होळी इकोफ़्रेन्ड्ली साजरी करण्यासाठी आम्ही आयुशच्या वतीने प्रयत्न करत आहोत.
मग देणार ना साथ?
अधिक माहितीसाठी संपर्क साधा. ayush@adiyuva.in
AYUSH let us do it together – www.do.adiyuva.in

दोन मिनीट वॆळ आपल्याला, आपल्यासमाजासाठी काही करण्यासाठी?

नमस्कार!
दररोजच्या या धकाधकीच्या जीवनात आहॆ दोन मिनीट वॆळ आपल्याला,
आपल्यासमाजासाठी काही करण्यासाठी?

अजुन किती दिवस आपण आरक्षणाच्या कुबड्यांवर आपली प्रगती साधणार आहोत?
का नाही प्रगतीसाधत आम्ही स्वताच्या कर्तृत्वावर? आरक्षणाचा फ़ायदा मात्र सर्वजण उचलतो मात्र ज्या समाजामुळॆ हॆ आरक्षण मिळत आहॆ त्याच्या प्रती आपलॆ काही कर्तव्य आहॆ हॆ विसरत चाललो आहोत. हक्काची टिमकी वाजवणारॆ आपण, आपल्या कर्तव्याकडे मात्र सपशॆल पाठ फ़िरवतो.

आपण आदिवासी निसर्गाचे राजॆ....
अनं तो निसर्ग आणि त्याचा विकास करण्याची जबाबदारीही आपलीच आहॆ. माझी संस्कृती जॆ माझ्या मनाचॆ प्रतिक आहॆ,माझी आदिवासी संस्कृती जी विविधतॆनॆ नटलॆली आहॆ त्या संस्कृतीचे जतन करण्याची सर्वस्व जबाबदारीही माझीच आहॆ,ही भावना आपल्या प्रत्यॆकाच्या मनात असली पाहीजॆ.

आजकालच्या ह्या शहरीकरणात निसर्गाचा समतोल कुठॆतरी बिघडत चालला आहॆ.ह्या शहरीकरणात आपली संस्कृती हरवुन जावू नयॆ म्हणून आपणच प्रयत्न कॆलॆ पाहिजॆ. पिढ्यानपिढ्या चालत आलॆल्या परंपरांचे हॆ दॆणॆ आपणही आपल्या पुढच्या पिढीला दिलॆ पाहिजॆ,
यॆणारया नवीन पिढीला आपल्या चालीरीती,भाषा अनं विविध गोष्टींची माहिती आपणच दिली पाहिजॆ आणि आपल्या संस्कृतीचॆ जतन कॆले पाहिजॆ.
मी दररोज ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे माझ्यावर अनन्य उपकार आहॆत.त्यांच्याप्रती आपली उद्दात भावना असली पाहिजॆ मी ह्या समाजाचा ऋणी आहॆ. मी समाजाचॆ काही दॆणॆ लागतो ह्या गोष्टीची जाणीव झाली तर नक्कीच आपण विधायक कामॆ करु शकतो.

आपण स्पर्धॆत धावत धावत पुढॆ आलो आहोत कुठॆतरी यशस्वीही झालो आहोत अन् अजुनही प्रगतीपथावर वाटचाल करत आहोत.
पण त्यांचॆ काय? ज्यांना अजुनही प्रगतीच्या गावचा रस्ताही माहीत नाही.अशा आपल्याच लोकांचे वाटाडॆ होण्याची जबाबदारीही आपलीच आहॆ
एक सामाजिक बांधिलकी म्हणुन तरी. आपलॆ कितीतरी समाजबांधव अजुनही मागॆच आहॆत.त्यांनाही आपल्याला प्रवाहाबरोबर आणायचॆ आहॆ.
त्यांच्या डोळ्यात असणारया स्वप्नांना नवचैतन्याची सुखाची पहाट आपणाला दाखवायची आहे.
हॆ करतांना एकटयानॆ चालून उपयोग नाही तर ’एकमॆकासह्हाय करु अवघॆ धरु सुपंथ’ ह्या उक्तीप्रमाणॆ कार्य करावॆ लागॆल

आपण ’आयुश’ च्या रुपानॆ हे कार्य करत आहोत. आयुश बद्द्ल थोडक्यात सांगायचे झालॆ तर.....
आयुश म्हणजे आदिवासी तरुणांनी एकत्र येऊन आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशासोबत, आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या सामाजिक यशासाठी आणि सामाजिक जाणीवा करून देण्यासाठी उभारलॆलॆ एक हक्काचॆ मुक्तव्यासपीठ आहॆ. जिथॆ तुम्ही तुमच्या विचारांची मुक्तहस्तानॆ दॆवाणघॆवाण करु शकता अन आपल्याकडॆ असलॆल्या कौशल्यांचा उपयोग आपल्या समाजासाठी कसा करता यॆईल याचा तपशील मांडु शकता.
थोड्क्यात आपली अखंड आदिवासी एकता टिकवून आपल्या समाजाचे ऋण फ़ॆडण्यासाठी कॆलॆला हा प्रामाणिक प्रयत्न.

आयुश च्या ह्या क्षितीजभरारीला तुमच्याही सहकार्याच्या पंखाचॆ बळ मिळावॆ अशी आम्ही आशा करतो
अन नक्कीच सर्वांच्या सोबतीनॆ समाजाला पुढॆ नेण्यास मोलाचॆ कार्य करु शकतो.
मग देणार ना साथ?

या समाजोपयोगी कार्यात सहभागी होण्या साठी येथे टिचकी मारा – www.in.adiyuva.in
आयुश विषयी अधिक माहिती साठी येथे टिचकी मारा – www.do.adiyuva.in

AYUSH picnic cum get together Jan 2011

[Discussions] i was so impress that we have our own website - ravindra balashi

discusssion between Ravindra, just for your information -----


----------------------------------------------------
Mail from ravindra


hi, ayush
my self ravindra hira balshi from vangaon, last time i was going to kasa in between at vaghoba near sakhara dame i just see to your ayush postar., i was so impress that we have our own website. actually i have recently registard own trust the is "ABHINAV ADIVASI VIKAS SANSTHA' for that kind of social works.


ok, now we are daily conect with us.


meet you tomorow
good night subh-ratri.


---------------------------------------------------------------
Reply by AYUSH






Hi ravindra


Far bes vatala tujha mail nangun. Apale faar kavha payasi AYUSH ye navan kaam karatuhu. AYUSH mhanje apale kadale sikel lokhana ekatra anun gavat navin pora sikatahat tyana margdarshan madat karaya sathi aple chalu kelata....

Aapale samaja sathi faar sanstha/sanghatahna/ngos/nete/party kaam karatahat. Pan jo to apapala svarth nagtaha ... kunala ho mana payasi apale samajacha padel nay. Tay tya sathi khas apale lokana, konata ho rajkaran na anata kiva konatya he sangahatneshi bandhil na rahata fakt adivasi ya natyane saglyana ekatra anayacha ahe tya sathi AYUSH aahe...


Mehyan tujhe mahiti sathi junya mails pathvalyata mana vatel parat lihasil kaay... pan tujhyan mail nay pathavalas... lihajos vel milal tavha

Far bes vaatala. Bes rehe


AYUSH group
http://www.adiyuva.in/

------------------

reply by Ravindra


hi, ayush,
aj parat vel milala manun net var basloy diwalichya sammelanabaddalcha mail vachla mazhe sahkary nakkich rahil. thite me avarjun upasthit rahin.


marg khup chagala ahe aplya kade, pan ha tar fhakt pri-lounching plan ahe, khari boom tar tevha hoiel jewha apan kharach ayushachya madhyamatun ekatra yeun samajarathi ashi kahi kamgiri karun dakhau ki jyachya apla samaj lavkarat lavakar mukhya pravahat yeun compitionchi barobari karayla shikel, shekdyatun nust ek doghani highly educated asun samaj pudhe yenar nahi, aplyala kam karaychach ahe tar te haighest numbars sathi nako, highest quantity sathi asayla pahije, samajat changlya rudhi ahet tya tashyach jopasayla pahijet pan tyach barobar vaitachahi vichar karayla survat whayla havi. mastarachi 2 por english medium la na gavatli bakich sembadi por marathi salet fhakt khichadi khayla, he chitra badlav lagel.


mi hech manat nahi ki evadh badal, samaj ghadun annil, pratakshat "BADAL" hach ek marg apla vikas ghadaun anil. badal-navya adhunik vicharancha, badal- ek unnat smajache swapna pahnyacha, badal pratekane swatala tyacha gharasathi, tyachaya samajasahi hitache ase kam karanyacha, ani...........BADAL " A HE KAY ADIVASI SARKHE KAPADE GHATALES AJ",-aj hi ase shabd sarras kanavar padtat,yala kahihi mana, kiva aplya samajabaddal lokana tyancya soinusar vatnara kivha patnara vichar. ha vichar ha achar hi pratha, badalnara badal havay aplyala.


2jatiche manse tyanchya bolnyat maskarit bolat astat 'to sala adivasi kadhi sudharnar nahi'. tevha tyacha bajula jar apan tya veles ubhe asu tari apali himat hot nahi tyana mhanayla ki- 'tu tyala kay mantos adivasi mi pan tar adivasich ahe'. ka?????????????????ka? apan marepayant lokanchya nindechacha vishay banun maraych ka? mag kay upyog jar aplyapaiki ek doctor ahe, kay upyog jar ek vakil ahe, ek enginner ahe,. sorry i m not harting anybody,


pan tumhi calculate kara attaparanyat aplya jatiche kiti log govt. job madhe ahet for example-teacher, clerk, nurse, policmen,defence, gramsevak, talathi, ravsaheb,bahusaheb, kiva profesion madhe engineer, doctor, advocate, loyer, kiva rajkarnat sarpanch, nagarsevak,nagradhyaksha, sabhapati, amdar, khadar, mantri. mala vatate ya sarva haighly job person, high power in politics lokanpudhe ashi var sagitlya pramane "adivashi"chi shivi kadhi eykayla milali nasel kay???????????


kadachit ho, maunach dheri vadhavun sut butat, safari ghalun, safari kar madhun electionchya veles gava-gavat lokanna party sathi paise vatnarya thane jilhyatlya adivasi netyana aplya samany lokanchya "SWABHIMANACHI" kasli ali kimmat.

ha adivasi na, ha mag padu de tyala tasach jaminivar daru piun. tyacha samaj jitka kal daruchya naset rahil, jitka vel ya andharat ratil tika apla fhayda, he vichar jase rajkarnya lokanche, tasech govt, la chitaknaryanche, tech, etar jativalyanche. mag kay khak badala apla samaj. mandiratli ghanti jasi yenara pratek jan vajvat asto, tasach aplya samajacha ghanta varshanu varsh ashach vajat ahe jasa pahila vajat hota.


kashi honar pragati ethe lamb-lamb parayat nusta andhar ahe kalakutta andhar khandalyachya bogdya sarkha lamlachak. aplya patila punjalela prakasha ek kiran hi aplyasati 8va acharyach asel. he sagal aplyala ata baas zhalay kharch ata kiv yetey. ata kutuntari badala vat dyalal havi.


asya bakal paristhit nachun gaun kam honar nahi,


we wont change in actual real life of tribe people, what they 'NEED'. so gyues find out the need of our people.


much more things i have to discuse us, more things i have to told us, what i fill to our tribe.


but nessesary we have more time to discuse all things each other.


so always i keep in touch with us.
meet you, again
thanks to reply


and give details of our culturer programm detials.
dont be angri if i take mistake in this non-sense launguage.


SUBHARATTRI.


------------

reply by AYUSH

नमस्कार रवींद्र
मेल बघून खूप बरे वाटले, आणि खूप कौतुक हि कि आयुश स्थापन करत्या वेळेस जसा विचार केला गेला होता तसा विचार करणारे कुणी तरी आहे.


तू लिहिल्या प्रमाणे सगळे मुद्दे अगदी बरोबर आहेत. फक्त नाच गाणे करायचे नाहीये ! खूप काही करायचे आहे... पण हे सगळे करण्या साठी वातावरण निर्मिती आणि जागरुकता आणणे गरजेचे आहे ... ह्या विषयी अधिक माहिती देण्या साठी काही उदाहरण देत आहे.... अशा करतो समजून घेशील ...


हो तू सांगितल्या प्रमाणे हि प्राथमिक पायरी आहे. म्हणून वेगवेगळी मते, ओळख , सामायिक मते, ध्येय ठरवणे, वेग वेगळ्या लोक पर्यंत पोहचून लोके जोडणे ह्या साठी आपण वेग वेगळे कार्यक्रम आखतो. त्या अंतर्गतच मेल्स, एस एम एस, गेट टुगेदर, स्पर्धा, वेब सायीट इ आयोजित करतो. जेणेकरून एक एक पायरीने आपण लोक पर्यंत पोहचू शकुत आणि आपले आपले ध्येय सध्या करण्याचा दृष्टीने प्रयत्न करणे सोप्पे जायील. कारण आज आपल्या समाजात हवे तसे आंतरिक कम्युनिकेशन नाहीये आणि ते आपल्यांना तयार करावे लागेल म्हणून ने आपण अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून करूत.


हो आणि आयुश म्हणून आपण कधी हि इत्तर गोष्टीवर उगाचच जास्त उर्जा वाया न घालवता आपल्या समजा साठी आपण ठरवलेल्या प्रथामिकते नुसार विचार करतो. खरे सांगायचे झाल्यास आपल्या प्राथमिकता आपण सध्याचे आधुनिक जग, भविष्यातील स्पर्धा, नवीन पिढी आणि आपल्या समजा साठी ची भविष्यातील आव्हाने याचा विचार करून ठरविलेली आहेत. उदाहरना खातर सांगायचे झाल्यास येथे लोकांना प्राथमिक गरजा पूर्ण होत नाहीत, चांगले शिक्षण मिळत नाही, नोकरी मिळत नाही, व्यवसायाच्या संध्या विषयी माहिती नाही, रोजगाराचा पत्ता नाही, भविष्याचा काही अंदाज नाही, स्पर्धेचा मागमूस हि नाही अशा ठिकाणी परंपरा, संस्कृती आणि कला असे विषय घेऊन काही करणे म्हणजे वेडे पनाच आहे ना. जर आपण स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभे राहिलो तर नक्कीच आपली संस्कृती पण आपण टिकवू शकुत. संस्कृती आणि परंपरा ह्या सहज होणार्या गोष्टी आहेत, त्या सहज पाने आपल्या दैनंदिन व्यवहारात आल्या पाहिजेत, ओढून ताणून आणता कामा नये! किवा आपल्या परंपरांचे किवा संस्कृतीचे आपल्याला ओझे झालेले नसावे. आजूबाजूच्या परिस्थिती नुसार बदल करवून आणणे हा निसर्ग नियमच आहे ! आणि आपण आदिवासी सोडून आणखीन निसर्गाच्या सानिध्यात कोण असू शकतो !


जसे उदाहरण दारूचे, पारंपारिक पद्धतीने आपल्या सगळ्याच रिती मध्ये दारू असते. पण रिती प्रमाणे ती फक्त धार टाकण्य साठी किवा जास्तीत जास्त पळसाच्या पानाचा एक टोपा बस ते पण नैवैद्य म्हणून पिली जात असे. पण काही कालांतराने त्याचा अतिरेक होऊन आणि आज आपण आजची परीस्तीती बघतोच आहोत. दारू पिणे वायीट असते असे नाही, पण ती किती प्यावी, केव्हा प्यावी, किवा तिला किती महत्व द्यावे ठरवणे महत्वाचे आहे. कोणत्याही गोष्टीची सवय लागणे ह्याला व्यसन बोलतात आणि व्यसन कधीही वायीटच. म्हणून सगळे सांभाळून संयमाने दारू पिणे जमत असेल त्याने त्या मार्गाला जावे. अन्यथा दारू न पिल्याने काही अडते असे काही नाही. मला ह्या सगळ्यात हे सांगायचे होते कि आपल्या संस्कृतीतील बर्याचश्या गोष्टी आपण समजून न घेता चुकीच्या पद्धतीने आचरणात आणतो. म्हणून किमान तरुण पिढीने अशा गोष्टींचा अभ्यास करून योग्य मार्ग निवडावा !


किवा काही पद्धती ज्या आजच्या काळासी सुंगत अशा नाहीत त्यात आपल्या रीतींचा आपले पण टिकवून आजच्या काळाला सुसंगत अशा बनवायची जबाबदारी आपल्या तरुण पिढी वर आहे. आणि ह्याला आपण आपल्या घरा पासून सुरवात करायला हवी. नाही तर आपल्या परंपरा संस्कृती चे विकृत रूप दाखवणारे किवा हि संस्कृती कशी वायीट आहे असे पटवून देणारे आपल्याच समाजातले क्रांतीवीर तयार होत आहेत, त्यांना हेच हवे आहे कि वेग वेगळ्या माध्यमातून आपल्या आदिवासी समाजाचे तुकडे तुकडे करून परिवर्तन करून आणणे. म्हणून सुशिक्षित तरुण पिढीने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा, आजू बाजूच्या कोणत्या हि माणसाकडून काही शिकण्या सारख्या गोष्टी असतील तर जरूर शिकाव्यात पण आपला विकास किवा प्रगती करण्या साठी आपल्या श्रद्धा भक्ती पश्चिमे कडून आयात केलेल्या देवा जवळ गहाण ठेवण्याची काही गरज नाहीये !


आणखीन एक गोष्ट, आजकाल जो उठतो तो एक त्याची संस्था, संघटना काढतो आहे. बरे आहे किमान नवा साठी का नाही पण कुणी तरी समाजाचा विचार करत आहे. पण केव्हा तरी ह्या सगळ्या संघटनांनी आदिवासी समाजाच्या भविष्याच्या दृष्टीने वैयक्तिक स्वार्थ किवा मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे हि काळाची गरज आहे. आणि ज्या दिवशी आदिवासी माणूस हे वेग वेगळ्या संघटनांचे, पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून आदिवासी या नात्याने एकत्र येयील त्य दिवशी आदिवासी विकासाला सुरवात होईल ..... आणि तो पर्यंत आपण सगळे हे प्रयत्नच करत आहोत ! आणि त्या साठी आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे !


-------------------------------
Reply from Sandip
ravindra is absolutely right....aaplyala konihi yeto aani kahihi bolatooo aani aapan phakta aikat bastoo kaa tar aaplyala laj vatate adivasi aahe mhanun sangnyachi....te lok aaplyala shivya naav thevtaat kaa?? karan aapan tyanna naav thevayla jaga thevliy....aapla garib aadivasi kuthetari molmajuri kartooo aani kasabasa pot bharatooo.....tyala mahitich nahi nahi ki jag kuthe challay....tyala phakta pot bharna mahatvacha vatataa.....to motha vicharach karat nahi kaa tar tevdha vichar karnyaevadha experience kivaa dnyan tyalaa nastaa....apli lok nako tithe daru pioon padleli astaat...daru hi aaplya samajapudhil khup mothi samasya aahe....rahila prasna aaplya magasalepanacha....magasalepan he kahi sashvat nahi....pan te ghalavnyasathi vikasacha marg dharnyasathi kuthlya goshti kelya pahijet....he lokanna kalalaa pahije....aaj shikshnala aani gunavattela khup mahatva aalay...tumcha nane khankhanit asel tar tumhala konich adavu shakat nahi....tyasathi jastit jast mulaanna prerit karayla havaa.....aajhi kahijan apaprachar kartaat aaplyatalich lok ki jast shikun kay phayda...aaj me MA jhaloo tari malaa job nahi ase mhananarehi barech aahet pan tyaannahi kuthetari sangaychi vel aaliy ki aaj nusta degreela mahatva nahi tyat tumchi gunvatta kay....aani asa nahi ki Khup shikalaa mhanje nokarich pahije...itarhi chote mothe dhande karoon aapan pudhe javoo shaktooo...pan tyasathi kathor parishramalaa paryay nahi.....aaplaa problem kay aahe we do less and expect more......tar kasa milel vikas aaplyala....aaple yuvahi cricket ,drinking, lagna hyachyach mage distaat....me saglyanbaddal nahi bolat pan cricketcha tar phyadach aahe tyanaa kuthetari sangitalaa pahije ki what is our aim and which way vr going?


ataj aaplyakade ashi barich mulaa aahet ji sports madye khup pudhe javoo shaktil tyannahi platform milanyasathi aapan prayatna karaylaa havet specially athleticsmadhye aapli por khup pudhe javoo shaktil....pan tyanna kuthetari platform milayla havaa....aaj sportsla khup changle divas aalet....tyacha phayda aapan ghetalaa pahije.....tazaa example aahe Kavita rautcha.........shevati aapan evadha pudhe jaylaa havaa ki konachi himmat nahi honaar aaplyA shivi dyaychi!


Thanks & regards.

Sathe Sandeep.

--------------------------

to reply above topic please send it to ayush@adiyuva.in

requesting you to share your opinion if any , send it at ayush@adiyuva.in

Proposed Career Guidence Program (Seeking Support)

Find us on Facebook

Dahanu Mahalaxmi Yatra