Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva
Showing posts with label Adiyuva. Show all posts
Showing posts with label Adiyuva. Show all posts

Save Tribals | Bogus Hatavo Adivasi Bachavo

चलो आपण आपल्या मित्र परिवारा सोबत सहभागी होवून आदिवासी एकात्मता मजबूत करूयात 
 
बोगस हटाव आदिवासी बचाव कृती समिती, नाशिक 

सर्व खऱ्या आदिवासींचा विराट मोर्चा

२१ सप्टेंबर, सकाळ ११ वाजता 
स्थळ : गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक

Join Event : https://www.facebook.com/events/168080116715473/

आदिवासी समाजात वाढत असेलेल्या एकात्मता आणि सामाजिक प्रश्ना बद्दल जागरूकता कौतुकास्पद आहे या करिता आपणा सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्या साठी एकत्रित सकारात्मक आणि सहकार्याची भावना ठेवणे महत्वाचे आहे. आदिवासी युवकांना / संघटनांना एकत्र येवूया आणि आदिवासी एकता या साठी अडथळे दूर करूयात. आणि त्या दृष्टीने जर सकारात्मक आणि सहकार्याची भावना नसलेल्या विचार पासून आदिवासी युवकांनी सावध राहावे !

मला बदललेल्या देशाबरोबर चालणारा आदिवासी बघायचा आहे...

या देशात स्वातंत्र्य आहे, हे एक नेहमीचंच नियमित वाक्य....शुभ्र कपड्यातील तथाकथित आपणच निवडून दिलेल्या पांढरपेशा लोकांनी ग्रासलेला हा देश....ख-या स्वातंत्र्यासाठी अजूनही विव्हळत आहे....लहानपणी वाटायचं जग बदलण अगदी सोप्प आहे....१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला शाळेत मिरवणूक निघायची...मागे भली मोठी ठिगळांची खाकी इजार एका हातानं सावरत आम्ही त्यात उत्साहाने सामील व्हायचो.... उरामध्ये प्रचंड स्वाभिमान घेऊन अगदी बेंबीच्या देठापासून "भारत माता....कि जय"चे नारे द्यायचो. लहानपणी ब-याच खोड्या देखील करायचो पण मनामध्ये नेहमी एक भीती असायची की चूक केली तर शिक्षा होईल. शिक्षकांची, पालकांची, वडिलधा-यांची एक भीती असायची; म्हणून वाटायच ख-या देशात देखील असंच सरकारला आणि न्यायाला भीत असतील लोक....पण जसा जसा या सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये कधी आश्रमशाळांमध्ये...तर कधी वसतिगृहांमध्ये मोठा होत गेलो तसं तसा खरा भारत दिसायला लागला. त्याबरोबर या वृक्षराजीमध्ये आपले अस्तित्त्व अबाधित ठेवणारा माझा माय-बाप आदिवासी समाजही दिसू लागला.

आदिवासी घाबरतात पण न्यायाला नाही तर जे लोक आपल्या खिशामध्ये न्याय घेऊन फिरतात त्यांना. दिवसा ढवळ्या या देशाला लुटणा-या लुटारूंना, आणि या भारत मातेच्या अब्रूचे धिंडवडे उडवणा-या सैतानांना. जंगलतोड करून माळरान उजाड करणा-या हैवानांना. जागोजागी धरणे बांधून आदिवासींचे अस्तित्व संपुष्टात आणणा-या पांढरपेशांना. आमच्या आया-बहिणींवर अत्याचार करणा-या नराधमांना. अजून इथे आम्ही आता घाबरतोय आमच्यातीलच शिकलेल्या परंतु सामाजिक बांधिलकीच्या संवेदना न जाणणा-यांना....

आज देशात कुठेही एखादे प्रमाणपत्र काढायचं झाल तर जिथे २ दिवस लागायचे तिथे ७ दिवस लागतात कारण काय तर कामाचा बोजा, आणि ५० रुपये पुढे केले तर २ दिवसाचे काम २ तासामध्ये होते. कारण काय तर पैसा. पुढे कळायला लागला हा पैसा ह्या लोकांच्या घरात जात नाही तर दारूच्या दुकानात जातो, यांच्या मुलांच्या डोनेशन मध्ये जातो, ५०-५० रुपयांचा भ्रष्टाचार वेगळाच, पण १००-१०० हजार करोड रुपयांचा घोटाळा ही होतो.... हे लक्षात यायला लागल. आदिवासींच्या योजनातर अनेकदा कागदावरच राहतात आणि आमची लेकरं कोवळ्या पानगळीसारखी कुपोषणाने मरतात...मरत आहेत...कि मारत आहेत या योजना. आजवर विकासाच्या नावावर करोडो रुपयांची अगदी राख रांगोळी झाली, पण विकासाचा लवलेशही अजूनपर्यंत आमच्या आदिवासींच्या नशिबाला आला नाही......भारतीयांचा कदाचित थोडा फार चेहरा मोहरा बदलला असेलही....पण या डोंगरद-यात आपले वास्तव्य करणारा हा माझा आदिवासी समाज....याच्या स्वातंत्र्याचे काय....आजही तो एकवेळच्या भाकरीसाठी व्याकुळ आहे.....विव्हळत आहे.

निवडणुका म्हणजे आमच्या देशात राष्ट्रीय सणासारख्या झाल्या आहेत, दर वर्षांनी, महिन्यांनी कसली न कसली निवडणूक घ्यायची, लोकांच्या कल्याणाची भाषा करायची, आदिवासींना तर आश्वासने देणं खूप सोपं असतं....कारण देणारा आमच्यातीलच कोणी एक आहे अशी आमची गोड समजूत असते. आम्हीही ती ऐकायची आणि टाळ्या वाजवून पुन्हा ये रे माझ्या मागल्या! तेच ते चालू आहे, १ नाही २ नाही गेली ६७ वर्षे आम्ही तेच ते बघतो आहोत. स्वतंत्र भारतात तीन पिढ्या बदलल्या पण आमच्या समस्या त्याच होत्या आणि आज ही त्याच आहेत; नाही नाही त्या वाढल्या आहेत. देशाच्या प्रगतीबरोबर आमच्या समस्यांची प्रगती होत आहे. किती हा विरोधाभास..... किंबहुना त्या समस्यांनी आता महाकाय स्वरूप घेतलं आहे. देश तर स्वतंत्र झाला, पण आम्ही अजून ही गुलामच राहिलो. स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःलाच लढावे लागते, स्वताच्या जमिनींसाठी...हक्काच्या नोक-यांसाठी....आमच्या वनांसाठी....पण लढणे म्हणजे काय हेच आता आम्ही विसरलो आहोत. आता तर काही ठिकाणी आमच्या समाज बांधवांच्या दोन कानांवर दोन बंदुका आहेत. एक आहे पोलिसांची आणि एक नक्षल्यांची. कोणालाही साथ द्या...शेवटी बेवारस मरण नशिबाला.....मग कुठे आहे स्वातंत्र्य...कोणाकडे आहे. कोण विकतं...पण त्येवढं पैसं कुठं हाय मजजवळ..... मग मी मनानं..संस्कृतीनं...कलेनं श्रीमंत असणारा आदिवासी...गरीबच ना? नाही मिळत अजूनही उत्तर..!! जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त झालेली गर्दी पाहून डोळे पाणावले होते यावर्षी....खरच हा आदिवासी समाज काही तथाकथित लोकांसाठी किती मोठं भांडवल आहे.

कुठे तरी एक छान वाक्य ऐकलय, आपलीच गाडी आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, फ़क़्त एवढ्या पुरतेच भारतीय मर्यादित राहिले आहेत. परंतु या भारतीयांमधील आदिवासींना आपल्या बायकोला पुरेसे अंगभर कपडे घ्यायचीसुद्धा ऐपत नाही. आमच्या पोरांना आश्रमशाळेत कपडे मिळतात म्हणून ती तरी इज्जत झाकली जाते नशीब. कदाचित दोनवेळचे जेवण आणि अंगभर कपडे एवढ्यासाठीच आमची पोरं आश्रमशाळांमध्ये जात आहेत... अन्यथा आज त्याठीकानीही काय चालते..कोणाची पोळी भाजली जाते तेवढी समज आलीय. पण करणार काय....शेवटी आदिवासी....!!!

रोज अन्याय होतो म्हणून प्रत्येक जन रडत असतो, झोपडीत राहणा-या सामान्य माणसापासून ते मोठ मोठ्या उद्योगपतीन पर्यंत सर्वच्या सर्व फ़क़्त आणि फ़क़्त रडत असतात, पण कधी ही कुणी पेटून उठत नाही, कधी कुणाची हाक ऐकू आलीच तर आम्ही साधा प्रतिसादसुद्धा देत नाहीत. स्वतंत्र भारतात आम्ही गुलाम आहोत अज्ञानाचे, भ्रष्टाचाराचे, बेरोजगारीचे, निरक्षरतेचे, धर्मांधतेचे, अंधश्रध्येचे आणि जाती पातीने ग्रासलेल्या घाणेरड्या मानसिकतेचे. आदिवासींनाही हि मानसिकता लागू पडते. कारण आज आमच्यातही काही शिकून मोठ्या पदावर पोहचलेत. परंतु आदिवासींवर होणारा अन्याय त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसत नाही....गेंड्याची कातडी डोळ्यांवर ओढून घेतलीय..त्यांना या सामाजिक संवेदना जाणवतच नाहीत....काही आहेत अपवाद...पण अपवादाने ते तोकडे आहेत आज.

सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास असणारे आम्ही एवढे निष्प्राण, निस्तेज कसे? कधी ऐकू येणार ती आरोळी, भारत माता की म्हंटल की एका आवाजात "जय" चा उदघोष करणारे आम्ही.... कधी 'जय आदिवासी', 'एक तीर एक कमान...सर्व आदिवासी एक समान' असा जयजयकार करणार? प्रत्येकाने आपल्या लहानपणी पाहिलेले भारत देशाचे स्वप्न आणि त्याबरोबर आदिवासी हितसंबंधांचे स्वप्न कधी साकार होणार? ज्या महापुरुषांची भाषणे आम्ही द्यायचो, ऐकायचो कधी त्यांच्या विचारांना आम्ही आमच्या जीवनात खरं स्थान देणार आहोत? बिरसा मुंडा, उमाजी नाईक, तंट्या भिल्ल, राघोजी भांगरे, ख्वाजा नाईक आदी क्रांतीकारकांचे विचार आम्ही अंगीकारणार? कित्येक स्वातंत्र्य दिन आले, येतील आणि जातील देखील... पण जो बदल सहज घडेल असे कधी वाटायचे त्या बदलाची सुरुवात कधी होणार? कधी पेटून उठणार आदिवासी आपल्या स्वायत्त मागण्यांसाठी?

निराशेने ग्रासलेल्या या आदिवासी समाजाला ख-या स्वातंत्र्याचा सूर्य दाखवायचा असेल तर एक सशक्त आणि ठणठणीत विचारच हे काम साध्य करू शकतो. नशिबाने येणारी नवी पिढी विचार करणारी आहे, जी पिढी स्वतःच्या उत्कर्षासाठी दिवस रात्र मेहनत घेऊन आपलं आयुष्य उभारतात त्या पिढी कडून हा समाजही घडण्याची देखील अपेक्षा आहे. आपल्या सारखे विचार करणारे खूप आहेत, बदलाची आणि ख-या स्वातंत्र्याची प्रचंड भूक लागलेले खूप जन आहेत, म्हणूनच एक नवी आशा निर्माण झालीय...- 'आम्हाला बदलेला देश नाही तर प्रगत देशाबरोबर बदलेला आदिवासी बघायचा आहे'. जे स्वप्न आम्ही लहानपणी बघायचो, त्या निर्मळ स्वप्नासाठी आपल्या प्रत्येकाला आपला सहभाग द्यावाच लागेल. कुठलाही देश किंवा समाज एका रात्री मध्ये उभा राहत नाही, त्यासाठी वर्षानुवर्षे कठोर मेहनत घ्यावी लागते, आमच्या नशिबाने आमच्या महापुरुषांनी ही मेहनत घेतली आहे. गरज आहे फ़क़्त त्यांच्या विचारांची कास धरून नवे पाऊल उचलण्याची, हे नवे पाऊल उचलण्याची प्रतिज्ञा आजच्या या स्वातंत्र्य दिनी घेऊन, हातामध्ये हात घेऊन सबंध देश घेऊन पुढे जाऊया. जमेल तेथे- जमेल त्या प्रकारे- जमेल ते प्रयत्न आदिवासी समाजनिर्मितीसाठी करूयात. प्रयत्न छोटा आहे किंवा मोठा आहे न बघता प्रयत्न करण्यावर भर देवूयात. रोजच तो प्रयत्न होत असेल तर ठीक आणि नसेल होत तर आठवण येईल तेव्हा तो करत राहुयात. पक्ष-व्यक्तीनिष्टांच्या टीकांना दुर्लक्षित करून जमेल त्या प्रमाणात समाजकार्यात सहभाग घेऊयात. संघटना झालीच तर खूप छान, पण संघटना नाही म्हणून थांबायला नको, सुरवात करूयात, इतरलोक काही करत असतील तर त्यांना मदत करूयात. कमीत कमी अन्यायाची जाणीव अज्ञानात खितपत पडलेल्या आदिवासी समाज बांधवांना तर कुणीही करून देऊ शकतो. नाहीच लढता आलं तर अन्याय होतोय याची तरी जाणीव करून देवूयात. कदाचित यातूनच पुढे क्रांतीचे पुढचे पाऊल पडेल.

देशात छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या भिल्ल यासारख्या थोरांच्या विचारांनी पेरलेली आपली मस्तके नापीक होवूच शकत नाहीत... कारण त्यांना वेळोवेळी फुले, टिळक, आंबेडकर यांनी विचारांचे खत घातलय. तेव्हा स्वाभिमानाने, निधड्या छातीने पसरलेल्या अंधाकाराला दूर करण्यासाठी हवे ते प्रयत्न करा.

महादेवकोळी युवा आज प्रत्येक तळमळ असलेल्या आदिवासी युवकांना आवाहन करत आहे. हे पाऊल तुम्हीच उचलण्याची गरज आहे. अथक प्रयत्नाने आणि हजारोंचे रक्त सांडून आपला देश स्वतंत्र झाला; त्यात आदिवासी क्रांतिकारकांचाहि समावेश होता... त्या सर्वांच्या सांडलेल्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला, जमेल तिथे जमेल त्या प्रकारे एक खरा स्वतंत्र भारत आणि स्वाभिमानी आदिवासी समाज निर्माण करण्यासाठी तुम्ही हे पाऊल उचला.
तुम्हाला साथ आहे आमची, आणि आमच्या सारख्या हजारोंची.

-राजू ठोकळ
मी आदिवासी.....माझा मायबाप आदिवासी

९ आगष्ट जागतिक मूळनिवासी दिवस - L K Madavi


Friends, I am posting here my artical on eve of 9 th August International Indigenous Peoples Day celebrated in world including UNO. The Govt. of Maharashtra also celebrated the international festival. Hon'ble Ajit pawar Dy CM and hon'ble Madhukar Pichad, Hon;ble Vijaykumar Gavit Minister of Maharashtra State, were present and in their presency published my artical on eve of this international festival, was held in Nasik on 9th August 2013 in Gayakwad sabhagruh Nasik. Kindly go through my artical and discuss on points raised in artical...........

९ आगष्ट जागतिक मूळनिवासी दिवस
सिंधू नदिच्या तिरावर पहिली इमारत उभी करून आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या भरभक्कम बलबुत्यावर उभा असलेला आदिवासी माणूस हाच या देशाचा ‘मूळनिवासी’’ होय. आपली वेगळी संस्कृती, परंपरा, जीवन पद्धती, वेगळ्य़ा भूभागाचा स्वामी या धरतीचा पहिला आदिवासी माणूस, आजही आपल्या सांस्कृतिक मूल्यांवर उभा आहे . बाहेरून भारतात आलेल्या आक्रमकांनी, आदिवासीचे वैभव व संपन्न जीवन नष्ट केले असले तरी मात्र आदिवासींचे सांस्कृतिक मुल्ये नष्ट करू शकले नाहीत. ती सांस्कृतिक मुल्ये आदिवासीच्या आयडेन्टीटी नांदी ठरली आहे. आर्य आगमनाने आदिवासींच्या पारंपारिक लोकशाहीचा व सार्वाभोमत्वाचा विनाश झाला . त्यानंतर त्यांनी आपल्या वैदिक धर्माच्या ग्रंथात आदिवासींना नकारात्मक अंकित केले. आता आमचे लेखक ब्राह्मणी साहित्यात आपले अस्तित्व शोधताना दिसतात . एकलव्य, रावण, शम्भूक, या सर्व आदिवासीच्या नायकांच्या पराजय इतिहासातून आपल्या प्रेरणा शोधताना दिसतात .
वसाहतवाद

अमेरिकन सर्वोच्य नायालयांच्या न्याय मालिकेत जागतिक कायद्याचा संदर्भ देवून Johanson vs Mithesh (1823) या प्रकरणात , सर न्यायाधीश जाहन्स मार्शल यांनी स्पस्ट केले की, ''Age of discovery'' याच काळात मुळनिवासीच्या मालकीच्या जमिनीवर, युरोपियन वसाहती निर्माण करण्यात आल्या.
Doctrine of Discovery
जग शोधण्याच्या विश्वव्यापी ख्रिश्चन तत्वानुसार, कोलंबस हा अमेरिकेत पोह्चण्याच्या ४० वर्षा पूर्वी पोप संबधीचे दस्तऐवज ''Papal Documents'' तयार करण्यात आले होते. सन १४५२ मध्ये पोर्तुगाल मधील पोप निकोलस V, व्दारा, प्रिन्स अलोफ़न्सो V ( पोर्तुगालचा राजा ), व बुल रोमन ( Bull Roman ) यांना जगामध्ये जी राष्ट्रे ख्रिश्चन नाहीत, अश्या राष्ट्रावर आपले वसाहतवादाचे साम्राज्य स्थापण करण्याचे अधिकार प्रदान करून आपली अधिसत्ता प्रस्थापित करण्याचे आदेश दिले. या सुप्रीम आदेशान्वे ख्रिश्चन राष्ट्र नसलेल्या भागात व्यापार (Trade) करण्यास शोध घेणाऱ्या पर्यटकाना जगभर पाठविण्यात आले. त्यातील एक , कोलंबसने अमेरिकेत पहिले पाऊल टाकले तेव्हाच तिथे वसाहतवादाला सुरवात झाली. त्या प्रमाणे वासको डी गामा ने भारत देशात शिरकाव केला त्याच दिवासापासून भारतातही वसाहतवादाला सुरुवात झाली. ज्या ज्या देशात युरोपियन राष्ट्राद्वारा ट्रेडच्या नावाने पर्यटक सफरीस पाठविण्यात आले, त्या राष्ट्रातील आदिवासीमध्ये वसाहती ( Colonies ) उभ्या करून, त्यांच्या भूभागावर युरोपियन सत्ता काबीज केली. कोलंबसच्या अमेरिकेतील आगमनाने रेड इंडीयन आदिवासींमध्ये वसाहती निर्माण झाल्या. भारतात वासको डी गामा आल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. त्यानंतर ब्रिटीश राजसत्ता
स्थापन झाली. ब्रिटीशानी युरोपियन वसाहतवादाची संकल्पना भारत देशातील आदिवासीवर प्रायोगिग तत्वावर लादली होती . पुढे त्यातूनच आदिवासीच्या भूभागावर वसाहती निर्माण केल्या. ब्रिटीश वसाहत ''Colony''. म्हणजे, आदिवासींना मुख्य प्रवाहाच्या वेगळे ठेवून त्यांच्या विकासाचे मोडेल उभे करणे होय. ही ''डिस्कवरी थ्रेरी'' ख्रिस्चन डामिनन्ट उभारणारे षड्यंत्र होते. भयंकर शोषण, व गुलामगिरी लादून, युरोपियान वासाहतवादा व्दारे आदिवासीचे ५०० वर्षे शोषण केले
ब्रिटीश शासनाने Indian Act XIV of 1874 नुसार १९१९ मध्ये विकासाच्या नावाने आदिवासी भागासाठी Scheduled District निर्माण केले. त्या नंतर याच Scheduled District ना ''वगळेले क्षेत्रे'' Excluded Areas आणि ''अंशत वगलेले क्षेत्रे '' Partial Excluded Areas’’ घोषित केले. या क्षेत्रांना तात्पुरते किंवा केंद्रीय विधीमंडळाचे कोणतेही कायदे लागू नव्हते. अशाप्रकारे ब्रिटीश काळात आदिवासींना वसाहतीच्या नावाने विकास प्रवाहाच्या बाहेर ठेवून, इंग्रजानी भयंकर अन्याय केले. त्या नंतर हेच ‘’वगलेले क्षेत्रे’’ व ‘’अंशत वगळेले क्षेत्रे’’ स्वतंत्र भारताच्या घटनेत अनुसूची V व VI च्या स्वरूपाने स्वीकारण्यात आले. भारतीय घटनेतील हेच विकासाचे मोडेल, स्वातंत्राच्या ६६ वर्षा नंतरही आदिवासींना एक आव्हान म्हणून उभे आहे.
आदिवासी आणि स्वतंत्र भारताची घटना
भारत देशाची घटना, आदिवासींना आदिवासी म्हणीत नाही. तर आदिवासींना '' अनुसूचित जमाती'' म्हणते. अनुसूचित जमातीचा अर्थ आदिवासी होतो, असे जगातल्या कोणत्याच शब्दकोषात सांगितले नाही. कोलंबसच्या आगमनाने, जगात वसाहती निर्माण झाल्या. ज्या देशात युरोपियन वसाहती निर्माण झाल्या, त्याच देशातील आदिवासींना ''जमाती'' असे म्हटल्या गेले. खरे तर ‘’जमाती’’ ही संकल्पना युरोपियन वसाहतवादाचीजननी आहे. अमेरिकेतील रेड इंडियन आदिवासीच्या जमिनीवर युरोपियन वसाहतीव्दारा अधिसत्ता निर्माण केली गेली. हे कोलंबसच्या ''डिसकव्हेरी थ्रेरीचा'' एक भाग होता. वसाहतवादामुळे झालेल्या नुकसानाची प्रतिपूर्ती करण्यासाठी अमेरिकेतील आदिवासींना, त्यांच्या जमिनीच्या बदल्यात आरक्षित जमिनी देण्यासाठी अमिरीकेने '' Tribal Reservation Act-1830'' निर्माण केला. आरक्षणाचा कायदा तयार करताना अमेरिकेतील रेड इंडियन आदिवासींना ''जमाती'' ( Tribes ) नाम संबोधन करण्यात आले.
भारतात Tribes शब्दाचा उगम

‘Tribes’ या शब्दाची उत्पत्ती भारतातील कोणत्याही भाषेपासून तयार झालेली नाही. ‘’Tribes’’ शब्दाची उत्पत्ती ग्रीक राज्याच्या रोमन राजाव्दारा झालेली आहे . ''The term ‘’ Tribes’’ originated around the time of Greek city States and the early formation of the Roman
Empire. The Latin term ‘’ tribus’’ has since been transformed to mean.'' ( By Robert J. Gregory.) भारतामध्ये ब्रिटीशव्दारा प्रशासनाने आदिवासीना गुन्हेगार ठरविणारा कायदा गुन्हेगारी जमाती कायदा -१८७१ (Criminal Tribal Act 1871) निर्माण करण्यात आला. अशा प्रकारे १८७१ मध्ये आदिवासींना ब्रिटीश प्रशासनाने आदिवासींना ‘’Tribes’’ असे घोषित केले.
भारतीय घटनेत आदिवासीना वेगळ्या सांस्कृतिक मूल्याच्या व त्यांच्या वेगळ्या वांशिक गटाच्या आधारावर, मूळनिवासी असे व्याख्याबद्ध करणे आवश्यक होते, परंतु तसे झाले नाही. घटना समितीव्दरा दिर्घ चर्चे नंतर, आदिवासींना भारतीय घटनेत काय म्हणावे याचा प्रश्न कायम राहिल्यामुळे हा लवाद प्रिव्हि कान्सिल ( ब्रिटीश सर्वोच्य न्यायालय ) पर्यंत गेला. ब्रिटीश सर्वोच्य न्यायालयाला भंग करून भारतीय सर्वोच्य न्यायालय स्थापण करण्याच्या प्रक्रियेत, आदिवासी व्याख्येचा प्रश्न अनिर्णयीत ठेवण्यात येवून आदिवासीची व्याख्याच तयार केल्या गेली नाही, त्यानंतर युरोपियन वसाहतवादाचे अनुसूचित जमाती ( '' Slavery Code'' ) नावाचा मुकुट तथा गुलामीचे ओझे आदिवासीच्या डोक्यावर बांधण्यात आला. तेव्हाच आदिवासीचे सांस्कृतिक मुल्ये नाकारुन मूळनिवासीचे पूर्णतः अस्तित्व नाकारण्यात आले. यावर भारतीय घटना समितीमध्ये आदिवासीचे प्रतिनिधित्व करणारे मा. जयपाल सिंग मुंडा म्हणतात की, आदिवासीवर ६ वर्षापासून केलेल्या अन्यायाची पुनरावृती स्वतंत्र भारताच्या घटनेत करण्यात आली. हा भारतीय आधुनिक लोकशाहीतील आदिवासीच्या संदर्भातला काळा इतिहास आहे. . डॉ. राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती, पं. जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान , आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार यांच्यासमोर, मा. जयपाल सिंग मुंडा, आपल्या ''Objective Resolution'' या विषयावरील पहिल्या भाषणात आदिवासीच्या संदर्भाने मांडतात की…
‘’Sir, if there is any group of Indian people, that has been shabbily treated it is my people. They have been disgracefully treated, neglected for the 6000 years. The history of the Indus Valley civilization a child of which I am, show quite clearly that it is the new comers most of you here are intruders as far as I am concerned.’’
त्याही पुढे मा. जयपाल सिंग मुंडा यांनी आदिवासींना जंगली म्हणविनाऱ्या घटना समितीच्या सदस्यांना ठकवून सांगितले की, '' तुम्ही आम्हाला जंगली म्हणता? आम्ही जंगली नसून या देशाचे मूळनिवासी आहोत. आताच आपण मला आदिवासी म्हटले. होय मी आदिवासीच आहे आणि आदिवासी असल्याचा मला स्वाभिमान आहे. पण आपण आम्हास, भारतीय घटनेत आदिवासी का म्हणीत नाही ? मा. जयपाल सिंग मुंडा यांच्या या कडव्या सवालावर भारतीय घटना समितीच्या सर्व सदस्यानी मौन पाळले होते. या मौन धारण करणाऱ्यावर मा . जयपाल सिंग मुंडा अतिशय दुःख व्यक्त करतात की, आदिवासीने नकेलेल्या चुकीला, भारताच्या आधुनिक लोकशाहीमध्ये साकारून आदिवासीच्या वांशिक गटाचे अस्तित्व समूळ नष्ट करण्याचे षड्यंत्र उभे केले.

कोलंबसने अमेरिकेचा शोध कधीच लावला नाही.

१९९२ ला कोलंबसच्या सफरीस ५०० वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदाने संयुक्त राष्ट्र संघामध्ये सुवर्ण महोस्तव साजरा करण्यासाठी युरोपियन राष्ट्रांनी ठराव आणला. परंतु युरोपियन वसाहतवादामुळे जगातील आदिवासीमध्ये गुलामगिरीची सुरुवात होवून आदिवासीच्या भूभागावर युरोपियन लोकांचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे निग्रो राष्ट्रांव्दारा या ठरावाला विरोध करून, ठरावालाच उधळून लावले. कोलंबसच्या सफरीच्या सुवर्ण महोत्सवाच्या विरोधाबरोबरच, निग्रो राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्र संघाद्वारा १९९३ हे वर्ष '' मूळनिवासी'' वर्ष म्हणून जाहीर केले. त्यातूनच जगातील वसाहतीचे नि वसाहतीकरण सुरु झाले. कोलंबसने अमेरिकेचा कधीच शोध लावला नाही. अमेरिका होती तिथेच होती. कोलंबसव्दारा जगातील मूळनिवासीवर वासहती लादून गुलामी लादणारी युरोपियन राष्ट्राची एक नीती होती.
मूळनिवासी म्हणजे कोन ?

मूळनिवासीची व्याख्या संयुक्त राष्ट्र संघाव्दारे तयार करण्यात आली. त्याआधारे महत्वाचा उतारा..
Concept of Indigenous People ( Background paper prepared by the Secretariat of the Permanent Forum on Indigenous People) By Jose R Martinez Cobo, Special Rapporteur…

मूळनिवासी म्हणजे …

१) ऐतिहासिक लोकसमूह, जो की स्वभूभागावर वास्तव करीत असून, ज्याच्यामध्ये वासाहातीपुर्व सामाजिक ढाचा उभा आहे, असा लोकसमूह,
२) स्वतःच्या भूभागावर विकसित होवून, इतर लोक समूहापेक्षा वेगळे अस्तित्व टिकवून ठेवणारा लोकसमूह,
३) स्वभूभागावर सामाजिक गट म्हणून वडिलोपार्जित भूभागावर (Ancestral Territory) स्वविकास घडवून आणण्यासाठी, जतन केलेल्या संस्कृतीच्या आधारे भावी पिढीचा विकास घडविणे,
४) आपल्या वांशिक गटाची सांस्कृतिक ओळख जतन करून, त्या आधारे जीवन जगणारा लोकसमूह
५) स्वतःची संस्कृती, सामाजिक संस्था, व स्वन्यायिक व्यवस्था कायम ठेवणारा लोकसमू
असे ऐतिहासिक सातत्य असलेल्या समाज……
अ) वंश परंपरागत मिळालेल्या जमिनीवर किंवा त्याभूभावर वास्तव्य असणे
ब) पिढ्यानपिढ्याने मिळालेल्या जमिनीवर सामुहिक वास्तव्य असणे
क) संस्कृतीमध्ये सर्व साधारणपणे निसर्ग धर्म, आदिवासी जीवन पद्धती, पारंपारिक वेशभूषा, ई.
ड) बोली भाषा, आदिवासीची मातृभाषा ई.
ई) देशात एकाद्या भागात वास्तव्य असलेला किंवा त्या देशाचा एक भाग असावा,
फ) इतर संबधीत बाबी….
स्वओळखीमुळे आदिवासी असल्याचे निदर्शनास येणे,
इतर कोणाचेही हस्तक्षेप न होता, सार्वभौमत्वाचे अधिकार अभातीत असणे
वरील प्रमाणे करण्यात आलेल्या मूळनिवासीच्या व्याख्येत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रिय पातळीवर खालील महत्वाचे निकष स्वीकृत करण्यात आले.
1)स्वनिर्धार्नाचे अधिकार (Self-determination)
२) भूभाग शोधण्यापूर्वी पासूनची ऐतिहासिक निरंतता (Historical continuity with pre-invation) किंवा
पूर्व वसाहती लोकसमूह (Pre-colonial society)
३) अप्रस्थापित समाज (Non dominant society)
४) पिढ्यानपिढ्या पासून मिळालेला भूभाग (Ancestral territory)
५) वांशिक ओळख (Ethnic identity)
या सर्व बाबीचा अंतर्भाव असणारा लोकसमूह म्हणजे ‘’मूळनिवासी’’ होय. या मूळनिवासीच्या व्याख्येमध्ये, पहिले लोक . (First People) त्याची वेगळी संस्कृतीअसून सर्व सामान्य संस्कृती, भाषा, नैसर्गिक पूजा, आपल्या भूभावर वेगळी आर्थिक समाज रचना असलेला समाज होय. हा मूळनिवासी माणूस पृथ्वीवर प्रतिकूल परस्थितीमध्ये जीवन जगतो आहे. गुलामीसम जीवन, जबरन बौन्डेड लेबर बनविल्या जावून भयंकर असमानतामध्ये दरिद्रि, स्वास्थ , मजूरीपासून वंचित होवून जास्तीतजास्त कारागृहात जीवन जगतो आहे.
१९९३ मध्ये जागतिक मूळनिवासीचे वर्ष आणि मूळनिवासीचे दशक, संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर करून जगातील आदिवासी समूहाच्या मानवाधिकाराचे संरक्षण करण्याचे धोरण स्विकारले. मात्र, भारतीय आदिवासींना मूळनिवासीचा दर्जा बहाल करण्यास भारत शासनाची भूमिका नकारात्मक आहे.
न केलेली ऐतिहासिक चूक ( un-doing Historical wrong ) भारतीय आदिवासीच्या माथ्यावर टाकली …

अलीकडेच भारताच्या मा. सर्वोच्च न्यायालयाने, आदिवासींची कोणतीही चूक नसताना त्यांच्यावर भारताच्या आधुनिक लोकशाहीने ऐतिहासिक अन्याय केल्याचे मान्य केले. या संदर्भाने ६ दशका पूर्वीच मा. जयपाल सिंग मुंडा यांनी भारतीय संविधान समिती समोर १९४६ ते १९५० या दरम्यान सातत्याने मांडणी करून ६००० हजार वर्षा पासून आदिवासीवर कसा अन्याय झाला याचे विश्लेषण केले. कैलाश विरुध्द महाराष्ट्र राज्य [२०११]१ एस सी आर - ९४, या सर्वोच्य न्यायालयाच्या निकालात आदिवासीवर झालेल्या ऐतिहासिक अन्यायाबाबत मांडणी करताना भारतातील मूळनिवासी कोण आहेत याची स्पष्टतता केली. भारत देशातील ८ टक्के आदिवासी हेच मूळनिवासी असल्याचे स्पष्ट करून, बाकी ९२ टक्के लोक, टप्या टप्याने बाहेरून भारतात आले असल्याचे स्पष्ट केले आहे. याची पृष्टी करताना मा. सर्वोच्य न्यायालयांनी ऐतिहासिक संदर्भ दिले दिले आहे.
भारत देशात भयंकर डोंगराळ व खोल दरी असा भौगोलिकचा प्रदेश नाही तो सफाट व संपन्न असून भारत देश निसर्गाचे नंदनवन आहे. संपन्न आणि लक्झुरीयस जीवन जगण्याची अभिलाषा घेवून बाहेरून आलेले लोक हे काही काळे गोरे , उंच ठेंगू , लांब व बसक्या नाकाचे, विविध भाषा बोलणारे अनेक धर्म पंथाचे, विविध देव देवतांची पूजा करणारे, विविध जातीमध्ये विभागलेले लोक होत. आता हेच बाहेरून आलेले लोक आदिवासीना मिळण्यात येणारा मूळनिवासीचा दर्जा नाकारीत आहेत. काल पर्यंतचा संदर्भ, द्रविडीयन व असुर लोक हेच मूळनिवासी असल्याचे मानल्या जात होते. परंतु आता या न्यायालयाच्या निकालाने हा संदर्भ खोडून टाकण्यात आला आहे. द्रविडीयन व असुर हे लोक सुद्धा बाहेरून आले असून त्यांची द्रविडीयन भाषा सुद्धा मूळनिवासीची भाषा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारत देशात प्रथम कोण आले याचे भांडवल करून मूळनिवासीच्या व्याख्येला विरोध करणाऱ्याना चोख उत्तर मिळाले मिळाले आहे.

आंबेडकरी आयडेन्टीटी व मूळनिवासी

भारतातील जाती व्यवस्थेला उधळून हिंदूत्तोर आयडेन्टीटी मांडणारा सिद्धांत बुद्ध, फुले, आंबेडकरी वैचारिक आंदोलनातून साकार झाला. डॉ. बाबासाहेबांनी जाती विहीन समाज रचना उभारून धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेबांनी निर्माण केलेले प्रचंड साहित्य हे नव-समाज निर्मितीचे साहित्य आहे.
खऱ्या अर्थाने जगातील महान बंडखोर साहित्यिक बाबासाहेबाशिवाय कोणीच होऊ शकले नाही. आंबेडकरी आयडेन्टीटीने येथील ब्राह्मणी चौकटीला उध्वस्त करून बौद्ध धम्माच्या तत्व ज्ञानावर साकारलेली आंबेडकरी ओळख आहे. त्यात सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय बदलाची नांदी आहे. न्याय, समता,बंधुता या तत्वाच्या आधारे नव ओळख बहाल करणारी प्रकिया आहे. ही आंबेडकरी ओळख विश्वव्यापी (Universal Identity) आहे. स्वताला आंबेडकरी म्हणविणारी काही मंडळी आम्हीच मूळनिवासी असल्याचा दावा करीत आहेत. आता प्रश्न असा पडतो की, आंबेडकरी आयडेन्टीटी मध्ये या मंडळीना कोणती उणीव भासली की ज्यामुळे आंबेडकरी आयडेन्टीटीला सोडून मूळनिवासी म्हणवून घेण्याची धन्यता मानतात ? बहूजन शब्दाला मूळनिवासी संबोधून आंबेडकरी आयडेन्टीटीला दुय्यम स्थान देत आहेत. त्यांनी मूळनिवासी सिद्धांत प्रथम समजून घेण्याची गरज आहे. खरे तर मूळनिवासी थ्रेरि वंश वादावर आधारित आहे. आदिवासी मध्ये वांशिक गण आहेत. आंबेडकरी सिद्धांन्तात वंशवादाला स्थान नाही. परंतू या देशात बुद्धाचा आणि महारांचा सांस्कृतिक इतिहास लिहिल्या जाईल त्या वेळी आदिवासीचे सांस्कृतिक मुल्ये आणि कालचा अस्पृश आजचा आंबेडकरी, यांचे सांस्कृतिक मुल्ये एकाच मुल्यांकित स्तंभावर उभे असल्याचे साकार होईल त्या दिवसी आदिवासी व आंबेडकरी चळवळीचा एक जुटीचा सांस्कृतिक विद्रोह या देशात झाल्या शिवाय राहणार नाही. केवळ मूळनिवासी म्हटलाने आंबेडकरी आदिवासी एकजूटीचा प्रश्न सुटणार नाही

भारतीय आदिवासींना मूळनिवासी ओळख बहाल करण्यास सर्व बाजूनी कोंडमारा

१) या देशात प्रथम कोण आले?

मूळनिवासी म्हटल्याने या देशात प्रथम कोण आले? हा प्रश्न उभा राहतो. कोण बाहेरून आले हे सर्वाना माहित आहे पण कोणत्याच जाती धर्माच्या माणसाची हिम्मत होत नाही की आम्ही बाहेरून आलो असे छाती ठोक सांगण्याची. त्यामुळे या देशात प्रथम कोण आले हा विषय खोचाडपणे पुढे करून जन्मताच मूळनिवासी असलेल्या आदिवासीचा मुद्दा दाबल्या जात आहे.

२) आदिवासीच्या वांशिक गणना घटनात्मक मान्यता नाही.

आदिवासी हा या देशातील सर्व जाती व धर्माच्या लोका वेगळा आहे. आदिवासीत जाती नाही व धर्मही नाही. त्यांच्यात गण पद्धती आहे. ईश्वर व आत्मा किंवा धर्म नाही. ते निसर्ग पूजक आहे. त्यांच्यात वांशिक गट आहेत. ते आपल्या सांस्कृतिक मूल्याच्या आधारावर जीवन जगत आहे. आदिवासीच्या वांशिक गणना घटनांत्मक मान्यता नाही. वांशिक गणना मान्यता देण्यास येथील जाती व्यवस्थेतील प्रस्थापिंताचा नकार आहे.

३) भारताच्या एकूण संपती पैकी ८० टक्के संपती आदिवासी क्षेत्रांत आहे
आदिवासीची जल, जमीन, जंगलाशी, सांस्कृतिक नाळ जुडली आहे. त्यांना अनुसूचित क्षेत्रात अनुसूची बद्ध करून राष्ट्र विकास प्रवाहाच्या बाहेर ब्रिटिशानी ठेवले तसे भारतीय प्रशासनव्दारा ठेवून त्यांचे जल, जमीन, जंगला वरचे सर्व अधिकार नाकारले आहे. पार्याने आदिवासीच्या सांस्कृतिक अधिकाराला नकार दिला आहे. मूळनिवासीच्या संकल्पनेत आदिवासीच्या सांस्कृतिक मूल्याशी जुडलेल्या भूभागाला विशेष महत्व आहे. याच भागात ठेकेदार, प्रकल्प, इंडस्ट्रीज, माइन्स ई. उभारले जावून भारताच्या एकूण संपती पैकी ८० टक्केसंपती फक्त आदिवासी भागात असून सुद्धा, त्यांना या संपती पासून वंचित ठेवून दुसऱ्या बाजूने मूळनिवासीच्या दर्जा पासून दूर ठेवल्या जात आहे.

४) आदिवासी हे हिंदू नाहीत म्हणून मूळनिवासीचा दर्जा नाकारीत आहे

आदिवासी हे हिंदू नाहीत, ते हिंदू कायद्याच्या कक्षेत मोडीत नाही. त्यांना हिंदू कोड बिल लागू होत नाही. मिताक्षरी व दयाभागा हिंदू स्कूल ऑफ थॉट लागू होत नाही. दुसऱ्या बाजूने आदिवासीच्या पारंपारिक कायद्याला मान्यता नाही. आदिवासीच्या परंपरांना ‘’कोडीफाईड’’ करण्यात आले नाही. हे सर्व आदिवासी हिंदू नसल्यामुळे नकारात्मक कृती होत आहे. पार्याने आदिवासी हे हिंदू नसल्यामुळे त्यांना मूळनिवासीचा दर्जा नाकारल्या जात आहे.

५) मूळनिवासी जगातील हे अल्पसंख्यांक आहे

‘’मूळनिवासी आयडेन्टीटी’’ ही सरळ सरळ जागतिक लोक समूहाशी नाते जोडणारी असून ती विश्वव्यापी आहे. या मुद्याला हेरून बामसेफच्या काही मंडळीनी बहुजन शब्दाचे नाव बदलून मूळनिवासी नाव धारण केले आहे. जगात मूळनिवासी हे कधीच बहुजन नाहीत ते अल्पसंख्यांक आहेत. हा मुद्या विसरून आदिवासीसह सर्व बहुजनांना सामाजिक व जाती कट्टीबध्य असलेल्या राजकीय थ्रेरीत ते बांधू इच्छितात. त्यामुळे आदिवासीच्या सांस्कृतिक मूल्याचा विश्वव्यापी लढा उभा होण्यास आळकाठी निर्माण होवून पर्यायानी आदिवासींना मूळनिवासीचा हक्क मिळणाऱ्या प्रक्रियेत बाधा निर्माण करून बहुजनाना मूळनिवासी ठरविण्याचा प्रयत्न करीत आहेत

6] आदिवासी म्हणजे युद्धात जिंकलेले गुलाम
हिंदूवाद्यांना वाटते की आदिवासी आमचे गुलाम, जसे ब्रीटिशाना वाटत होते की जगातील सर्व आदिवासी त्यांचे गुलाम. हिंदुना वाटते की भारतातले आदिवासी आमच्या देव देवतांचे गुलाम, जसे ख्रिश्चनाना वाटते की जगातील सर्व आदिवासी हे येशुचे गुलाम. कोणीही या आणि आदिवासींना लुटा
त्यांना वनवासी बनवा, नक्षलवादी बनवा, मात्र, संवेदनहीन आदिवासीचे रक्त सळ सळ कधीच होत नाही . कारण त्यांची ही मानसिकता गुलामगिरीची बनली आहे. त्यामुळे सर्वाना वाटते की
आदिवासी हे युद्धात जिंकलेले गुलाम आहेत. स्वतांत्रोन्तर काळात आदिवासीच्या सामाजिक चाळवळी उभ्या झाल्या नाही. जे काही आंदोलने उभी झाली त्यांना राजकीय नेत्याचा आशीर्वाद असून, तिथेही गुलामीची मानसिकता दिसते. पर्यायाने मूळनिवासीच्या मुद्यावर सर्व राजकीय मंडळी चुप्पी साधून बसली आहे.

7] भारताच्या आधुनिक लोकशाहीतील ऐतिहासिक चूक

मा. जयपाल सिंग मुंडा यांच्या मते भारताच्या आधुनिक लोकशाहीतील आदिवासीवर ऐतिहासिक चूक लादण्यात आली आहे. ही चूक पूर्व लक्षित प्रभावाने भरून काढणे आवश्यक आहे. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद , पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना मा. जयपाल सिंग मुंडा जाब विचारतात की, ३० मिलियन आदिवासींना मूलनिवासी ऐवजी जंगली संबोधून भारताच्या लोकशाही मध्ये आदिवासीचे मूळत्व नाकारण्यात येते, हा लोकशाहीचा अपमान नाही तर काय.? अनुसूचित जमाती ही संज्ञा युरोपियन वसाहतवादाच्या गुलामीची शृंखला आहे. ही ऐतिहासिक चूक आधुनिक लोकशाहीने स्वीकारली आहे. स्वतंत्र भारताच्या गीतात आदिवासी संस्कृतीचा समावेश नाही. आदिवासी गणाचा एक ध्वज तर गणराज्याचा दुसरा ध्वज असतो, तो आदिवासीं साठी मान्य करावा या मागणीलाही नाकारून भारताच्या आधुनिक लोकशाहीने ऐतिहासिक चूक केली आहे. या ऐतिहासिक चुकीमुळे आदिवासींना त्यांच्या सांस्कृतिक ओळखीला मुकावे लागले. त्यामुळे तो या देशाचा मूळनिवासी असून सुद्धा उपरे व गुलामीचे जीवन जगतो आहे.
सर्वोच्य न्यायालयाच्या निर्वाळ्या नुसार ८ टक्के आदिवासी हेच मूळनिवासी
मा. सर्वोच्य न्यायालयाने दिनांक ५ जाने. २०११ रोजी कैलाश विरुद्ध महाराष्ट्र राज्य, या प्रकरणात ऐतिहासिक पुरावाच्या आधारे निकाल देवून या देशातील ८ टक्के आदिवासी हेच मूळनिवासी असल्याचे ऐतिहासिक सत्य सांगून, या संदर्भात झालेल्या ऐतिहासिक चुकीला घटनाबाह्य ठरवून आदिवासींना मूळनिवासी असे जाहीर केले आहे. त्याची कायद्यात्मक तरतूद होणे गरजेचे आहे.
आदिवासी म्हणजे युद्धात जिंकलेले गुलाम
हिंदूवाद्यांना वाटते की आदिवासी आमचे गुलाम, जसे ब्रीटिशाना वाटत होते की जगातील सर्व आदिवासी त्यांचे गुलाम. हिंदुना वाटते की भारतातले आदिवासी आमच्या देव देवतांचे गुलाम, जसे ख्रिश्चनाना वाटते की जगातील सर्व आदिवासी हे येशुचे गुलाम. कोणीही या आणि आदिवासींना लुटा
त्यांना वनवासी बनवा, नक्षलवादी बनवा, मात्र, संवेदनहीन आदिवासीचे रक्त सळ सळ कधीच होत नाही . कारण त्यांची ही मानसिकता गुलामगिरीची बनली आहे. त्यामुळे सर्वाना वाटते की 8] आदिवासी हे युद्धात जिंकलेले गुलाम आहेत.

स्वतांत्रोन्तर काळात आदिवासीच्या सामाजिक चाळवळी उभ्या झाल्या नाही. जे काही आंदोलने उभी झाली त्यांना राजकीय नेत्याचा आशीर्वाद असून, तिथेही गुलामीची मानसिकता दिसते. पर्यायाने मूळनिवासीच्या मुद्यावर सर्व राजकीय मंडळी चुप्पी साधून बसली आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या निर्वाळ्या नुसार ८ टक्के आदिवासी हेच मूळनिवासी मा. सर्वोच्य न्यायालयाने दिनांक ५ जाने. २०११ रोजी कैलाश विरुद्ध महाराष्ट्र राज्य, या प्रकरणात ऐतिहासिक पुरावाच्या आधारे निकाल देवून या देशातील ८ टक्के आदिवासी हेच मूळनिवासी असल्याचे ऐतिहासिक सत्य सांगून, या संदर्भात झालेल्या ऐतिहासिक चुकीला घटनाबाह्य ठरवून आदिवासींना मूळनिवासी असे जाहीर केले आहे. त्याची कायद्यात्मक तरतूद होणे गरजेचे आहे.
९ आगस्त मूळनिवासी दिवस
जगातील ७० देशात ३७० मिलियन म्हणजे ३७ कोटी मूळनिवासी आहेत. त्यातील १० कोटी आदिवासी हे भारतात आहेत. जगात एकूण ७००० भाषा पैकी ४००० भाषा मूळनिवासी लोकांच्या आहेत. दोन दशका पूर्वी पृथ्वीवर मूळनिवासीचा हिस्सा होता. आता ६ टक्के पृथ्वीचा भाग उपयोगात आणल्या जातो. हे मूळनिवासी लोक जगातील सर्व प्रस्थापित वर्गाच्या अगदी वेगळे आहेत . त्यांच्यामध्ये भयंकर असमानता असून ते दरिद्रीचे जीवन आहेत. जगातील एकूण दरिद्री व गरिबी पैकी १९ टक्के गरिबी मूळनिवासीया मध्ये आहे.
संयुक्त राष्ट्र संघच्या कार्यकारी गटाने जगातील मूळनिवासीच्या मानवाधिकाराचे हनन करण्यात येवून त्यांचे मानवाधिकार नाकारले जात असल्याबाबतचा प्रस्ताव दिनांक ९ आगष्ट १९८२ रोजी संयुक्त राष्ट्र संघात मांडण्यात आला. त्यात आदिवासीच्या मानवाधिकारा बाबत चर्चा करण्यात आली. आदिवासी / मूळनिवासीच्या मानवाधिकारावर चर्चा करण्याचा पहिला दिवस म्हणून जागतिक मान्यता मिळाली. त्यामुळे ९ आगष्ट या दिवसाला महत्व प्राप्त झाले . त्या नंतर १९९३ हे वर्ष जागतिक मूळनिवासी वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केले. ९ आगष्ट या दिवसाला आदिवासी / मूळनिवासीच्या अधिकारा बाबत वाचा फोडली या कारणाने मूळनिवासी दशक जाहीर करण्या बरोबरच दिनांक २३ डिसेंबर १९९४ रोजी ठराव क्र. ४९/२१४ पास करून संयुक्त राष्ट्र संघाने, ९ आगष्ट या दिवसाला जागतिक मूळनिवासी दिवस म्हणून जाहीर केले आहे.
मूलनिवासी दिवसाचे महत्व….
मूलनिवासी दिवसाचे अवचीत्त साधून त्याचे महत्वाचे निकष खालील प्रमाणे ठरविण्यात आले आहे,
१) वसाहतवादाचे नि वसाहतवाद करणे
२) आदिवासीना त्यांचे भूभाग / जमिनी पूर्वलक्षित प्रभावाने अधिकार प्राप्त करून देणे
३) आदिवासीची वांशिक ओळख कायम ठेवणे
४) सांस्कृतिक ओळख प्रस्थापित करून, सांस्कृतिक मूल्याचा जागतिक लढा उभारणे
५) आंतरराष्ट्रीय लोक समूहासोबत सरळ संबध प्रस्थापित करणे
६) स्वनिर्धार्नाचे अधिकार प्राप्त करणे
6 हजार पासून आदिवासीवर झालेल्या अन्यायाची प्रतिपूर्ती पूर्व लक्षित प्रभावाने करून घेणे मूळनिवासी हा दिवस आदिवासीच्या विश्व सांस्कृतिक मूल्याची पुनः स्थापना करण्याचा दिवस असून आदिवासीच्या सांस्कृतिक ओळख स्थापनेचा दिवस होय. मूळनिवासी दिना निमित्याने सर्व भारतीयांना हार्दिक सुभेच्छा ……

Latari Madavi
अड. लटारी कवडू मडावी
३०० एन आय टी प्लॉट, नारी ले आउट रिंग रोड,
नागपूर -- ४४००२६ मो. ९४०५९०००१०

Adivasi Community & Media

मी आदिवासी ! सध्या वाढत असलेली सामाजिक जागरूकता अतिशय कौतास्पद आहे.


एक न उलगडलेले कोडे 

छपाई/इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमात आदिवासी समाजा विषयी बातम्या अभावानेच आढळतात. 
प्रसंगी वर्तमानपत्रात एखादी बातमी दिली तरी त्याची ओनलयीन आवृत्ती न काढण्याचा अलिखित नियम असावा कदाचित. 
वयक्तिक / राजकीय स्वार्थ सोडून आदिवासी समाज हित जपलेला लेख/बातमी आढळून येत नाही 


संदर्भ: स्वायत्त आदिवासी जिल्हा, बोगस आदिवासी, आदिवासी दिन, सुसरी धरण, सलवा जुडूम, ग्रीन हंट, आदिवासी संस्कृती चे प्रदूषण, आदिवासीची नैसर्गिक संपत्ती, इ


सोसियल नेट्वर्किंग चे आभार येथे किमान आदिवासींना त्यांचे मनातले विचार स्पष्ट मांडता येताहेत
 


International Day of the World's Indigenous Peoples


(Langauge English)
(Langauge Marathi)Share VDO with your friends

1) Marathi VDO : http://youtu.be/jAK48O8QI44 
2) English VDO : http://youtu.be/kGF8HfXp5ag 


बस्स झाली दुनियादारी....चला रुजवूया आदिवासी संस्कृती घरोघरी...!

'बस्स झाली दुनियादारी....चला रुजवूया आदिवासी संस्कृती घरोघरी...!

आदिवासी या शब्दातच भारतातील आदिवासी जमातींचे आदिम तत्त्व सामावलेले आहे; परंतु आज आदिवासींच्या आजच्या पिढीला या तत्वांचा विसर पडलेला आहे. भारतीय घटनेत सर्वच आदिवासींना‘अनुसूचित जमाती’ म्हणून संबोधले जाते. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 8.2 टक्के असलेला हा आदिवासी समाज एका संपन्न लोकपरंपरेचा भाग आहे; परंतु इंग्रजांच्या आगमनापासून आदिवासी जमातींच्या स्वायत्त, संपन्न आणि स्वच्छंद जगण्यावर बंधने आली. स्वातंत्र्यानंतर गो-या साहेबांच्या जागी आलेल्या ‘देशी साहेबां’नी आदिवासींचे जगणे असह्य केले. परिणामी आज 10 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेले आदिवासी आपले ‘स्व’त्व हरवून बसले आहेत.
आधुनिकीकरणाच्या, प्रगतीच्या आणि जागतिकीकरणाच्या नावाखाली आपण आदिवासींचा मूळ धर्म, संस्कृती, कला, नृत्य, वाद्य,औषधोपचार अशा सर्वच मौलिक गोष्टींचा त्याग करत आहोत. मूळ आदिवासींना प्रगतीचा पुढचा टप्पा म्हणजे पांढरपेशा वर्गासारखे जीवन जगणे असे वाटते तर अन्य समाजाला या हरवत चाललेल्या आदिवासीपणाची पर्वा नाही. असे विचित्र चित्र आज देशातील सर्वच आदिवासीबहुल भागात दिसतेय. देशभर विखुरलेल्या आदिवासी जमातींमध्ये होत असलेल्या या सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतराचे परिणाम भयंकर आहेत. नेपाळच्या सीमेपासून बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, ओरिसा,पश्चिम बंगाल आदी प्रांतात पसरलेला माओवादी दहशतवाद असो वा ईशान्य भारतातील मणिपूर, नागालँड आदी सीमावर्ती प्रदेशांमध्ये फोफावलेला फुटिरतावाद असो, या सगळ्या दहशतवादी चळवळींमध्ये लढणारे बहुतांश लोक आदिवासी आहेत. आज त्यांच्या हिंसक कारवाया दुर्गम वनक्षेत्रात होत असल्यामुळे आपल्याला त्याची चिंता वा काळजी वाटत नाही. पण उद्या त्यांनी शहरातील ‘सिमेंटच्या जंगलात’ प्रवेश केला तर काय होईल याची कल्पनाच करता येत नाही. आदिवासींच्या भल्यासाठी, विकासासाठी बनवलेल्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यांचे न्याय्य हक्क त्यांना मिळालेच पाहिजेत आणि मुख्य म्हणजे आदिवासींचा विकास करताना त्यांचे आदिवासीपण जपण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. अन्यथा न्युझीलंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया वा अमेरिकेतील आदिवासी जसे ‘म्युझियम’मध्येच पाहायला मिळतात, तशी अवस्था आपल्याकडेही होईल की काय, अशी भीती वाटते.
दुर्गम पाडय़ा-वाडय़ा-वस्त्यांवर विखुरलेल्या आदिवासी समाजाला मूळ प्रवाहात आणणे, हे काम 100 वर्षापूर्वी जेवढे आव्हानात्मक होते,तेवढेच आजही आहे. तरीही हजारो ध्येयवेड्या समाजसेवकांनी आपला धर्म वा तत्त्वज्ञान आदिवासींनी स्वीकारावे, या हेतूने का असेना, आदिवासींच्या उन्नत्तीसाठी प्रयत्न केले. परंतु ते पुरेसे नसल्यामुळे दिवसेंदिवस आदिवासींचे जगणे मुश्किल होत चाललेले दिसते. म्हणून जागतिक आदिवासी दिन साजरा करणे हि प्रत्येक आदिवासी व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे. यावरच आपले भवितव्य अवलंबून आहे.

जागतिक आदिवासी दिवस हि संकल्पना नेमकी काय आहे? हे समजून घेतले तर आपणास हा दिवस साजरा करणे महत्वाचे वाटेल. अन्यथा वेळ येते आणि जाते तसाच हा दिवस सुद्धा जाईल. परंतु असे जर घडले तर मग तो एक आदिवासी म्हणून आपला पराभव असेल. आपण आज अनेक सण-उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे करतो. कधीकाळी निसर्गपूजक असणारे आदिवासी आज गणपती उत्सवसुद्धा मोठ्या आपुलकीने आणि आपलेपणाने साजरा करतात. जर आपण मुलनिवासी या नात्याने विचार केला तर आपली संस्कृती आणि आपली अस्मिता, समाजाचे अस्तित्व जपण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आता खरच 'बस्स झाली दुनियादारी....चला जपूया आदिवासी संस्कृती सारी...!!!' असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.

जागतिक आदिवासी दिवस काय आहे ? हे जर एक आदिवासी म्हणून मला सांगता येत नसेल तर आपण इतरांना काय सांगणार...म्हणून आपण या दिवसाविषयी सखोल ज्ञान करून घेणे गरजेचे आहे.
दुस-या महायुद्धातील चटके सहन केल्यानंतर सगळीकडे जागतिक शांतता, सर्व देशांमध्ये पारंपारिक मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, एकमेकांचे अधिकार व स्वातंत्र्य जपणे, गरिबी हटविणे, शिक्षण व आरोग्य या विषयांवर मोठ्या प्रमाणात विचारमंथन झाले. या विचारांचे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून २४ ऑक्टोबर १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाची निर्मिती करण्यात आली. आज संयुक्त राष्ट्र संघामध्ये अमेरिका, रुस, चीन, फ्रांस, इंग्लंड, भारत असे एकूण १९२ देश सदस्य आहेत. आपल्या स्थापनेस ५० वर्ष पूर्ण झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या असे लक्षात आले कि २१ व्या शतकात ज्याला आपण तंत्रज्ञानाचे युग, संगणकाचे युग असे म्हणतो..., त्या युगात जगातील वेगवेगळ्या देशांमधील आदिवासी समाज उपेक्षितांचे जीवन जगात आहे. गरिबी, अज्ञान, आरोग्य सुविधांचा अभाव, बेरोजगारी, मजुरी अशा अनेक समस्यांनी आदिवासी समाज ग्रासलेला आहे. या विळख्यातून त्याला बाहेर पडायला संधी मिळण्याची शक्यता अधिकच अस्पष्ट आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून सन १९९४ पासून ९ ऑगस्ट हा दिवस "जागतिक आदिवासी दिवस" म्हणून साजरा करण्याची घोषणा आपल्या महासाभेतून सर्व सहभागी देशांना केली. त्यानंतर संपूर्ण जगात मग अमेरिका असो इतर आदिवासी समाज असलेले देश असोत त्यात भारताचाही सामावेस आहे...या सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येवू लागला.
भारतातील आदिवासी समाजाच्या संर्वान्गीण विकासासाठी भारतीय संविधानात महत्वाच्या कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे.

सन १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही शासनव्यवस्था चालविण्यासाठी संविधानाची निर्मिती करण्यात आली. २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान लागू करण्यात आले. भारतीय संविधानात एकूण २२ भाग, १२ अनुसूची आणि ३९५ अनुच्छेद समाविष्ट करण्यात आले. यात सर्वात जास्त अनुच्छेद आदिवासी समाजासाठी आहेत. यात प्रामुख्याने आदिवासी समाजाच्या संरक्षणाचा विचार करण्यात आलेला आहे.
संविधानाने विशेस संरक्षण आणि विकासाठी विशेस योजना देवूनही आज आदिवासी समाजाची किती प्रगती झाली आहे याचा जेव्हा विचार समोर येतो तेव्हा चित्र अतिशय बिकट असल्याचे बोलले जाते. आज वेगवेगळ्या माध्यमांमुळे आदिवासी समाजाचे वास्तव मोठ्या प्रमाणात समोर येत आहे.
आदिवासी समाजाला आज आपल्या सर्वांगीण विकासाऐवजी आपली बोली, संस्कृती, समूहजीवन, मुल्ये, परंपरा, स्वभाव इत्यादींच्या अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. म्हणून जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे. हा आदिवासी दिवस साजरा करत असताना आदिवासींची सांस्कृतिक अस्मिता जपणे गरजेचे आहे. त्यासाठी आदिवासी लोककला, नाट्य, चित्र, शिल्प, आदी कलांचे सादरीकरण वा प्रदर्शन भरविणे गरजेचे आहे. त्यास प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे. आदिवासी बोलीभाषेतील साहित्याला प्रोत्साहनाची गरज आहे. आदिवासी क्रान्तिकारकान्चा गौरवशाली इतिहास जगापुढे मांडून आदिवासी क्रांतीकारकांच्या निष्ठेचा आणि प्रेरणांचा सन्मान होणे गरजेचे आहे. आदिवासी समाजासाठी सरकारने फक्त निधी उपलब्ध करून न देता त्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Raajoo Lakshman Thokal

सामाजिक बांधिलकीची ‘आदियुवा’ चळवळ

सामाजिक बांधिलकीची ‘आदियुवा’ चळवळ

आदिवासी भागातला एक मुलगा कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बीईपर्यंत उच्चशिक्षण घेतो. डहाणू ते मुंबई, मुंबई ते तुळजापूर आणि तुळजापूर ते थेट हैदराबाद असा प्रवास करत ‘हुंदाई’ कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागात रुजू होतो. त्याचा प्रवास नोकरीपर्यंत थांबत नाही. आपण कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय पुढे आलो, अनेक गोष्टींसाठी खस्ता खाल्ल्या तसे हाल शिक्षणासाठी शहरात येणा-या आदिवासी, ग्रामीण भागातील मुलांचे होऊ नयेत, या सामाजिक बांधिलकीने तो ‘आदियुवा.इन’हे संकेतस्थळ तयार करतो आणि त्यातून एक ऑनलाइन चळवळच उभी राहते. सचिन सातवी या डहाणूतील आदिवासी मुलाची ही भरारी. एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करताना उरलेला वेळ समाजासाठी देता-देता तो ‘सोशल आंत्रप्रुनर’ झाला आहे. भारतातील अशाच २० ते ३० वर्ष वयोगटांतील ‘सोशल आंत्रप्रुनर्स’वर ‘बीबीसी’ बनवत असलेल्या माहितीपटात सचिनचाही समावेश आहे.

हैदराबादसारख्या जुनी आणि नवी अशी संमिश्र संस्कृती असलेल्या शहरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कार्यालयातून एक तरुण आपलं काम आटोपून घरी येतो. ताजातवाना होऊन पुन्हा पाच-सहा तास संगणकासमोर बसतो. ‘आदियुवा’शी संबंधित प्रत्येक ई-मेल आणि लिंक वाचतो, मेसेजचं अदानप्रदान करतो. ‘आदियुवा’ ही एक अशी वेबसाइट आहे की, जिच्यावर आदिवासी मुलांसाठी नोकरीच्या जाहिराती, मार्गदर्शन शिबिरं, लेख, आदिवासी समाजाची आजची स्थिती, न्याय-अन्याय्य, पीडित, फसवणुकीचे प्रकार याविषयीच्या बातम्या यांची माहिती असते. ‘हुंदाई’च्या संशोधन आणि विकास विभागात ‘ट्रिम डिझायनिंग’चा विभागप्रमुख आणि व्यवस्थापक असलेला २९ वर्षाचा सचिन सातवी दररोज ती न विसरता अपडेट करतो. तो त्याच्या दिनक्रमाचाच हा एक भाग आहे, असं म्हटलं तरी हरकत नाही.
डहाणूतील वाघाडी गावात जन्मलेल्या सचिनचं बालपण खरं तर सर्वसाधारण आदिवासी मुलांसारखं गेलं. मल्हार कोळी जमातीची बहुसंख्या असलेल्या गावात एकत्र कुटुंबात तो वाढला. वडील शिक्षक तर आई आश्रमशाळेत स्वयंपाकी म्हणून काम करायची. त्याचे आई-वडील नोकरीला असल्यामुळे सगळया कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्यांच्यावरच होती. लहानपणी नदीवर भटकणं, करवंदं खाणं, पक्षी, मासे पकडणं या गोष्टी सुरू होत्या. निसर्गाचा थेट सहवास आणि प्रभावही सचिनच्या जडणघडणीत मोठा होता.
वडिलांची बदली तलासरी तालुक्यात उधवा येथे झाली आणि सचिनच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तिथे नव्यानं आश्रमशाळा चालू करायची होती. या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून सचिनच्या वडिलांचीच नेमणूक करण्यात आली. खरं तर तेच या शाळेचे अधीक्षक, शिक्षक सगळेच होते. या नवीन शाळेत आई स्वयंपाकाचं सर्व काम करायची. एका गोठयातच ३० मुलांची आश्रमशाळा सुरू झाली. सचिनचंही चौथीपर्यंतचं शिक्षण याच शाळेत झालं. या शाळेतील सर्व विद्यार्थी गुरांबरोबर गोठयात झोपत असत. आंघोळ करायला दोन किमी दूर जावं लागे. पाचवीसाठी सचिनने वाणगावच्या जगमोहन महादेवसिंग ठाकूर (जेएमटी) शाळेत प्रवेश घेतला. तिथे वसतीगृहाची सोय होती. घरापासून पहिल्यांदाच लांब राहिलेला सचिन तेव्हा १० वर्षाचा होता. हाही टप्पा त्याला आयुष्यात महत्त्वाचा ठरला. आयुष्यात किती कठोर मेहनत करणं आवश्यक आहे, याचा जाणीव त्याला तिथे पहिल्यांदा झाली.
या खासगी शाळेत विद्यार्थ्यांनाच सर्व कामे करावी लागत असत. उदा. रस्ते, नारळाची बाग साफ करणे वगैरे. दिवाळीची सुट्टी संपवून परत गेल्यावर २५ घमेली सुकं शेण शोधून आणून ते चिकू, नारळाची झाडांना (सेंद्रीय खत) घालावं लागत असे. सचिन याविषयी सांगतो, ‘या सगळया कामांमुळे आणि घरापासून लांब असल्यामुळे मला अक्षरश: रडू यायचं. शेणांसाठी ५-१० किलोमीटर पायपीट करावी लागायची. शेण शोधायला एकाच वेळी शाळेतील सगळी मुलं बाहेर पडत असल्यामुळे शेण संपून जायचं. त्यामुळे शाळा-बिळा सोडून गावी परतावं, असं वाटायचं. पण हळूहळू आत्मविश्वास वाढला आणि तिथली कामं एक नियम समजून मी करू लागलो. या शाळेत जेवणात मोजूनच एकवाटी भात, डाळ, भाजी मिळायची. शिवाय या जेवणाला चव नसायची. म्हणून शनिवारी, रविवारी घरी गेल्यावर जेवणाला चव येण्यासाठी मी घरून चटणी घेऊन जायचो.’
या शाळेला, इथल्या कामांना कंटाळून त्याने पुन्हा उधयाच्या शाळेत प्रवेश घेतला आणि सहावी-सातवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्याने आठवीला तलासरीतील ठक्करबाप्पा विद्यालयात प्रवेश घेतला. ही तालुक्याची शाळा होती. स्पर्धात्मक वातावरण होतं. वसतिगृहात राहून आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. ‘तिथल्या सामाजिक उपक्रमांचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव त्याच्यावर पडला. साडेपाचला उठून व्यायाम करणं, परिसर स्वच्छ करा, असा दिनक्रम असायचा. पण नंतर शाळा आणि वसतिगृहाशी मी एकरूप झालो. इतका की, तीन वर्षे तो शाळेचा आदर्श विद्यार्थी होतो. कळत-नकळतपणे त्याला सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची प्रेरणा इथूनच मिळाली. शाळेबाहेर, तलासरी परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात होते. डॉक्टर, समाजसेवक, चांगल्या नोक-या सोडून नि:स्वार्थीपणे समाजकार्य करणारे, स्वत:ला समाजासाठी वाहून घेणा-या अनेकांशी भेट झाली, ओळख झाली. हे एवढं करू शकतात, तर आपण काही का करू नये, असं मला वाटू लागलं ते याच काळात..’ सचिन सामाजिक बांधिलकीची पेरणी आपल्यात नेमकी कधी झाली त्याविषयी सांगतो.
ठक्करबाप्पा विद्यालयात दहावीला इतर सगळया विषयांसह अतिरिक्त म्हणून सचिनने एलिमेंट ऑफ इंजिनीअरिंग (अभियांत्रिकीचे मूलभूत तत्त्व) विषय घेतला होता. विज्ञान आणि गणितात रुची होती. नववी-दहावीत त्याने बीजगणित आणि भूमितीत सर्वात जास्त गुण मिळवले. गणिताचा प्रश्न फळ्यावर लिहून पूर्ण होईपर्यंत सचिन तो तोंडी सोडवत असे. दहावीला त्याला ६८ टक्के मिळाले. तलासरीत आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये पहिला आला, तर पूर्ण तलासरीत तिसरा. वसतिगृहातर्फे त्याचा मोठा सत्कार करण्यात आला. त्याची चित्रकलाही चांगली होती. तसंच इंजिनीअरिंग ड्रॉईंगही चांगलं होतं. दहावीच्या अभियांत्रिकीची मूलभूत तत्त्वं या विषयामुळे त्याला दहावीनंतर थेट मॅकेनिकल इंजिनीअिरंगच्या मुंबईच्या भगुबाई अभियांत्रिकी महाविद्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणा-या आरक्षणाच्या कोटय़ातून डिप्लोमाला प्रवेश मिळाला.
मुंबईतील अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम चार वर्षाचा होता. सचिन अभियांत्रिकीच्या शिक्षणाबद्दल सांगतो, ‘सगळा अभ्यासक्रम इंग्रजीतून असल्यामुळे सुरुवातीचे तीन-चार महिने काही कळतच नसे. शिक्षक शिकवताना शेजारी बसलेले विद्यार्थी हसायचे म्हणून मीही हसायचा, त्यांच्या हावभावाप्रमाणे स्वत:च्या चेह-यावर हावभाव आणायचो. पण कळायचं काहीच नाही. नंतर हळूहळू सर्व कळू लागलं. शाळेत असताना अभियांत्रिकीची मूलतत्त्वं या विषयाचा मराठीत असलेला अभ्यासक्रमच इंग्रजीतून शिकवला जात होता, हे माझ्या लक्षात आलं.’
महाविद्यालयात असताना तो सुरुवातीला दररोज डहाणू ते मुंबई असा प्रवास करायचा. नंतर जोगेश्वरीमधील वसतिगृहात प्रवेश मिळाला. यादरम्यान अनेक हेलपाटे घालावे लागले. त्यातूनच डोक्यात ‘आदियुवा’ची संकल्पना तयार झाली. ‘मला ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे,’ ही भावना आणखी घट्ट झाली. तिथेच त्याच्यासारखे तलासरी, जव्हार, डहाणूमधून आलेले आणखी दोन-तीन आदिवासी विद्यार्थी भेटले. ‘आदियुवा’चा पाया रचला गेला. पण, ही संकल्पना पुढे नंतर अनेक वर्षानंतर प्रत्यक्षात आली. डिप्लोमात ७४ टक्के मिळाले, पण डिप्लोमानंतरही फक्त सुपरवायझरसारखीच नोकरी मिळेल, असं लक्षात आल्यानंतर ‘बॅचलर ऑफ इंजिनीअर’(बीई) करण्याचा निर्णय घेतला. डिप्लोमा केल्यामुळे बीईच्या दुस-या वर्षात थेट प्रवेश मिळू शकत होता. पण बीईसाठीचा प्रवेश हा खुल्या गटातूनच होत असे. डिप्लोमा करून बीई करणा-यांसाठी केवळ १० टक्के जागा होत्या. गुण कमी असल्यामुळे त्याला मुंबईबाहेर तुळजापूरला मराठवाडा विद्यापीठात प्रवेश मिळाला. तिथली तीन र्वष सहज सरली. सचिन सांगतो, ‘इंजिनीयरिंगमधील डिग्री मिळाली तरी नोकरीची हमी कमीच होती. त्यामुळे पुन्हा डोक्यात विचारचक्र सुरू झाली. त्यामुळे एका दैनिकात जाहिरात पाहून मी हैदराबादला सेंट्रल इन्स्टिटयूट ऑफ प्लॅस्टिक इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी’मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. प्लॅस्टिकच्या वस्तूंचं डिझायनिंग शिकण्यासाठी ‘मास्टर प्रोग्रॅम इन कॅडकॅम अँड प्रोडक्ट मोल्ड डिझायनिंग’साठी प्रवेश घेतला. विशेष म्हणजे, बीईचा निकाल लागल्यानंतर दोन दिवसांत मी हा निर्णय घेतला. या सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमाचं शुल्क ९० हजार होतं. पण वसतिगृहाची सोय होती. अभ्यासक्रम पूर्ण होता होता समजलं की, दक्षिण कोरियाची प्रख्यात मोटार कंपनी ‘हुंदाई’चा हैदराबादमध्ये
आर अँड डी विभाग स्थापन होत आहे. कॅम्पस इंटरव्यूव्ह देऊन २००७मध्ये तो हुंडाईत शिकाऊ अभियंता म्हणून दाखल झाला. कॅडकॅममध्ये प्रवेशावेळी वडिलांनी त्यांचे पीएफचे पैसे दिले, कर्ज काढले होते. नवीन घर बांधण्याचं स्वप्न बाजूला ठेवून वडिलांनी हे सगळं केलं होतं. या सर्व गोष्टी मला पुढे अनेक वर्षानी समजल्या.’
‘हुंदाई’त डिसेंबर २००७ मध्ये सचिन शिकाऊ अभियंता म्हणून नोकरीला लागला. तिथे देशभरातील कर्मचारी होते. त्यांचे फर्डे इंग्रजी ऐकून तो चकीत होत असे. नोकरीला एक वर्ष पूर्ण होऊन नोकरीत कायम होण्याआधीच कोरियात अद्ययावत प्रशिक्षण घेण्यासाठी चार जणांची निवड झाली. त्यात सचिनचाही सहभाग होता. यादरम्यान त्याने दक्षिण कोरियन संस्कृती जवळून पाहिली. त्यांची कार्यपद्धत अनुभवली. त्यांच्या एकूणच कार्यसंस्कृतीचा त्याच्यावर प्रभाव पडला. एक महिन्याच्या प्रशिक्षणानंतर परत आल्यावर त्याला टीम लीडर (रिसर्च इंजिनीअर) म्हणून बढती मिळाली.
‘हुंदाई’मध्ये २००८ व २००९मध्ये उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार मिळाला. २००९मध्ये तीन महिन्यांसाठी पुन्हा कोरियात जाण्याची संधी मिळाली. परत आल्यावर त्याने इथल्या कर्मचा-यांना प्रशिक्षण दिलं. २०१०मध्ये पुन्हा विशेष प्रकल्पासाठी तीन महिने संधी मिळाली. सहा वर्षात सहा बढत्या मिळाल्या. काम पाहून इतर कर्मचा-यांपेक्षाही त्याला जलद गतीने बढती मिळाली. कॉपरेरेट संस्कृतीचा एक नियम तो सांगतो, ‘आव्हानात्मक काम केलं की, तुम्हाला डोक्यावर घेतलं जातं आणि काही चुकलं तर तात्काळ काढूनही टाकलं जातं. त्यामुळे अत्यंत जागरूक राहून काम करावं लागतं.’ सध्या तो ‘हुंदाई’च्या वाहन अभियांत्रिकी विभागातील ट्रिम डिझायनिंगचा विभागप्रमुख आणि व्यवस्थापक आहे. ‘हुंदाई’ कंपनीच्या मोटारगाडयांची संपूर्ण अंतर्गत रचना तयार करण्याचं काम त्याच्या देखरेखीखाली होते. विशेष म्हणजे, दररोजचं काम उरकल्यानंतर दिवसाच्या कामाची माहिती त्याला थेट कोरियातील विभागप्रमुखाला कळवावी लागते.
आयुष्यात खाव्या लागणा-या खस्तांमधूनच ‘आदियुवा’ वेबसाइटच्या निर्मितीची कल्पना त्याला सुचली. इंजिनीअरिंगचं शिक्षण घेताना त्याच्यापेक्षाही हुशार विद्यार्थी तिथे होते. परंतु ते मागे का पडले. कारण घरचा पाठिंबा आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव. त्यांच्यासाठी काही तरी करणं आवश्यक होतं, असं सचिनला वाटलं. तो इन्फोटेकचा जमाना होता. मुंबईत शिकताना ‘ऑर्कुट’ या सोशल साइटशी तो जोडला गेला. या साइटवर त्याने आधी माजी विद्यार्थी मंडळ तसेच सॉफ्टवेअर इन्फोटेक ग्रुप तयार केला. आदिवासी किंवा ग्रामीण भागातील मुलांकडे स्पर्धात्मक मानसिकतेचा अभाव असतो, गुणात्मक दर्जा नसतो. म्हणून २००७मध्ये त्याने ऑनलाइन ‘आदियुवा’ची सुरुवात केली.

‘आदियुवा’बद्दल सचिन सांगतो, ‘सुरुवातीला झालेल्या कार्यक्रमांचा फोटोसह वृत्तांत ‘आदियुवा’वर टाकला. आपल्या परिसरात अशा योजना कशा प्रकारे राबवता येईल, याची माहिती घेतली. वेगवेगळया क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणलं. त्यात डॉक्टर, इंजिनीअर्स होते. त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळवून दिलं. हे सर्व अर्थात ऑनलाइन काम केलं. हे सर्व संगणकशिक्षित विद्यार्थी असल्यामुळे हे शक्य झालं. तसंच सुट्टी मिळेल त्या वेळी मी गावात जाऊन मार्गदर्शन करू लागलो. त्याच्याबरोबर वेगवेगळया क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती असत. त्यामुळे ‘आदियुवा’च्या माध्यमातून वेगवेगळया क्षेत्रातील माणसे जोडली गेली. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळू लागली. नोकरी, कारकीर्दीविषयी मार्गदर्शन मिळू लागलं. एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन कार्यक्रम करायला पैसे लागतात, पण हे मार्गदर्शन ऑनलाइन असल्याने तो करावा लागत नसे. शिवाय इंटरनेटवर एकाच वेळी अनेकांना मार्गदर्शन करता येतं. त्यामुळे मी ऑनलाइनवर जास्त लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. त्या वेळी ई-मेल आणि आर्कुट हीच ऑनलाइन संपर्काची माध्यम होती. त्याला जोड म्हणून मी संकेतस्थळ बनवायचं ठरवलं. संकेतस्थळ बनवण्याचं कोणतंही शिक्षण न घेता मी ‘आदियुवा.इन’ हे संकेतस्थळ तयार केलं. त्यानंतर काही वर्षानी ‘आदिवासी युवा शक्ती’ (आयुष) हा ऑनलाइन गट बनवला. आदिवासी युवकांची ‘आदिवासी युवा सेवा संघ’ ही संस्था निर्माण करून तिची रितसर नोंदणी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आज ‘आदियुवा’ आणि ‘आयुष’चा लाभ सध्या देश आणि देशाबाहेरील १० हजारांहून जास्त तरुण घेत आहेत.’
‘आदियुवा’ आज अनेक होतकरू, पण उपेक्षित तरुणांना दिशा देण्याचं काम करत आहे. याचं सगळं श्रेय सचिनला जातं. सामाजिक बांधलकीची जाणीव असेल तर काय करता येऊ शकतं, याचं प्रेरक उदाहरण आहे.

‘वारली’च्या पेटंटसाठी प्रयत्न सुरू
‘आदियुवा’तर्फे वारली चित्रकलेचे पेटंट मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वारली चित्रकला ही कुणा एका व्यक्तीची किंवा संस्थेची नसून ती सर्व आदिवासी समाजाची आहे. तो आदिवासी समाजाचा सांस्कृतिक ठेवा आहे, या भावनेतून तिचं पेटंट मिळावं, यासाठी सचिनने प्रयत्न सुरू केले आहेत. वारलीसाठी वापरण्यात येणारे त्रिकोण-चौकोन, तांदळाचे पीठ, पाणी, माती यांची पेटंट मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुळात वारली ही कोणत्याही एका आदिवासी जमातीची कला नाही. विशेष करून मल्हार कोळी, (ठाणे जिल्हयात राहणारे) आणि वारली जमात यांच्यात ही चित्रकला काढली जाते. पण अलीकडे या आदिवासींकडून कमी पैशात चित्रं काढून ती जास्त पैशात विकली जात आहेत. विविध प्रकारे त्यांची फसवणूक केली जाते. वारली चित्रकलेचं पेटंट मिळवून त्याद्वारे ही लोकसंस्कृती जपण्याचा आणि त्यातून ही लोककला जिवंत ठेवणा-या कलाकारांना रोजगार मिळावा, त्यांचा चरितार्थ चालावा, यासाठी ‘आदियुवा’कडून प्रयत्न सुरू आहेत. वारली चित्रं जगभरात विकली जाण्यासाठी, तिची बाजारपेठ वाढवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वारलीला आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. ही चित्रकला टी-शर्ट तसंच इतर गोष्टींवर आता काढली जात आहे. थोडक्यात वारलीसाठी आता ‘आदियुवा’ने सामूहिक स्वरूपाची व्यापक मोहीम सुरू केली आहे. तिची संपूर्ण माहिती वारली. इन (warli.in) यावर उपलब्ध आहे.
‘बीबीसी’ बनवणार माहितीपट
सामाजिक बदल घडवू पाहणा-या २० ते ३० वयोगटांतील तरुणांवर ‘बीबीसी’ माहितीपट बनवणार आहे. सामाजिक बदल घडवणा-या या हिरोंमध्ये, ‘सोशल आंत्रप्रुनर्स’मध्ये सचिनचाही समावेश आहे. ‘आदियुवा’ ऑनलाइन असल्याचा फायदा त्याला अशा प्रकारे मिळाला. ‘आदियुवा’मुळे ‘बीबीसी’ने त्याच्याशी संपर्क साधला. फोनवरून त्याची माहिती घेतली. त्याची संपूर्ण व्यक्तिगत, नोकरीविषयी त्याचबरोबर समाजाला पुन्हा देण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत, याची माहिती घेतली. या माहितीपटात देशातील विविध भागांतील तरुणांचा समावेश असेल.
‘आदियुवा’ची राष्ट्रीय, जागतिक स्तरावर दखल
मध्य प्रदेशमध्ये नुकतंच इंदूरमध्ये एप्रिल २०१३मध्ये पाच राज्यांतील आदिवासी युवकांचं संमेलन झालं. यात महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि दिल्लीतील स्थायिक झालेले आदिवासी युवकही (जे एम्समध्ये डॉक्टर होते) सहभागी झाले होते. २० आणि २१ ऑक्टोबर २०१३ला इंदूरमध्येच आदिवासी युवकांचे राष्ट्रीय आणि जागतिक संमेलन होणार आहे. ‘विश्वस्तरीय आदिवासी युवाशक्ती फेसबुक महापंचायत-२०१३’ हे संमेलन होणार आहे. एकमेकांशी ऑनलाइन जोडलेले सगळे आदिवासी युवक ते एका व्यासपीठाखाली एकत्र यावेत, हा या संमेलनाचा हेतू आहे. सुशिक्षित आदिवासींच्या माध्यमातून नव्या आदिवासी पिढीसमोर आदर्श निर्माण व्हावा, यासाठीही या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातील आणि देशाबाहेर गेलेले आदिवासी युवक संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
‘आदियुवा’चं सोशल बिझनेस मॉडेल
हैदराबादमधील ‘आयएसबी’ बिझिनेस स्कूलने आयोजित केलेल्या ‘आयडिया चॅलेंज’ या स्पर्धेत सलग दोन वर्ष ‘आदियुवा’ने सादर केलेली सोशल बिझनेस मॉडेल अंतिम यादीत आली होती. त्यातील पहिलं होतं सोशल नेटवर्किंगचा वापर करून ग्रामीण भागात शैक्षणिक आणि व्यवसाय मार्गदर्शन करणं, तर दुस-या मॉडेलमध्ये सोशल नेटवर्किंगचा वापर सामाजिक बांधिलकीसाठी करणं. विशेषत: तरुण पिढीचं हे मनुष्यबळ चांगल्या कारणासाठी वापरलं जाऊ शकतं, हे दाखवण्यात आलं होतं. या बिझनेस मॉडेलमध्ये सामाजिक बांधिलकीला आर्थिक दृष्टिकोन जोडला होता. तसा तो जोडला जावा, ही काळाची गरज आहे, असं सचिनला वाटतं.Save Land Save tribal | लेका, मला विकू नको !


पैशासाठी जमीन विकणाऱ्या आपल्या शेतकरी लेकाला जमीन विकू नको असे आर्जव करतेय धरणीमाता तिच्याच तोंडून . सकाळी उठले तर सूर्याच्या कोवळी किरणे माझ्या लांबलचक पसरलेल्या हिरव्यागार शरीराला सोनेरी अंघोळ घालत होती. आज मी फार खुश आहे .आज माझ्या लांबलचक शरीरावर पसरलेल्या शरीरावर भाताची पिकलेली सोनेरी कणसे कशी मस्त वाऱ्यावर डुलत होती .आज त्यांचा इथे शेवटचा दिवस आहे आज त्यांना कापून माझ्या लेकाच्या म्हणजे इथल्या मालकाच्या घरी नेणार . माझा लेक पण आज खूप खुश होता ...येयीलच इतक्यात ! .........तो काय आला ...अरे पण हे काय.... त्याच्या सोबतची ती सुटाबुटा ताली माणसे कोण अन ती माझ्या लेकासोबत काय करताहेत ?.....अरे हा तर गावचा तलाठी अन हा सर्कल अन ती दुसरी मोठ्या गाडीतून उतरलेली माणसे कोण ? अंनि हा तलाठी माझी मोजणी करून कागदावर काय लिहतोय ...? मला त्यांच्या बोलणे ऐकू आले ....तो मोठा साहेब तलाठ्याला म्हणाला," ३० ला फायनल करून टाका .असेही हि जागा फार कामाची नाय मिळत "म्हणजे मला हा मोठा साहेब विकत घेणार कि काय ...? माझा लेक पण फार खुश दिसतोय .....मोठ्या सायबाने माझ्या लेकालाठरल्याप्रमाणे नोटांची काही बंडले दिली ती मंडळी निघून गेली ..

माझ्या डोळ्यात पाणी आले ज्या लेकाची त्याच्या कुटुंबाचीमागच्या तीन पिढ्यांपासून मी माय बनून सेवा केली त्याने आज मला एका मोठ्यासायबाला कवडी मोलात विकून टाकलेमी प्रत्येक वेळी ज्याची पोटाची आग विझवली ....तुमची पोरेबाळे उपाशी राहू नयेत म्हणून मी उन पाऊस झेलून अन्न पिकवते तोच माझा लेक आज मला कसायाच्या हातात सोपवून चाललाय. का ...? कारण मी जुनाट झाले म्हणून कि माझी पिक उगवण्याची क्षमता कमीझाली म्हणून...?म्हातारे झाल्यावर आपल्या आयीला असे कुणी टाकून देते का ..!
तुझे बंधुभगिनी तुझ्या कामात आले नसतील तेव्हडी मी तुझ्या कामात आले हे कसे विसरलास ....तुझे आजोबा, तुझे बाबा, तू आता तुझी मुले माझ्या बांधावरच खेळून मोठी झाली .नांगरणी करून थकल्यावर तू याच बांधावर विसावा घेतलास ,,,बाप मेल्यावर हि इथेच डोळ्यातली टिपे गळून तुझे दुख हलके केलेस आज मी तुला भर कशी झालीलेका ,ऐक माझं मला त्या सायबाला विकू नकोस तुला कितीही मोठ संकट आले तरी मी तुझी साथ देयीन ...पण तो मोठा साहेब तुला फसवून तुझ्याकडून मला चण्याफुटण्याच्या भावात विकत घेवून कोटी रुपयाला दुसऱ्याला विकेल नाहीतर उंच उंच बंगले बांधील नाहीतर कारखाने बांधून रसायनाने माझे हिरवेगार शरीर भाजून टाकेल....तुला तुझ्या धरतरी आयीची अशी दुर्दशा पाहवेल का रे ...? मग कुठे पाहशील हिरवीगार झाडे हिरवेगार भात तुझ्याघरात पसाभर भात तरी कुठून येणार ...? त्या मोठ्या साहेबाने दिलेल्या पैशातून ...? ते पैसे हि तू दारू पिवून संपवून  टाकलेस तर तुझ्या हाती काय नाय राहणार ..? पैसे काय दोन दिवसांचा सोबती पण मी आयुष्यभर सोबत देयीन .जशी तुझ्या वाडवडिलांची दिली होती .

तुझ्या वाड वडिलांनी मला आयीसारखे वागवले म्हणून मी हि त्यांची सेवा केली आजवर तुझी हि सेवा करत आली पण आज तू फक्त काही पैशांसाठी मला विकून टाकलेस ...? का कारण तुझ्या मुलांचे शिक्षणाचे कर्ज फेडायचे म्हणून कि ,तुला नवीन घर बांधायचं म्हणून ! मुलीचं लग्न करायचेय कि शेती सोडून दुकान टाकायचे म्हणून ...कि मित्रासारखी दारू पिवून ऐशोआराम करायचं म्हणून ...का...?
लेका तुझी खरी संपत्ती तर मीच आहे जी दुसऱ्या कुणाला लुबाडू देवू नकोस भरपूर मेहनत करून ,सेंद्रिय  शेतीचा वापर करून विविध पिके घे म्हणजेतुला पैशाची नाद भासणार नाही कारण ती पिके तू बाजारात पण विकू शकतोस . तरीही जर खरोखरच गरज असेल तर मला तारण ठेवून कर्ज घे ते फेडून पुन्हा मला सोडव पण कायमची विकू नकोस मला .मला विकून आलेले पैसे दोन दिवसात संपतील ,मग तुझ्या घरात कणगी भर भात .लाकूड फाटा ,भाजीपाला षाधी वनस्पती तू कुठून आणणार ते विकत आणायला तू पैसे कुठून आणणार ?तुझी धरतरी माय आहे तोवर सर्व काही आहे नाय तर काही नाय .
म्हणून सांगते ऐक माझे ......

आदिकन्या | संचिता सातवी 
Author @ Google

Find us on Facebook