Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

Save Land Save tribal | लेका, मला विकू नको !


पैशासाठी जमीन विकणाऱ्या आपल्या शेतकरी लेकाला जमीन विकू नको असे आर्जव करतेय धरणीमाता तिच्याच तोंडून . सकाळी उठले तर सूर्याच्या कोवळी किरणे माझ्या लांबलचक पसरलेल्या हिरव्यागार शरीराला सोनेरी अंघोळ घालत होती. आज मी फार खुश आहे .आज माझ्या लांबलचक शरीरावर पसरलेल्या शरीरावर भाताची पिकलेली सोनेरी कणसे कशी मस्त वाऱ्यावर डुलत होती .आज त्यांचा इथे शेवटचा दिवस आहे आज त्यांना कापून माझ्या लेकाच्या म्हणजे इथल्या मालकाच्या घरी नेणार . माझा लेक पण आज खूप खुश होता ...येयीलच इतक्यात ! .........तो काय आला ...अरे पण हे काय.... त्याच्या सोबतची ती सुटाबुटा ताली माणसे कोण अन ती माझ्या लेकासोबत काय करताहेत ?.....अरे हा तर गावचा तलाठी अन हा सर्कल अन ती दुसरी मोठ्या गाडीतून उतरलेली माणसे कोण ? अंनि हा तलाठी माझी मोजणी करून कागदावर काय लिहतोय ...? मला त्यांच्या बोलणे ऐकू आले ....तो मोठा साहेब तलाठ्याला म्हणाला," ३० ला फायनल करून टाका .असेही हि जागा फार कामाची नाय मिळत "म्हणजे मला हा मोठा साहेब विकत घेणार कि काय ...? माझा लेक पण फार खुश दिसतोय .....मोठ्या सायबाने माझ्या लेकालाठरल्याप्रमाणे नोटांची काही बंडले दिली ती मंडळी निघून गेली ..

माझ्या डोळ्यात पाणी आले ज्या लेकाची त्याच्या कुटुंबाचीमागच्या तीन पिढ्यांपासून मी माय बनून सेवा केली त्याने आज मला एका मोठ्यासायबाला कवडी मोलात विकून टाकलेमी प्रत्येक वेळी ज्याची पोटाची आग विझवली ....तुमची पोरेबाळे उपाशी राहू नयेत म्हणून मी उन पाऊस झेलून अन्न पिकवते तोच माझा लेक आज मला कसायाच्या हातात सोपवून चाललाय. का ...? कारण मी जुनाट झाले म्हणून कि माझी पिक उगवण्याची क्षमता कमीझाली म्हणून...?म्हातारे झाल्यावर आपल्या आयीला असे कुणी टाकून देते का ..!
तुझे बंधुभगिनी तुझ्या कामात आले नसतील तेव्हडी मी तुझ्या कामात आले हे कसे विसरलास ....तुझे आजोबा, तुझे बाबा, तू आता तुझी मुले माझ्या बांधावरच खेळून मोठी झाली .नांगरणी करून थकल्यावर तू याच बांधावर विसावा घेतलास ,,,बाप मेल्यावर हि इथेच डोळ्यातली टिपे गळून तुझे दुख हलके केलेस आज मी तुला भर कशी झालीलेका ,ऐक माझं मला त्या सायबाला विकू नकोस तुला कितीही मोठ संकट आले तरी मी तुझी साथ देयीन ...पण तो मोठा साहेब तुला फसवून तुझ्याकडून मला चण्याफुटण्याच्या भावात विकत घेवून कोटी रुपयाला दुसऱ्याला विकेल नाहीतर उंच उंच बंगले बांधील नाहीतर कारखाने बांधून रसायनाने माझे हिरवेगार शरीर भाजून टाकेल....तुला तुझ्या धरतरी आयीची अशी दुर्दशा पाहवेल का रे ...? मग कुठे पाहशील हिरवीगार झाडे हिरवेगार भात तुझ्याघरात पसाभर भात तरी कुठून येणार ...? त्या मोठ्या साहेबाने दिलेल्या पैशातून ...? ते पैसे हि तू दारू पिवून संपवून  टाकलेस तर तुझ्या हाती काय नाय राहणार ..? पैसे काय दोन दिवसांचा सोबती पण मी आयुष्यभर सोबत देयीन .जशी तुझ्या वाडवडिलांची दिली होती .

तुझ्या वाड वडिलांनी मला आयीसारखे वागवले म्हणून मी हि त्यांची सेवा केली आजवर तुझी हि सेवा करत आली पण आज तू फक्त काही पैशांसाठी मला विकून टाकलेस ...? का कारण तुझ्या मुलांचे शिक्षणाचे कर्ज फेडायचे म्हणून कि ,तुला नवीन घर बांधायचं म्हणून ! मुलीचं लग्न करायचेय कि शेती सोडून दुकान टाकायचे म्हणून ...कि मित्रासारखी दारू पिवून ऐशोआराम करायचं म्हणून ...का...?
लेका तुझी खरी संपत्ती तर मीच आहे जी दुसऱ्या कुणाला लुबाडू देवू नकोस भरपूर मेहनत करून ,सेंद्रिय  शेतीचा वापर करून विविध पिके घे म्हणजेतुला पैशाची नाद भासणार नाही कारण ती पिके तू बाजारात पण विकू शकतोस . तरीही जर खरोखरच गरज असेल तर मला तारण ठेवून कर्ज घे ते फेडून पुन्हा मला सोडव पण कायमची विकू नकोस मला .मला विकून आलेले पैसे दोन दिवसात संपतील ,मग तुझ्या घरात कणगी भर भात .लाकूड फाटा ,भाजीपाला षाधी वनस्पती तू कुठून आणणार ते विकत आणायला तू पैसे कुठून आणणार ?तुझी धरतरी माय आहे तोवर सर्व काही आहे नाय तर काही नाय .
म्हणून सांगते ऐक माझे ......

आदिकन्या | संचिता सातवी 
Author @ Google

Find us on Facebook