Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा

आज आदिवासी वीर बिरसा मुंडा यांची जयंती आहे. आपणा सर्वांना भगतसिंग,राजगुरू ,चंद्रशेखर आझाद यांचा इतिहास माहित आहे पण आपल्यापैकी किती जण बिरसा मुंडा यांचा इतिहास जाणतात …?चला आज क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त त्यांचा साहसी इतिहास थोडक्यात जाणून घेवूयात !
जन्म _ आदिवासी वीर बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये सध्याच्या झारखंड राज्याच्या रांची जिल्ह्यातील अलिहत गावामध्ये एका झोपडीत झाला . त्यांच्या आईचे नाव करमी हातु व वडीलांचे नाव सुगना मुंडा असे होते .
शिक्षण _ बिरसा लहानपणापासूनच खूप कुशाग्र बुद्धीचे व चपळ होते . त्यांचे प्राथमिक शिक्षण सलगा या गावातील त्यांच्या मावशीकडे झाले .पुढे ते मिशनरी शाळेत चाईसाबा येथील जी. सी. एल. मिडल स्कूल मधून त्यांची उच्च माध्यमिक परीक्षा पास केली . बिरासांना येथेच मिशनऱ्यांच्या दुष्ट्चक्रांबद्दलचा पहिला अनुभव आला .
मिशनरी आदिवासींचे शोषण करतात म्हणून त्यांनी मिशनरी शाळा सोडून दिली. आणि त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले .
विवाह _त्यानंतर १८९ ० -१८९४पर्यंत ते बंद्गाव येथेच राहिले ,पुढे त्यांचा विवाह हिराबाई नावाच्या कन्येशी झाला परंतु दुर्दैवाने लवकरच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला .
बिरसा मुंडा ते भगवान बिरसा _ बिरसांना शिक्षणाबरोबरच संगीत, नृत्य यांची सुद्धा आवड होती .ते उत्तम बासुरी वाजवायचे, त्यांचा आवाज भारदस्त होता. पुढे हाच आवाज आदिवासींच्या अन्यायाविरुद्ध उठला .ते रानात गुरे चरायला नेत . त्यामुळे निसर्गात उपलब्ध असलेल्या वनऔषधीबद्दल चांगलेच ज्ञान होते ,ते आजारग्रस्त लोकांना विशिष्ट प्रकारची जडीबुटी देवून त्यांचा आजार बरा करत असत . म्हणूनच लोक त्यांना 'भगवान बिरसा' म्हणू लागले . एकदा पावसाळ्यात कडाडती वीज बिरसांवर पडली. परंतु बिरसांना कसलीही इजा झाली नाही, याउलट त्यांच्या आजूबाजूची झाडे विजेमुळे खाक झाली . या घटनेपासून इंग्रजही आश्चर्यचकित झाले व "बिरसा god है" असे ते मानू लागले,व तसे त्यांनी नमूदही करून ठेवले आहे .
कार्य _सावकार व ठेकेदारांनी आदिवासींच्या शोषणाची सीमा पार केली होती . आदिवासी जमिनीचे मूळ मालक असूनही जमीनदार व सावकार जबरदस्तीने त्या जमिनीवर ताबा मिळवून बसले होते . पण त्याबद्दल चकार शब्दही न काढण्याचा आदेश इंग्रजांनी दिले होते,परंतु बिरासांना ते सहन झाले नाही बिरासांनी लोकांमध्ये जागृती करण्यास सुरवात केली ,ते लोकांना म्हणत कि "तुमच्या जमिनी धूळ वाऱ्यासारख्या उडून गेल्या आहेत,स्वभिमानासोबत तुमचा आत्मविश्वासही संपला आहे,जर तुम्ही तुमचा आत्मविश्वास परत जागृत नाही केला तर तुम्ही तुमच्या आया बहिणींची अब्रु कशी वाचवाल …… ?"या वाक्यांचा लोकांच्या मनावर खोल परिणाम झाला . व लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत होण्यास सुरवात झाली.
उलगुलान _ सन १८६९मध्ये वन संरक्षण कायदा लागू करण्यात आला,त्यामुळे जंगलावर होणारी उपजीविका बंद झाली . आदिवासींवर मोठे संकट उभे राहिले. या अन्यायाविरुद्द बिरासांनी १८९०मध्ये व्यापक क्रांती 'उलगुलान 'ची घोषणा केली . शस्त्रबळ तयार करून शत्रूंना ठार केले .
सन १८७५ मध्ये 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,आणि तो मी मिळवणारच !'हि लोकमान्य टिळकांची घोषणा देशभरात पोचली पण नव्हती ,त्याही आधीपासून बिरसांनी स्वराज्याची घोषणा करून इंग्रजी सत्तेला आवाहन केले होते हे इतिहासातील खूप मोठे सत्य किती जणांना माहित आहे … ?
बिरसांनी १८९५मध्ये समाजसुधारणेचे अभियान आपल्या हातात घेतले,जंगल,जमीन संपत्ती हा आमचा अधिकार आहे ,ते आमच्या उपजीविकेचे साधन आहे ,यासाठी सर्व आदिवासींनी एकत्र येवून लढायचे आवाहन केले . त्यांनी न्याय व अधिकारासाठी शस्त्र हाती घेतेले. जंगल राज्याची घोषणा करून ते आदिवासींचे महानायक बनले . यामुळे इंग्रज सरकार त्यांच्या मागे लागले परंतु त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले. बिरसांनी अनेक अनुयायी तयार केले. बिरसा व त्यांच्या अनुयायांनी अन्यायी सावकार व जमीनदारांच्या घरांना आग लावून दिली. हि बातमी पोलिसांनी जिल्हाधिकार्याला कळवताच बिरासांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले . ९ ऑ. १८९५ ला बिरसा व त्यांच्या वडिलांनाही ताब्यात घेण्यात आले. आणि ख्रिस्ती पाद्रींच्या साक्षीवरून त्यांना २ वर्ष कारावास व ५० रु. दंड ठोठावण्यात आला.
३० नोव्हे. १८९७ रोजी बिरसा तुरुंगातून बाहेर आले ,त्या वेळी आदिवासी समाजाची केविलवाणी स्थिती बघून ते पेटून उठले व त्यांनी स्वावलंबन व स्वाभिमानासाठी उलगुलान ची घोषणा केली.
बिरसा हे उत्तम योद्धा होते.एक कुशल प्रशासक होते. फेब्रु. १८९८मध्ये बिरसांनी आपल्या अनुयायांच्या सोबत डुंबारी बुरुज या पर्वताच्या पायथ्याशी सभा बोलावली, व १८९९मध्ये नाताळचा पहिलाच दिवस हल्ल्याचा दिवस म्हणून ठरवला. या हल्ल्यामध्ये त्यांनी पोलिस चौकी लुटायचे ठरवले,नाताळच्या रात्री आपल्या साथीदारांच्या तीन वेगवेगळ्या तुकड्या बनवून वेगवेगळ्या जागेवर हल्ले चढवले. फादरच्या घरावर हल्ले करून फादर कारवेरी व फादर हाफमान यांच्यावर बाण चालवले.
जाने. १९०० मध्ये रांचीच्या इंग्रज अधिकाऱ्यांना बिरासांच्या या हल्ल्याची माहिती मिळाली आणि जाने. १९०० मध्ये ११. वाजता इंग्रजांनी डुंबारी बुरुजावर गोळीबार सुरु केला, तेव्हाच बिरासांचे अनुयायी त्यांच्या नावाचा जयजयकार करत धनुष्यबाण व दगडफेक करत त्यांचा प्रतिकार करण्यास सुरवात केली. त्यावेळी टेकडीवर २०००पेक्षा जास्त लोकांचा जमाव उपस्थित होता,यात स्त्रिया व लहान मुलांचाही समावेश होता. या नरसंहारात २००पेक्षा जास्त आदिवासी मारले गेले,व बाकीच्यांना जबरदस्तीने ख्रिश्ती धर्म स्वीकारण्यात भाग पाडले गेले. हा नरसंहार 'डुंबारी बुरुज नरसंहार' म्हणून ओळखला जाऊ लागला.
या नरसंहारानंतर ७जाने. १९००मध्ये पोलिसांनी धरपकड सुरु केली, व पुढे ३फेब्रु. १९००मध्ये बिरसांनी आपल्या ८० अनुयायांसमवेत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. या वेळेस तेथे उपस्थित आदिवासी बांधवांना बिरासांनी माधारी फिरण्यास व आपल्या अधिकारांसाठी लढण्याचा उपदेश केला.
त्यानंतर वयाच्या केवळ २५व्या वर्षी तुरुंगवास भोगत असताना कॉलाराने ग्रस्त होवून बिरासांची प्राणज्योत मालवली. परंतु येथेही इंग्रजांचे कपट दिसून येते,बिरासांच्या अनुयायांच्या म्हणण्यानुसार बिरासांना तुरुंगात कॉलराच्या औषधाऐवजी विष देण्यात आले होते.
बिरासांना खात्री होती कि त्यांनी सुरवात केलेल्या उलगुलान नावाच्या वादळाचा कधीच अंत होणार नाही,बिरसा अमर आहेत व आपल्यासाठी आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आदर्श आहेत .
बिरासंच्या 'उलगुलान' ला हि बिरसाइतकेच महत्व प्राप्त झाले,उलगुलान मध्ये समाजहीत तसेच मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणे आदि तत्वे समाविष्ट आहेत ,म्हणूनच लोक बिरासांना धरती आबा म्हणून संबोधतात.
आजही या महानव्याक्तीच्या पवित्र स्मृती झारखंड राज्यात आहेत. झारखंड राज्याने रांची airport व रेल्वे स्थानकाला 'बिरसा मुंडा' हे नाव देवून त्यांच्या महान कार्याला गौरविले आहे.
या महान आदिवासी वीराला आयुश तर्फे शतशः नमन !जय बिरसा !

शब्दांकन : संचिता सातवी

संदर्भ : आदिवासी वीर - जेलसिंग पावरा

2. Role of Tribal Officials and Employees

Who is to Blame for Tribal Backwardness ?


2. Role of Tribal Officials and Employees

Tribals living in Rajasthan’s Adivasi Upyojana Area have very low representation in government administration in comparison to non-tribals. They have little representation in Rajasthan administrative services. For instance, out of 600 recruitments so far done for tribals in state RAS and RTS, only 15—that is 2.5 percent were recruited from southern Rajasthan, and only 3 tribals have made it to Rajasthan administrative services. The tribals of this region have never made it to the Indian Administrative Services even after 59 years of Independence. In other words, there are only a handful of tribal officials and employees from this region. And most among these work under pressure and fear, and they never participate in various activities conducted for the prevention of excesses and exploitation perpetrated on tribal society. Keeping in mind that they have raise their children, they think they would work for their community after they retire from job. This is how the tribal officials and employees have failed in discharging their duty toward their society. But when they smell an opportunity to become MLA and MP, they are seen running around for tickets, in other words, they want to become politicians but not social workers.

These officials and employees have little interaction with their community members. Most of them have become city dwellers, and they never encourage their children to participate in social and religious activities of their community. In other words, they fail to discharge their responsibility toward their community. The tribal officials and employees posted in this area have to face immense pressure from their political masters and have to work under fear as they are transferred by the politicians to serve their party interests and personal ambitions. This fear keeps them from participating in social development activities. They are thus unable to bring awareness among their fellow tribesmen and set an example before the youth. They only bid their time while waiting to complete their service period. But when they retire it is too late as they are unable to contribute anything substantial toward their community.


आदिवासी विकासाचा दृष्टीकोन

"सर्वसाधारणपणे आदिवासींचे जीवन, यांचा पूर्वेतिहास व संस्कृती यांच्या अभ्यासाची क्षेत्रे अत्यंत व्यापक आहेत. पण त्यामानाने अभ्यासाची साधने फारच मर्यादित आहेत. महाराष्ट्रातील आदिवासींच्या बाबतीत तर ही उणीव प्रकर्षाने जाणवते. केवळ ज्ञानमींमासा तृप्त करण्यासाठी नव्हे तर आदिवासी लोकांसंबंधीच्या प्रत्यक्ष माहितीच्या आधारे त्यांचा नियोजनपूर्वक विकास घडवून आणण्यासाठी व पुढील अभ्यासाला उत्तेजन देण्याच्या हेतूने आदिवासी लोकांचे जीवन, इतिहास व संस्कृती यासंबंधी अधिकाधिक उपयुक्त व भरीव माहिती मिळविणे गरजेचे आहे. तसेच उपलब्ध असणारी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे."

आदिवासी समाजाचा इतिहास गौरवशाली आहे असे आपण नेहमी म्हणतो. हे सत्य आहे...परंतु आजच्या तरुणपिढीला जर या गौरवशाली इतिहासाची जाणीव किंवा माहिती नसेल तर आपल्या जनजागृतीच्या कार्यात भविष्यात अनेक अडचणी येवू शकतात. म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या जमातींची माहिती, आपल्या क्रांतीकारकांची माहिती पोहोचणे गरजेचे आहे. यातून समाज अधिक बळकट करण्यास मदत मिळेल. म्हणून सर्वांनी आपल्याकडे असणारी माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे अत्यंत महत्वाचे आहे.

- Rajoo Thokal

विश्वस्तरीय आदिवासी युवा शक्ति फेसबुक महापंचायत २०१३

नमस्कार !

आदिवासी युवकांनी चालू केलेल्या ह्या चळवळीत सगळ्या आदिवासी युवकांनी सहभागी व्हावे या साठी विनंती. सध्या देशभारातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
तर आता वेळ आहेआदिवासी हितासाठी चाललेल्या ह्या कार्यात आपला वयक्तिक आणि सामुहिक पातळीवर सहभागी व्हावे. आपल्या संपर्कात असलेल्या जास्तीत जास्त आदिवासी संस्था आणि संघटना यांना सदर चालवली सोबत जोडाल अशी अपेक्षा करतो.
सहभागी होण्या साठी कृपया नोंदणी करावी : www.event.adiyuva.in
Fb event page : https://www.facebook.com/events/519222388141664/


आभारी आहोत.



आंबेडकरी आयडेन्टीटी की मूलनिवासी आयडेन्टीटी ?

आंबेडकरी आयडेन्टीटी की मूलनिवासी आयडेन्टीटी ?
6) reply To Mr. Chandan
Dear Chandanji, 
I respectfully ask you what I am doing mistake? Our Rashtrapita Jyotiba Fule has rightly explored the concept of ‘Bahujan’ and I am not against the concept of Bahujan. I wish to say Bahujan for Bahujan. But MR. Waman Meshram, Mr. Vijay Mankar and other BACEF people are trying to destroy the identity of Bahujan by rename it Mulnivasi. They have no theory to define the Indigenous people in India. Another issue is that, why Hon’ble Kanshiramji was not put up the theory of Indigenous People (Racial Theory), when he is the origin of concept of BACEF.
1) The theory of Indigenous People is based on ‘’Racial issue’’ where is the Bahujan theory is caste based ‘’issue’’. This is the basic different between Bahujan and Mulnivasi. In throught world the Bahujan people are not Indigenous. But the Ingenuous people are in minorities. Mulnivasi concept is based on cultural identity and pre-colonial state, territory, racial elements having their own identity. Why these people are not study the universal concept of indigenous people defined by UNO, ILO, Word Bank, and recently guides lines given by Ho’ble Supreme Court of India. Without considering this universal draft of UNO they are declaring them self as Mulnivasi, this is nothing but intellectual prostitution. Are these people, beyond the SC of India?
2) This people are ‘’Ambedkarite’’ and why they abandonment the ‘’universal identity of Ambedkarite’’ by replacing the Mulnivasi?
3) During the International conference in Durban on the subject of racial Discrimination the UNO has not recognized the concept of Dalit and Bahujan as Indigenous People for the reason that Dali and Bahujan are the concept of Castes in India, where as the Indian Adivasi are considered as Indigenous People, because these people are out of caste theory and they preserved their cultural identity and their races.
4) Due to intellectual diversion of BAMCEF people by taking support of Mulnivasi concept without universal definition and philosophy , the Adivasi people are suffering from definition of Indigenous people in UNO, and altimetry they are depriving from the rights of “Self-determination”. Madavi L K

5) I am giving the offer to open discussion on these issues. Dear brother don’t get any misunderstanding.


Dear Sir,
Kindly go through the discussion on Ambedkari identity and Identity of indigenous people, and share your valuable experience……
5
आंबेडकरी आयडेन्टीटी की मूलनिवासी आयडेन्टीटी ?

प्रिय मित्र, आदरणीय, संजय मोहीतेजी, जय भिम, जय रावण,
आपण माझ्या प्रश्नाची दाखल घेतली यात आपला मोठेपणा आहे, त्या बाबत मी आपला आभारी आहो.
आपण एक कडेरबेस बामसेफचे निष्ठावंत पायीक आहात याचे मला पूर्ण भान आहे. परंतू माझे प्रश्न आपण भयंकर किरकोळ समजून उत्तर देण्याची चुकी करू नये.
१) भारतीय घटनेत बाबासाहेबांनी Aborigine शब्द वापरला यात दुमत नाही. मूलनिवासी ही रेसियल ( वंशवाद ) संकल्पना असून मूलनिवासी या शब्दाचा अर्थ इंग्रजीमध्ये इंडीजीनियस (Indigenous People ) असा होतो. भारतीय घटनेत Aborigine शब्द आदिवासींना सांस्कृतिक व वांशिक ओळख देण्यासाठी उपयोगात आणला नव्हता. मूलनिवासी संकल्पना कोलंबसच्या Discovery Theory च्या गाभाऱ्यातून वसाहतवादाला नकार असणारी वंशवादावर आधारीत असून संकल्पनेचा उगम १९९३ मध्ये झाला आणि बाबासाहेबांना वंशवाद मान्य नव्हता हा मुद्धा समजून घ्या. हवेत दगड फेकण्यात काय अर्थ आहे?
२) आदरणीय संजय, फेसबुक जर हा मुद्धा मांडण्याचे प्लाटफॉर्म नाही असे आपणास वाटत असेल तर, आपण आपले बामसेफचे सर्व दिग्गज मा. बी. डी. बोरकर साहेब, मा वामन मेश्राम साहेब, विजय मानकर यांना एका ओपन प्लाटफॉर्मवर बोलवा आणि होयू द्या खुली चर्चा. मात्र चर्चा सकारात्मक असावी.
३) तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर काय देणार याची जान आहे मला.
४) बामसेफनी आता आपली भूमिका स्पष्ट केलीच पाहीजे. बामसेफनी स्वीकारलेली मूलनिवासी ‘’संकल्पनेची’’ व्याख्या काय ? त्याचा सैध्यान्तिक आधार काय आहे ? जर बाबासाहेबांनी मूलनिवासी संकल्पना मंडळी असे आपले मत असेल तर आम्हालाही कळू ध्या , बाबासाहेबाचा कोणता सिद्धांत आहे? बुद्धाची व महात्मा फुलेंची बहुजांची संकल्पना आपण मूलनिवासी म्हणून स्विकारत आसल तर निव्वळ शब्दाचे नामांतर करून आपल्या आदर्श पुरुषांनी दिलेला स्वीकारण्याची आम्हास लाज का वाटावी ? आंबेडकरी विश्वव्यापी आयडेन्टी विशाल पर्वता सारखी भरभकम उभी असताना देखील वांशिक संकल्पनेच्या गभ्याऱ्यातून उपजलेली मूलनिवासी संकल्पना का स्वीकारत आहात हे सर्व आंबेडकरवाद्यांना कळू द्या.
५) संजय मित्रा, आपण जगातल्या मूलनिवासी संकल्पेचा तर विचार करा, डोळ्यावर पट्टी बांधून न्यायदेवता होण्यात काय अर्थ?

=============================================================
Latari Madavi
October 16
4
आंबेडकरी आयडेन्टीटी की मूलनिवासी आयडेन्टीटी ?

मा. वामन मेश्रामजी, मा. विजय मानकरजी, मा. बि. डी. बोरकरजी कृपया आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या . आपली मूलनिवासीची भूमिका जगासमोर येवू द्या.
‘’अलीकडेच मूलनिवासीचा मूद्दा समोर करून, आंबेडकरी चळवळीतील वैचारिक आंदोलनाची धार बोथट करण्याची विडंबना काही मित्रांकडून होते आहे. हिंदुत्वाला नाकारण्याचे चित्र उभे करण्यास डा. आ. ह. साळुंके, पुरुषोत्तम खेडेकर यांचे सारख्यांनी बामसेफ सारखे स्टेज वरून ब्राम्हण वादावर हल्ला केला आणि त्यांच्याच करवी बुद्ध धम्माला बगल देवून माईल्ड हिंदुझम '' शिव धर्म '' उभा केला. बाबासाहेबाच्या स्वप्नातील बुद्धमय भारत देश उभारण्याचे दूरच राहीले. बौध्द धम्म घटनेच्या २५ व्या कलमात अडकून हिंदू कायद्यात अडकला आहे .' बौद्ध' चा वेगळा कायदा व्हावा या संबधाचे बामसेफ नी पुढाकार कधीच घेतला नाही. १९९३ मध्ये संयुक्त राष्ट्र संघात मूलनिवासी संकल्पना जगा समोर आली त्यावेळी बामसेफ चूप होती . १९९५ ला मी बहुजन नायक मध्ये एक लेख प्रसिद्ध केला त्यावेळी मा. वामन मेश्राम यांनी संपादक या नात्याने, माझा लेखावर ''मूलनिवासी या लेखासी बिलकुल सहमत नाही असी प्रतिक्रिया लेखाच्या मध्य भागी छापली होती . २००० मध्ये सयुंक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार उच्च आयुक्तालयाने दरबान [क्षिण आफ्रिका ] येथे वांशिक भेदभाव या विषयावर आंतर राष्ट्रीय संमेलन झाले. तिथे दलितांना मूलनिवासी असी ओळख दिली नाही. '' काष्ट इज रेस'' ( Caste is Race ) असे नारे द्यावे लागले. तिथे दलितांना मूलनिवासी आयडेन्टीटी मिळत नसल्यामुळे, दलित फोरम वेगळे स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. मात्र आदिवासीना मूलनिवासी म्हणून मान्यता होती. मी स्वतः त्या जागतिक परिषदेला हजार असल्यामुळे त्याचे मी एकमेव उदाहरण आहो. बामसेफचा मूलनिवासी हा मुद्धा राजकीय आहे. तो सांस्कृतिक ओळख बहाल करणारा नाही. बाबासाहेबाच्या स्वप्नातील बौधमय भारत देश उभा करणारा नाही. आंबेडकरी आणि आदिवासींना संस्कृतिक मूल्याच्या आधारे जोडणारा नाही. बहुमताच्या ठरावाला विरोध करून विश्व बंडखोरी करणारा बुद्धाची आणि आदिवासीच्या विश्वव्यापी संस्कृतीक मूल्याची नाळ जुळत असल्याच्या सत्याला मूलनिवासीचा मुधा समोर करून बामसेफव्दारा नष्ट करीत आहे. त्यामुळे यावर खुली डिबेट होणे गरजेचे आहे.’’
काही प्रश्न……
१] मूलनिवासी बाबासाहेबांनी संकल्पना कधीच मांडली नाही. पण आपला आग्रह का ?
२]आंबेडकरी विश्वव्यापी ओळख मागे सारून मूलनिवासी संकल्पना का मांडतो आहोत ?
३ ] मूलनिवासी हे जगातील कोणत्याच देशात बहुसंख्य नाहीत ते अल्प संख्यांक आहेत. आम्ही बहुसंखाकाना मूलनिवासी संबोधन का करीत आहोत,?
४ ] मूलनिवासीची व्याख्या [ universal definition ] कोणती ?
५] जगातील मूलनिवासीच्या संयुक्त राष्ट्र संघ UNO, आय एल ओ ILO, रिझर्व बँक, सर्वोच्य न्यायालय ने केलेल्या व्याख्या आपणास मान्य आहे की नाही? मान्य नसेल तर आपली व्याख्या कोणती ?
६] या देशाचे आदिवासी हे मूलनिवासी आहेत, पण बाबासाहेबांनी त्यांना संविधानात अनुसूचित जमाती का बनविले? याची दाखल धेणार की नाही ?
७ ] आदिवासीना जाती (CASTE )ऐवजी ‘’ रेसेस’’ (Races) का म्हटले ?
८] आदिवासी हे जाती कोठडीच्या बाहेरचे आहेत. वेगळी सांस्कृतिक व वांशिक ओळख आहे. हे आपण मान्य करणार की नाही?
९ ] जगातील मूलनिवासी संकल्पना रेसियल थ्रेरीवर आधारित आहे तर बाबासाहेबांना रेसियल थ्रेरीच नाकारतात. मग जाती कोठडीतील लोकांना मूलनिवासी बनविण्याचा निर्धार का ?
१०] आपण देत असलेला डी एन ए रिपोर्ट चा हवाल हा जाती कोठडीच्या लोकासंबधीचा (caste group people) आहे, तो वांशिक गणाच्या लोक समूहा संबधीचा (Racial group) नाही. आदिवासी जाती कोठडीच्या बाहेरचे आहेत.
११] ५ जाने. २०११ च्या सर्वोच्य न्यायालयाच्या निकाला नुसार ९२% लोक बाहेरून आले असे म्हटले आहे. मग बहुजन हे मूलनिवासी कोणत्या आधारावर ?
१२] मूलनिवासी ही संकल्पना ‘’सांस्कृतिक ओळख’’ (Cultural Identity) बहाल करते, कारण आदिवासी मध्ये आजही ‘’ संस्कृती’’ जीवंत आहे. आपण कोणत्या सांस्कृतिक मूल्याचा आधार मांडीत आहात.? कालचा अस्पृश्य आजचा आंबेडकरी, बुद्ध तत्वज्ञानवर आधारीत आहे . महाराचे सांस्कृतिक मुल्ये आणि बुद्धाचे सांस्कृतिक मुल्ये मांडणार आहात किंवा नाही ?
१३] मूलनिवासी संकल्पना स्वनिर्धारण अधिकाराची (Rights of Self determination) पार्श्वभूमी तयार करते आपणास काय अपेक्षित आहे.?
आपणास बाबासाहेबांची विश्वव्यापी आंबेडकरी ओळख कुठे कमी वाटते? की ज्यामुळे स्वताला मूलनिवासी संबोधन करून, खऱ्या मूलनिवासीच्या मुद्द्याला (Adivasi identity) दाबून टाकीत आहात .
Adv. Madavi L K, Nagpur
9405900010

2

Latari Madavi
October 15
आंबेडकरी आयडेन्टीटी की मूलनिवासी आयडेन्टीटी ?
Dear Bansod,
Thanks for quoting a debate para.. there is no definition and para meters in constitution to define Scheduled Tribe. This is the borrowed concept of East India Company and European colonization's slavery code imposed on Indigenous people and same adopted in Constitution as to to. During the Constitution debate Nov.1949, Adivasi representative Mr. Jaipal Singh Manda was raised the points before Hon;ble Dr. Babasaheb Ambedkar, (Chairman Drafting Committee) Pt. Jawahar Lal Neharu ( Prime Minister) , and Dr. Rajendra Prasad ( President) that....
" You are saying to me jangali Adivasi, yes I am proud to be Adivasi, but why you people are not saying to me Adivasi in Constitution" ? The answer is still awaited and all intellectuals are silence.
===========================================================================
1
आंबेडकरी आयडेन्टीटी की मूलनिवासी आयडेन्टीटी ?

संजय इंगोलेजी जयभीम, जय रावण ,
संजय मोहीते आमचे परम मित्र, अनेक वर्ष चळवळीच्या माध्यमातून जवळीक आहे . त्यांच्या बद्धल हृदयात आदराच स्थान आहे.त्या प्रेमा पोटी प्रश्न प्रपंच
दोन समांतर चळवळीच्या दिशा संकल्पित ध्येय न गाठता प्रश्न चिन्ह निर्माण करतात तेंव्हा कालांतराने समांतर रेषा कधीच जुडत नाही असा काही विचाराचा उद्रेक समोर येतो.
संजय मोहितेना मित्र म्हणून काही प्रश्न ….
१] मूलनिवासी बाबासाहेबांनी संकल्पना कधीच मांडली नाही. पण आपला आग्रह का ?
२]आंबेडकरी विश्वव्यापी ओळख मागे सारून मूलनिवासी संकल्पना का मांडतो आहोत ?
३ ] मूलनिवासी हे जगातील कोणत्याच देशात बहुसंख्य नाहीत ते अल्प संख्यांक आहेत. आम्ही बहुसंखाकाना मूलनिवासी संबोधन का करीत आहोत,?
४ ] मूलनिवासीची व्याख्या [ universal definition ] कोणती ?
५] जगातील मूलनिवासीच्या संयुक्त राष्ट्र संघ UNO, आय एल ओ ILO, रिझर्व बँक, सर्वोच्य न्यायालय ने केलेल्या व्याख्या आपणास मान्य आहे की नाही? मान्य नसेल तर आपली व्याख्या कोणती ?
६] या देशाचे आदिवासी हे मूलनिवासी आहेत, पण बाबासाहेबांनी त्यांना संविधानात अनुसूचित जमाती का बनविले? याची दाखल धेणार की नाही ?
७ ] आदिवासीना जाती (CASTE )ऐवजी ‘’ रेसेस’’ (Races) का म्हटले ?
८] आदिवासी हे जाती कोठडीच्या बाहेरचे आहेत. वेगळी सांस्कृतिक व वांशिक ओळख आहे. हे आपण मान्य करणार की नाही?
९ ] जगातील मूलनिवासी संकल्पना रेसियल थ्रेरीवर आधारित आहे तर बाबासाहेबांना रेसियल थ्रेरीच नाकारतात. मग जाती कोठडीतील लोकांना मूलनिवासी बनविण्याचा निर्धार का ?
१०] आपण देत असलेला डी एन ए रिपोर्ट चा हवाल हा जाती कोठडीच्या लोकासंबधीचा (caste group people) आहे, तो वांशिक गणाच्या लोक समूहा संबधीचा (Racial group) नाही. आदिवासी जाती कोठडीच्या बाहेरचे आहेत.
११] ५ जाने. २०११ च्या सर्वोच्य न्यायालयाच्या निकाला नुसार ९२% लोक बाहेरून आले असे म्हटले आहे. मग बहुजन हे मूलनिवासी कोणत्या आधारावर ?
१२] मूलनिवासी ही संकल्पना ‘’सांस्कृतिक ओळख’’ (Cultural Identity) बहाल करते, कारण आदिवासी मध्ये आजही ‘’ संस्कृती’’ जीवंत आहे. आपण कोणत्या सांस्कृतिक मूल्याचा आधार मांडीत आहात.? कालचा अस्पृश्य आजचा आंबेडकरी, बुद्ध तत्वज्ञानवर आधारीत आहे . महाराचे सांस्कृतिक मुल्ये आणि बुद्धाचे सांस्कृतिक मुल्ये मांडणार आहात किंवा नाही ?
१३] मूलनिवासी संकल्पना स्वनिर्धारण अधिकाराची (Rights of Self determination) पार्श्वभूमी तयार करते आपणास काय अपेक्षित आहे.?
आपणास बाबासाहेबांची विश्वव्यापी आंबेडकरी ओळख कुठे कमी वाटते? की ज्यामुळे स्वताला मूलनिवासी संबोधन करून, खऱ्या मूलनिवासीच्या मुद्द्याला (Adivasi identity) दाबून टाकीत आहात .
प्रिय संजयजी, हा प्रश्न वैचारिक पातळीवर घ्यावा तो वैयक्तिक असू नये. यावर डिबेट होणे गरजेचे आहे . सुरुवात होणे गरजेचे आहे!
Adv. Madavi L K, Nagpur

दहशतीखाली वावरतेय आदिवासी मुलांचे भविष्य ! - संचिता सातवी

दहशतीखाली वावरतेय आदिवासी मुलांचे भविष्य !
 धिक्कार ! धिक्कार ! धिक्कार!
डहाणू आगर येथे घडलेली आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील सुरक्षारक्षकाने(….? कि भक्षक)   त्याच  वसतिगृहातील  आदिवासी विद्यार्थांना मारहाण  आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द उच्चारल्याबद्दल एक आदिवासी म्हणून या नीच कृत्याचा  हे कृत्य करणार्यांचा मी धिक्कार करते.
अरे समजतात काय हे स्वताला …? यांना  रोजी रोटी आदिवासी विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यास दिली जाते ,पण इथे तर कुंपणच शेत खाण्याचे प्रकार घडताहेत ,कोल्ह्याला काकडीचे शेत राखायला द्यावे आणि त्याने ते फस्त करावे , असे प्रकार आज सर्रास आदिवासी आश्रम शाळांमध्ये घडतं आहेत .
येथील वसतिगृहात आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द दारू पिउन आलेल्या सुरक्षारक्षकाने उच्चारले आणि आदिवासी मुलांची समाजाबद्दलची अस्मिता जागृत झाली, या गोष्टीला विरोध  करणाऱ्या विद्यार्थांना या सुरक्षारक्षकाने स्थानिक  गुंडांना बोलावून मारहाण  शिवीगाळ केली, आज या वस्तीगृहातले विद्यार्थी प्रचंड दहशती खाली वावरत आहेत, त्या सुरक्षारक्षका विरुद्ध बोलण्यास  एकही विद्यार्थी पुढे यायला तयार नाही. आणि इतके करूनही हे लोक उजळ माथ्याने फिरताहेत .

आवाज उठवणारे विद्यार्थी टार्गेट!
 आज या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालेय कि ,शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या वसतिगृहात  आश्रम शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी केवळ असुरक्षितच नाहीत तर प्रचंड मोठ्या दहशतीखाली वावरत आहेत . मग काय आधीच अनेक समस्यांनी पिडीत असलेला  आपल्या कुटुंबापासून लांब राहत असलेला  विद्यार्थी इतक्या प्रचंड दहशतीखाली असेल तर काय भविष्य घडवणार तो स्वतःचे  समाजाचे …? हा विषय खूपच गंभीर बनत चाललेला आहे ,कारण आश्रमशाळा वा वसतिगृहात चाललेल्या  गैरप्रकारामुळे विद्यार्थांना मुळातच मुलभुत सुविधांसाठी झगडावे लागत आहे, हे कमी होते कि काय म्हणून आता विद्यार्थांना मारहाण  बलात्कारासारखे सारखे प्रकार घडताहेत ,याचा दुष्परिणाम विद्यार्थांच्या अभ्यासावर होवून त्यांची गुणवत्ता खालावत चाललेली आहे , विद्यार्थ्यांचे भविष्यच धोक्यात आले आहे . आणि याविरुध्द आवाज उठवणाऱ्या विद्यार्थांनाच निशाणा बनवले जात आहे .  यामुळे विद्यार्थांना  मानसिक  शारीरिक त्रास होत असतो . आणि मुख्य म्हणजे याचा ना  आपल्या तरुण पिढीला चीड येतेय, ना आदिवासी समाजातून किंबहुना वस्तीगृहातूनच मोठे होवून बाहेर पडलेल्या उच्चशिक्षित आदिवासींना , स्वतःला आदिवासींचे कैवारी समजणाऱ्या आदिवासी नेत्यांना ।! सर्व आपापले खिसे भरण्यात मग्न आहेत .

उदासीन उच्चशिक्षित आदिवासी तरुण पिढी!
आणि एरवी कोंबड्यालाही लाजवेल इतके  नियमित facebookवर  वा twitter वर गुड मोर्निंग बोलणारे माझे आदिवासी बंधू_ भगिनी आता कुठे गायब झाले,या प्रकरणाबद्दल ची post   facebook वर टाकली गेली ,जेणेकरून आजच्या तरुण पिढीचा धगधगता राग comment च्या रूपाने दिसेल पण  मी विसरलेच कि कोंबड्यांना केवळ गुड मोर्निंग बोलता  येते. अरे मित्रांनो हे काय चालवलेय  तुम्ही…? जिथे google  facebook माध्यम  बनवून  आज तुमच्यातीलच काही तरुण समाज बदलाची भाषा करताहेत,आणि  आपण  कुठे  केवळ गुड मोर्निग  नट नट्यांच्या फोटोला like करत बसताहेत,अर्थात  हेही आहे कि मौजमस्तीसाठी गरजेचे ! पण समाजाबद्दल आपण एव्हडे उदासीन कसे, कि ते वाचायलाही आपल्याजवळ वेळ नसतो . केवळ  ते  जण आपली मते comment  like करून मांडत असतात ,मग  बाकीचे कुठे  गेले  ….?शेवटी social networking site वर दिल्या जाणार्या comment आणि like म्हणजेच आपल्या विचारांचा  दृष्टिकोनाचा आरसा असतो हे विसरून चालणार नाही . आपण तलवार  घेवून युध्द करायला नाय जावू शकत तर निदान जखमींना मलम तर लावू शकतो  …?केवळ या online माध्यमातून आपले विचार तर मांडू शकतो ,कि आपला सामाजाबद्दलचा  स्वाभिमानच हरवला आहे ….?
केवळ आगरचीच घटना नाही तर अलीकडेच घडलेली  धुंदलवाडी  येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनीवर  बलात्कार प्रकरणाची घटना असो, या  अशा अनेक गुन्ह्यांचे ठिकाण आदिवासी आश्रमशाळा  वसतिगृहे बनत चाललेली आहेत आणि  हे नीच कृत्य करण्यात त्या त्या आश्रमशाळेतील अधीक्षक  सुरक्षारक्षकाचे हात बरबटले आहेत . .

नेत्यांना आपल्या सभेत तारपा  नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात  …?
आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे ऐकूनही आपल्या तरुणाईचे रक्त खवळत नाही .त्यांच्या मनात या असल्या नीच लोकांबद्दल चीड निर्माण होत नाही कारण आमचे रक्तच थंड पडलेय ।अगदि बर्फासारखे थंड ! कि असे तर नाही नाही  कि आपण स्वतःला आदिवासी समजणेच सोडून दिलेय !
एका आश्रम शाळेला भेट दिली , तेथील मुलींच्या सौचालाय /बाथरुमला दरवाजेच नाहीत ,सताड उघडी बाथरूम ! सदर अधीक्षकाला जाब विचारला असता  त्या "महान" व्यक्तीचे उत्तर आले,"आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनी लहान आहेत (७ वी,ते ११वी)  म्हणून त्यांना कशाला दरवाजे हवेत …?"
धिक्कार असो अशा मानासिकतेचा  !. १०वी,११वी च्या विद्यार्थिनी लहान…? आणि लहान असल्या म्हणून का त्यांनी उघड्यावर शौचास  अंघोळीला जावे …? मित्रांनो हे सर्व आपल्याच समाजाच्या बाबतीत घडते 'वर्षानु वर्षे उघड्यावर हगणाऱ्या आदिवासींना कशाला हवेत दरवाजा बंद बाथरूम …?' अशी त्या मागची नीच भावना या लोकांच्या मनात असते .
आज या अशा अनेक घटना आदिवासी विद्यार्थांचे हक्काचे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत  वसतिगृहात घडत आहेत,आहेत ,परंतु त्याविरुद्ध कोणता आदिवासी नेता आवाज उठवताना  संसदेत हा विषय ठोसपणे मांडताना दिसत आहे …? कि केवळ दुसर्यांच्या हातातले बाहुले बनून राहणाऱ्या या नेत्यांना आपल्या सभेत तारपा  नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात  …? एरवी बेगडी पाठींबा दाखवून आदिवासीच्या सेवेच्या आणाभाका घेणारे नेते अशावेळेस कापुराच्या वडीसारखे कुठे उडून जातात …?

आयात केलेले बिगर आदिवासी, कर्मचारी मोठे संकट !         
 विद्यार्थांचे पालकही या बाबतीत उदासीन दिसतात ,पालकांनी मिळून जर आवाज उठवला तर पुन्हा असली हिम्मत कुणी करायला शंभरदा विचार करेल .परन्तु गरिबीने ग्रासलेले  संसाराच्या रहाटगाड्यात अडकलेले पालक आपल्या पाल्यांच्या या समस्यांविरुद्ध आवाज उठवताना दिसत नाहीत ,कुणी पालकांनी आवाज उठवलाच तर तो बड्या प्रवृत्तींकडून  दाबला जातोय .
           आणखी एका मुद्द्याकडे मला सर्वांचे लक्ष वेधून घ्यावेसे वाटतेय कि ,आज बहुतेक  आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षक म्हणा अधीक्षक किंवा सुरक्षारक्षक वा इतर कर्मचारी हे स्थानिक आदिवासी नसून देशावरून आलेले बिगर आदिवासी असतात ,या लोकांना  आदिवासी समाजाबद्दल आपुलकी असते ना अस्मिता (काही अपवाद वगळता)केवळ अर्थार्जनासाठी नोकरी करायची म्हणून करत असतात .  जर स्थानिक आदिवासींची निवड या ठिकाणी झाली तर नक्कीच हे प्रकार बदलू शकतात . निदान तशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही
             काही "अभ्यासू"(…?) लोकांनी आम्हालाही प्रश्न विचारलेत कि ''तुम्ही काय करता या असल्या प्रश्नांवर… ? ,काहींनी तर निर्णयच दिला कि 'तुम्ही काहीच करताना दिसत नाहीत' .अशा अभ्यासू मंडळींना मी सांगू इच्छिते कि केवळ इतरांना "तुम्ही काय केले ""असे विचारण्यापेक्षा " आपण सोबत मिळून  करूया 'असे म्हणा ; मित्रांनो हा समाज आपला आहे, मग कुणी एक व्यक्ती किंवा संघटना एकटीने लढून चालत नाही.  त्यासाठी एकजूट होणे गरजेचे आहे . कारण एकटा  आवाज दाबला जातोय पण तोच आवाज जेव्हा पूर्ण समाजाकडून उठवला जाईल  , तेव्हा तो एल्गार असेल  .,
मित्रांनो हा लेख त्या तमाम आदिवासी तरुणांना जागे करण्यास आहे जे समाजात होणारे अन्याय बघूनही शांत आहेत .ज्यांची  बोटे केवळ नट नट्यांच्या फोटोला like करण्यात मग्न असतात . आपण या समाजाचे भविष्य आहोत. पण  इतके उदासीन भविष्य काय कुणाचा उद्धार करणार …?


उपाय 
             या घटनाच्या निमित्ताने आपण तरुण पिढी एकत्र येवून पुढील गोष्टी तर नक्कीच करू शकतो .
१) पालक ,आजी  माजी विद्यार्थी यांची एक समिती स्थापन करून एक दबाव गट बनविणे ,जेणेकरून असे प्रकार घडल्यास आपला दबाव गट प्रशासन  आपले नेते दोघांवरही दबाव आणून या असल्या प्रकरणाचा छडा लावण्यास  दोषींना योग्य ती शिक्षा देण्यास  आपण त्यांना भाग पाडू शकतो .
 ) याशिवाय सर्व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा एक गट बनवून ते आपल्या पाल्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देवू शकतात ,शेवटी एकीचे बळच कामी येते .
 ) आश्रमशाळेतील  आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थांना आपल्यावर होणाऱ्या  अन्यायाविरुध्द बोलण्यास पुढे आणायला हवे ,याशाठी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना अभय देणे गरजेचे आहे .
 ) पालक  विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून अन्याय झाला तर त्याबद्दल दाद कशी मागावी ,कुठे तक्रार करावी हे सर्व मुद्दे त्यांना पटवून देवून त्याची माहिती त्यांना देणे आवश्यक आहे .
यासाठी सर्वांनी एकत्र लढा देणे गरजेचे आहे शेवटी आजचे विद्यार्थी हे उद्या समाजाचे भविष्य ठरतील .

लक्षात घ्या ,आता शांत बसले तर छत्तीसगड  झारखंड च्या आदिवासिंसारखी (लाखो आदिवासींची गावेच्या गावे पेटवून देणे ,त्यांना  त्यांच्या जमिनीवरून हुसकावणे ,आदिवासी स्त्रियांवर बलात्कार ,नक्षलवादी सांगून आदिवासींवर गोळीबार ,खून आणि प्रचंड प्रमाणात आदिवासींची पिळवणूक ) आपली गत व्ह्यायला वेळ नाही लागणार, किंबहुना ही  त्याच पर्वाची सुरवात मानायला हरकत नाही.

संचिता सातवी, आदिवासी युवा शक्ती




Online Photo : https://plus.google.com/photos/103801329114961339077/albums/5936457438279297025 


Find us on Facebook