Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

Warli Painting Center by AYUSH

Warli Painting Center by AYUSH
Near Bust Stop, on Vangoan Kasa Road, Near Birsa Munda House, Khambale, Taluka Dahanu, Dist Palghar, Maharashtra 401103

Nearest Railway Station: Vangaon
Mobile No.: 09764795550

Google Map: https://g.page/Warlipaintingkhambale?gm

Warli World Art Store by AYUSH

Warli World Art Store by AYUSH
Shop No. 4, Malaxmi Plaza, Sagar Naka, Dahanu Javhar Road, Taluka Dahanu, Dist Palghar, Maharashtra 401602

Nearest Railway Station: Dahanu
Mobile No : 85540 81333

Google Map : https://g.page/warli-world?gm

Warli Painting Design Sadee

वारली चित्रकलेच्या मोटिव्ह असलेल्या डिझाईन कपडे भेटवस्तू म्हणून स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या उपक्रम सुरु करीत आहोत. या माध्यमातून विविध रंगसंगतीत आणि फॅब्रिक प्रकारात प्रायोगिक तत्वावर काही भेट वस्तू उपलब्ध करीत आहोत. नोंद करून मागणी नोंदवू शकता. Link

"कलेतून परंपरा जगूया, स्वावलंबी समाज घडवूया"

आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम 

AYUSH Warli Painting Cluster
Warli Painting Sadee Design

|| एक पाऊल : रोजगाराची संधी ||

वर्ष येतील जातील, कॅलेंडर बदलतील. जल जंगल जमीन सोबत पर्यावरण पूरक रोजगार निर्मिती चे प्रयत्न समाजातून उभे करून एक पाऊल पुढे टाकूया

आदिवासीत्व जपून आर्थिक स्वावलंबनासाठी समाजात रोजगार निर्मिती महत्वाची आहे. आदिवासी विकास विभाग, CSR, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांच्या सहकार्याने आयुश उपक्रम अधिक प्रभावी करण्याकरिता पुढील पदांसाठी भरती करत आहोत. इच्छुकांनी त्वरित नोंदणी करावी.

आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम

१) समन्वयक : (डहाणू, तलासरी, जव्हार, विक्रमगड, पालघर तालुका)
एकूण १० पदे (५ युवती/महिलांसाठी )
पात्रता : कोणतीही पदवी/पदविका, कंप्युटर/मेल वापरण्याचे चे ज्ञान 
दायित्व : वारली चित्रकला उपक्रम समन्वयक चे कार्य आणि जबाबदारी
नोंदणीसाठी येथे क्लिक करावे : www.job.adiyuva.in

२) सयुंक्त राष्ट्र विकास उपक्रम मार्फत आयुश च्या आगामी तलासरी येथील केंद्रा साठी, पुढील पदांसाठी इच्छुकांनी बायोडेटा ayush@adiyuva.in येथे मेल करावा

1. Project Manager (1)-
S/he should have an MBA/ Masters in Rural Management/Rural Development/Social Sciences/Handloom/handicraft and at least five years of experience of working with various handloom/handicraft clusters. S/he should have good liaising skills and good understanding of government procedures, government flagship programs/schemes. S/he should be fluent in Marathi and English.

2. Business Dvlpmt Manager (1)-
S/he should have a Bachelor’s/master’s degree in craft sector with NIFT/IIHT/ATDC or any design background and at least five years of experience of working in clusters. S/he should be fluent in Marathi and English.

3. Institution Building officer (1)-
S/he should have Masters/bachelor’s degree in Social Sciences/social work and at least five years of experience in promoting producer groups, producer organisations and convergence. S/he should be fluent in Marathi and English.

3) या उपक्रमात कलाकार तसेच इच्छुक युवक यवतींनी सहभागी होण्यासाठी www.kala.adiyuva.in येथे नोंदणी करावी. (आधी केली असल्यास, पुन्हा गरजेची नाही)

चलो आदिवासी समाज हिताचे प्रत्येक प्रयत्न मजबूत करूया, जल जंगल जमीन जीव जोहार !

|| महिला स्वावलंबन : वारली चित्रकला ||

हजारो वर्षांपासून सुईन, सवासीन, धवलेरी, चौकेऱ्या, भगत यांनी पिढ्या न पिढ्या जतन केलेले पारंपरिक ज्ञान, संस्कृतिक मूल्य, बौद्धिक संपदा आदिवासी समाजाची सांस्कृतिक ओळख टिकविण्यासाठी महत्वाची आहे.

त्या सोबत आज जगप्रसिद्ध वारली चित्रकलेच्या माध्यमातुन मूल्य जतन करून आर्थिक स्वावलंबन साठीचा पर्याय उभा केला जाऊ शकतो. या कामी युवती आणि महिलांचा सहभाग वाढावा आणि घरातल्या घरात रोजगार व सांस्कृतिक मूल्य जतन व्हावे या हेतूने पालघर जिल्ह्यात आयुश तर्फे महिला विशेष उपक्रम सुरु करत आहोत. सहभाग घेण्यासाठी त्वरित नोंदणी अर्ज भरावा.

📣 सूचना : नोंदणी केलेल्या कलाकारांनी 5 नमुना कलावस्तू तयार करून ठेवाव्यात, लवकरच बैठक बोलावण्यात येईल

जोहार !

___________
नोंदणी अर्ज लिंक भरा .kala.adiyuva.in

आदिवासी संबंधीचे सरकारी धोरण 1

तमाम अदिवासींनो,  आजपासून "आदिवासी संबंधीचे  सरकारी धोरण  यावर लेखमाला सादर करीत आहे . आपल्या व्यस्त शेड्युल मधून  थोडा वेळ काढून वाचाल ही अपेक्षा .
.   सरकारी धोरण जाणून घेण्याबरोबर आपण  महाराष्ट्रातील आदिवासी नेमके किती आणि कोठे आहेत तसेच आज ते कोणत्या पारिस्थितीत जगत आहेत ते समजून घेऊ .
1. महाराष्ट्रातील आदिवासी जमाती , त्यांची लोकसंख्या  आणि ते कोठे आहेत :       
महाराष्ट्रात आदिवासींच्या एकूण 45 जमाती आहेत यापैकी 2011 च्या जनगणनेनुसार भिल्ल, गोंड, महादेव कोळी&मल्हार कोळी , वारली, कोकणा आणि ठाकूर  या 6 जमातींची  एकत्रित लोकसंख्या महाराष्ट्रातील एकूण आदिवासींच्या 73.3% एवढी आहे . महाराष्ट्रात एकूण 19 जमाती आशा आहेत ज्यांची संख्या 1000 पेक्षा कमी आहे ; 5 जमाती आशा आहेत ज्यांची संख्या 1000 पेक्षा  जास्त व 10 हजारपेक्षा कमी आहे; . 7 जमाती आशा आहेत ज्यांची संख्या 10000  पेक्षा  जास्त व 50 हजारपेक्षा कमी आहे. 1ते 2 लाख लोकसंख्या असलेल्या 7 जमाती आहेत. आदिवासी जमातींपैकी सर्वात जास्त घुसखोरी हलबा, हलबी या जमातीमध्ये कोष्टी ,हलबाकोष्टी यांनी केली आहे. 1971 च्या जनगणनेत 7205 इतकी लोकसंख्या असलेल्या हलबा/ हलबी ची 1981 मध्ये झालेली लोकसंख्या 242818 झाली आहे (जन्म वाढीचा दर 25% असताना   1976 सालीक्षेत्र बंधन उठविल्यानंतर  ही वाढ 327% झाली आहे)  1971 च्या जनगणनेत 482 996  इतकी लोकसंख्या असलेल्या  महादेव कोळी ,टोकरे कोळी ,मल्हार कोळीची 1981 मध्ये झालेली लोकसंख्या 11,63,121 झाली आहे(1976 सालीक्षेत्र बंधन उठविल्यानंतर ही दरवाढ   141%झाली आहे )  1971 च्या जनगणनेत 56061 इतकी लोकसंख्या असलेल्या  कोलामची 1981 मध्ये झालेली लोकसंख्या 118075  झाली आहे .(1976 सालीक्षेत्र बंधन उठविल्यानंतर ही दरवाढ   117%झाली आहे ) महाराष्ट्रातील तीन आदिवासी  जमाती  या आदिम जमाती म्हणून केंद्र सरकारने जाहीर केल्या आहेत , त्यात कोलाम (यवतमाळ जिल्हा ),कातकरी (ठाणे आणि रायगड जिल्हा ) आणि माडिया गोंड (गडचिरोली जिल्हा ) यांचा समावेषश आहे  .आदिवासींचे हेरिटेज ग्रुप म्हणून इतर आदिवासी समाजाने या तीन समूहांची काळजी घेतली पाहिजे .
महाराष्ट्रात आदिवासींची संख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 9.4 % म्हणजे 1 कोटी 5 लाख एवढी आहे . भिल्ल(    21.2%) गोंड(   18.1%), महादेव कोळी(  14 .3%), वारली( 7.3%), कोकणा ( 6.7%)आणि ठाकूर(  5 .7%) अशी लोकसंख्येची विभागणी आहे  . राज्यातील सुमारे 15 लाख आदिवासी शहरी भागात वास्तव्यास आहेत आणि 90 लाख लोक ग्रामीण भागात द-या खोऱ्यात ,जंगलात राहत आहेत .
 महाराष्ट्रात मुख्यतः 14 जिल्यात आदिवासींचे वास्तव्य आहे . ज्याला आपण गोंडवाना विभाग म्हणतो त्या विदर्भातील  गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ , नांदेड ,नागपूर, गोंदिया, भंडारा आणि अमरावती हे 8 जिल्हे ,तर खानदेशातील धुळे ,नंदुरबार, जळगांव ,नाशिक हे जिल्हे आणि सह्याद्री विभागातील ठाणे आणि रायगड हे  जिल्हे मुख्यतः आदिवासी जिल्हे म्हणून ओळखले जातात . 
   वरील 6 प्रमुख जमाती या पूर्वी लढवय्या आणि राज्यकर्त्या होत्या .  पूर्वजांचा  लढवय्येपणा आणि रक्षण कर्ता जागृत ठेवायचा असेल तर  वर्षानुवर्षे दडपणाला बळी पडलेल्या आणि आता झोपेचे सोंग घेतलेल्या निद्रित अवस्थेतील आदिवासी समाजाने    14आदिवासीं बहुल  जिल्ह्यात   राजकीय व्यवस्था निर्माण केली पाहिजे

2. आदिवासीं स्थिती / समस्या:
                महाराष्ट्रातील तमाम जनतेने विशेषतःआदिवासीतेर  बहुजन समाजाने मुळातच मान्य करायला हवे की आदिवासींना त्याचं स्वतःच  एक  अस्तित्व आहे . आजही आदिवासींमध्ये  सामूहिक जीवन पद्धती, सामूहिक निर्णयपद्धती , आवश्यक तेवढाच संचय करणे,  जंगलाचे रक्षण करणे , गर्भलिंगनिदान चाचणी न करणे ,स्रियांना मान देणे  इत्यादी  चांगल्या प्रथा आहेत ,त्यातून इतरांनी  बरेच शिकण्याजोगे आहे . आदिवासीं समाजाने  निसर्गाच्या विरुद्द कधी पाऊल टाकले नाही. निसर्गाच्या नियमाप्रमाणे आदिवासी आपले जीवन जगत असतो . म्हणून  इतरांनी   निसर्गाला समजून घेतले पाहिजे. आदिवासींना जंगलाचे ,वनस्पतीच्या वापराबद्दलचे ज्ञान आहे . तरीही आजचा आदिवासी चुकीच्या आणि अपुऱ्या सरकारी कार्यान्वयन मुळे अनेक समस्यांनी ग्रस्त आहे  . पुढील लेखात  जंगल कायद्याच्या अडून  आदिवासींना अतिक्रमणदार (चोर)  बनऊन त्यांची वन जमिनीसाठी  मागणीदार म्हणून  कशी  पिळवणूक केली जाते ते पाहू  :

एकनाथ भोये   ,(संपर्क 8975439134 ) 
क्रमशः पुढे

|| आयुश उपक्रम : महिला गट बांधणी ||

|| आयुश उपक्रम : महिला गट बांधणी ||

वारली चित्रकार गट बांधणी नंतर एक प्रायोगिक उपक्रम हाती घेतो आहोत.
डहाणू, तलासरी, पालघर, जव्हार, विक्रमगड या ५ तालुक्यात प्रत्येकी १० महिलांचे गट तयार करीत आहोत.

ज्यूट पिशवी, कापडी पिशवी, कापडावर डिझाईन, भिंतीवर चित्र, पारंपरिक चवूक चौक काढणे, इत्यादीसाठी विविध उपक्रम घेतले जातील. सदर विषयात आवड आणि काम करण्यासाठी इच्छुक महिलांनी या लिंकवर नोंदणी करावी [ https://goo.gl/forms/slTqkq8ImAOb1Y382 ].

आपल्या संपर्कात कळवून इच्छुकांना नोंदणी करण्यास सांगावे.

वारली चित्रकला उपक्रमात महिलांचे स्थान मजबुतीकरण हा एक उद्देश आहे. वयक्तीक आणि कौटुंबिक जबादारी सांभाळून आर्थिक स्वावलंबनासाठी गावातल्या गावात किंवा घरून काम करता येण्यासारखे पर्याय उपक्रम तयार करणे विचाराधीन आहेत.

आपले मार्गदर्शन आणि सहभाग हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावेल याची खात्री आहे.

जोहार !

आयुश । आदिवासी युवा शक्ति
www.adiyuva.in । ० ९२४६ ३६१ २४९

।। आदिकला नोंदणी उपक्रम ।।

।। आदिकला नोंदणी उपक्रम ।।

आदिवासी समाजाच्या उज्वल भविष्यासाठी "आर्थिक स्वावलंबन" हे खूप महत्वाचे आहे. गेली अनेक वर्ष आपण आयुश तर्फे रोजगार्निमिती साठी विविध प्रायोगिक प्रयत्न करीत आहोत, हे उपक्रम व्यापक स्वरूपात नेण्यासाठी कलाकार, समाज, बेरोजगार युवक, शासन, खाजगी कंपनी (सी एस आर), इत्यादींडून एकत्रित प्लॅटफॉर्म बांधणी सुरु आहे.

आयुश चा वाढता संपर्क व कार्य, त्यातून कलाकरांना त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळावा, आदिवासी कला संस्कृतिचा प्रचार-प्रसार, स्थानिक रोजगार निर्मिती यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

वयक्तीक जबाबदारी आणि इत्तर प्राथमिकता या मुळे बहुतेकांना सामाजिक उपक्रमात सहभाग घेणे शक्य होत नाही, हे लक्षात घेऊन आपण एक अभिनव उपक्रम सुरु करत आहोत. जेणेकरून समाजात असलेले तज्ञ, अनुभवी, एक्स्पर्ट या समाज हिताच्या उपक्रमात सवडीनुसार सहभागी होऊ शकतील. पुढीलप्रमाणे दायित्व घेऊन या उपक्रमात सहभाग घेऊ शकता

१) कलाकार : चित्र, भेट वस्तू, शोभेचे सामान, घरोपयोगी सामान इत्यादी बनवता येणारे किंवा या क्षेत्रात शिकण्याची इच्छा असणारे

२) कलाकार गट / बचत गट / इत्यादी : एकत्रित काम करणारे गट

३) समन्वयक : उपक्रम, संपर्क आणि व्यवस्थापकीय दायित्व

४) प्रशिक्षक : कलाकरांना उपयोगी ठराविक विषयावर प्रशिक्षण देणे

५) मार्गदर्शक : कलाकारांना ठराविक विषयावर मार्गदर्शन करणे

६) स्वयंसेवक : उपक्रम यशस्वी करण्यासाठी जबादारी पार पाडणे

७) माहिती पुरवठा : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रमांना लागणारी पूरक आणि उपयोगी माहिती पाठवणे

८) प्रचारक/प्रसारक : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रमांविषयी प्रचार व प्रसार करणे

९) हितचिंतक : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रम अधिक प्रभावी करण्याकरिता सहयोग देणे

१०) सहयोगी : उपक्रमासाठी आर्थिक/वस्तू/सेवा स्वरूपात सहयोग

११) इत्तर : उपक्रमांसाठी वयक्तीक/एकत्रित माध्यमातून सहकार्य करणे

सहभागी होण्यासाठी त्वरित या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावा.
नोंदणी अर्ज लिंक : https://goo.gl/forms/HxmFWURxpfqln3ro1

विखुरलेले पोटेंशियल रचनात्मक आणि सकारात्मक आदिवासी सशक्तीकरणासाठी कमी यावे हि अपेक्षा. जल जंगल जमीन जीव पर्यावरण जतन करण्यासाठी आपली स्वावलंबी अर्थव्यवस्था महत्वाची भूमिका पार पाडेल अशी खात्री आहे.

आपल्या संपर्कात सगळ्यांना या बद्दल कळवावे, आपल्या गावात पण या संदर्भात माहिती देऊन सहभाग वाढवण्यास हातभार लावावा.

आयुश । आदिवासी युवा शक्ती
[आदिकला उपक्रम] www.adiyuva.in

|| आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम ||

आयुश गेट टुगेदर या वेळेस कलाकार एकत्रीकरण हा विषय घेऊन आयोजित करीत आहोत. संपर्कात असलेल्या सगळ्यापर्यंत हा निरोप पाठवून सहभागी व्हावे. आपला सहभाग / मार्गदर्शन / सहकार्य हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावेल अशी खात्री आहे.

उद्देश : कलाकृतीतून रोजगार निर्मिती आणि त्यातून आदिवासी समाजाचे स्वावलंबन मजबूत करण्यासाठी एक प्रयत्न.

ठिकाण : (बैठकीचे ठिकाण लवकरच कळवले जाईल),
        कासातालुका डहाणूजिल्हा पालघर
दिनांक : १ डिसेंबरशुक्रवार (सकाळी १० ते संध्याकाळी ५)
अपेक्षित सहभागी
१) आदिवासी कलाकार (चित्रकार, हस्तकलामुखवटे निर्मातेलाकडी आणि बांबू च्या वस्तूखेळणेशोभेच्या वस्तू तसेच इत्तर कलाकृती बनविणारे किंवा या विषयी आवड असलेले)
२) पारंपरिक ज्ञानसंस्कृती आणि बौद्धिक संपदा या बद्दल आवड असलेले
३) सदर विषयाला धरून सकारात्मक मार्गदर्शन/अनुभव सांगणारेनवीन शिकणायसाठी उत्सुक असलेले
चर्चेचे विषय:
कलाकारांना सध्याची आव्हाने/अडचणी/कमतरता त्यांचे मूळ आणि यावर उपाय योजना (तात्पुरता आणि कायमस्वरूपी)
एकत्रीकरणाची गरजपद्धतीउपक्रम कसे असावेत आणि त्यात कलाकारांची भूमिका
आर्थिक स्वावलंबनासाठी पर्यायी व्यवस्थासंधीत्यासाठी लागणारी तयारी
बौद्धिक संपदा कायदाशहरात परस्पर बिगर आदिवासींकडून होणारा आदिवासी कलांचा व्यवसाय आणि त्यावर उपाय
अपेक्षपार्ह (कपडेअस्वच्छ भिंती इत्यादी वर आदिवासी देवतांची) केले जाणारे चित्रीकरण यावर आपली भूमिका
नेदरलँड येथील कंपनीने नोंदविलेले वारली डिझाईन चे ट्रेडमार्क आणि त्या संबधी आयुश चा बौद्धिक संपदा कायदा अंतर्गत कायदेशीर लढा
भविष्यात अशा प्रकारची येणारी अशी दृश्य अदृश्य आव्हाने आणि त्यासाठी आपली तयारी
सहभाग घेण्यासाठी येथे नोंदणी करावी :  www.gtogether.adiyuva.in (आपल्या परिचयाचे कुणी येत असल्यास त्यांच्या वतीने फॉर्म भरावा)
सूचना -
ज्या कलाकारांना हँडीक्राफ्ट (हस्तशिल्प विकास आयुक्तालय) खात्याचे ओळखपत्र बनवायचे असल्यास २ पासपोर्ट फोटोआधार कार्डरेशन कार्डजातीचा दाखला आणि एक नमुना कलाकृती आणावीसदर कार्यालयात एकत्रित अर्ज सादर करण्यात येतील

आदिवासी समाज हिताचे उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी आपल्या सूचना आणि अभिप्रायांचे स्वागत आहे
आयुश । आदिवासी युवा शक्ती
www.adiyuva.in | ayush@adiyuva.in | 0 9246 361 249

India's first Tribal Entrepreneurship Summit

Ayush | adivasi yuva shakti is going to participate in India's first Tribal Entrepreneurship Summit at Dantewada, Chhattisgarh on 14th November 2017

Image may contain: text



The tribal regions in India are bestowed with the wealth of natural resources like forest and minerals and traditional knowledge that the tribal communities possess about the natural eco-system, medicinal plants, forest produce, handicrafts and agriculture. Ironically these regions are also one of the most under-developed and face problems of great scale such as poverty, malnutrition, low literacyand poor health. These mammoth problems can only be solved when inspired individuals challenge the status quo with their entrepreneurial zeal and spirit of innovation and develop solutions building on the core strengths of the tribal regions.

With the motive to inspire, nurture and promote this spirit of entrepreneurship; NITI Aayog is holding India’s first Tribal Entrepreneurship Summit at Dantewada, Chhattisgarh on 14th Nov, 2017. The event is a part of 8th Global Entrepreneurship Summit being held in India for the first time with the joint efforts of Government of India and United States of America. The tribal entrepreneurship summit will see the participation of tribal entrepreneurs from various sectors across the country and abroad and will be attended by the dignitaries like Hon. MoS, Science and Technology, Y. S. Chowdary and Mr. Ramanathan Ramanan, Additional Secretary, NITI Aayog.

Find us on Facebook