Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

|| आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम ||

आयुश गेट टुगेदर या वेळेस कलाकार एकत्रीकरण हा विषय घेऊन आयोजित करीत आहोत. संपर्कात असलेल्या सगळ्यापर्यंत हा निरोप पाठवून सहभागी व्हावे. आपला सहभाग / मार्गदर्शन / सहकार्य हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावेल अशी खात्री आहे.

उद्देश : कलाकृतीतून रोजगार निर्मिती आणि त्यातून आदिवासी समाजाचे स्वावलंबन मजबूत करण्यासाठी एक प्रयत्न.

ठिकाण : (बैठकीचे ठिकाण लवकरच कळवले जाईल),
        कासातालुका डहाणूजिल्हा पालघर
दिनांक : १ डिसेंबरशुक्रवार (सकाळी १० ते संध्याकाळी ५)
अपेक्षित सहभागी
१) आदिवासी कलाकार (चित्रकार, हस्तकलामुखवटे निर्मातेलाकडी आणि बांबू च्या वस्तूखेळणेशोभेच्या वस्तू तसेच इत्तर कलाकृती बनविणारे किंवा या विषयी आवड असलेले)
२) पारंपरिक ज्ञानसंस्कृती आणि बौद्धिक संपदा या बद्दल आवड असलेले
३) सदर विषयाला धरून सकारात्मक मार्गदर्शन/अनुभव सांगणारेनवीन शिकणायसाठी उत्सुक असलेले
चर्चेचे विषय:
कलाकारांना सध्याची आव्हाने/अडचणी/कमतरता त्यांचे मूळ आणि यावर उपाय योजना (तात्पुरता आणि कायमस्वरूपी)
एकत्रीकरणाची गरजपद्धतीउपक्रम कसे असावेत आणि त्यात कलाकारांची भूमिका
आर्थिक स्वावलंबनासाठी पर्यायी व्यवस्थासंधीत्यासाठी लागणारी तयारी
बौद्धिक संपदा कायदाशहरात परस्पर बिगर आदिवासींकडून होणारा आदिवासी कलांचा व्यवसाय आणि त्यावर उपाय
अपेक्षपार्ह (कपडेअस्वच्छ भिंती इत्यादी वर आदिवासी देवतांची) केले जाणारे चित्रीकरण यावर आपली भूमिका
नेदरलँड येथील कंपनीने नोंदविलेले वारली डिझाईन चे ट्रेडमार्क आणि त्या संबधी आयुश चा बौद्धिक संपदा कायदा अंतर्गत कायदेशीर लढा
भविष्यात अशा प्रकारची येणारी अशी दृश्य अदृश्य आव्हाने आणि त्यासाठी आपली तयारी
सहभाग घेण्यासाठी येथे नोंदणी करावी :  www.gtogether.adiyuva.in (आपल्या परिचयाचे कुणी येत असल्यास त्यांच्या वतीने फॉर्म भरावा)
सूचना -
ज्या कलाकारांना हँडीक्राफ्ट (हस्तशिल्प विकास आयुक्तालय) खात्याचे ओळखपत्र बनवायचे असल्यास २ पासपोर्ट फोटोआधार कार्डरेशन कार्डजातीचा दाखला आणि एक नमुना कलाकृती आणावीसदर कार्यालयात एकत्रित अर्ज सादर करण्यात येतील

आदिवासी समाज हिताचे उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी आपल्या सूचना आणि अभिप्रायांचे स्वागत आहे
आयुश । आदिवासी युवा शक्ती
www.adiyuva.in | ayush@adiyuva.in | 0 9246 361 249

Find us on Facebook