Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

AYUSH | Adikanya | Group of tribal girls


नमस्कार!
मी आलेय.... तुमच्या भेटीला..... जगाच्या नवीन प्रवाहात सर्व आदिवासी भगिनींना एकत्र आणायला, यशाची खुणावणारी नवीन शिखरे संगनमताने सर करायला, आणि सर्व आदिवासी भगिनींना एकत्र आणून प्रगत व जागृत असा आदिवासी समाज घडवायला! आदिवासी संस्कृती स्त्री प्रधान संस्कृती आहे असे म्हंटले जाते.

मी कुणी दैवी शक्ती नाही कि चुटकी सरशी प्रगत समाज घडवायला किंवा चमत्कारही नाही, मी तुमच्यासारखीच आहे, तुमच्यातलीच आहे, आणि तुमच्यासाठीच आहे . मी आहे एक आदिकन्या! सख्यांनो ,आपण समाजाचा एक मुख्य आणि अनिवार्य घटक आहोत, हे विसरू नका, मग आपण मागे कश्या ? ज्या समाजातील स्त्री साक्षर आणि जागृत असते तो समाज नेहमीच पुढारलेला असतो .कारण एक स्त्री एक कुटुंब घडवत असते, जर स्त्री सक्षम असेल तर सक्षम कुटुंब घडते अन पर्यायाने एक सक्षम समाज !

बहुतेक कवितांमध्ये अथवा कथा कादंबऱ्या मध्ये स्त्रीचे वर्णन एक नाजूक, डौलदार आणि मन मोहवणारी कलात्मक वस्तू असे केलेले असते. अशा कविता ऐकायलाही खूप सुखावह वाटतात. पण खरेच स्त्री नाजूक आहे? असह्य अशा प्रसूती वेदना सहन करून नवीन जीव निर्माण करणारी स्त्री नाजूक कशी ? प्रसंगी हत्तीचे बळ आणून संसार उभारणारी व समोर आलेल्या संकटालाही लाजवेल एवढे धैर्य एकवटून त्याचा सामना करणारी स्त्री नाजूक नाही किवा मन मोहवणारी कलात्मक वस्तू नाही तर ती समाज घडवणारी शिल्पकार आहे .

आदिवासी स्त्रिया मुळातच काटक, जिद्दी , आणि भरपूर मेहनती .मग उगीचच लाचार होवून कोपऱ्यात का खितपत पडताय? आज आपल्यातल्या कित्येक भगीणींजवळ काहीना काही कौशल्ये असतात ,पण अज्ञान व संसाराच्या रहाटगाड्यात ते तसेच लयाला जाते. तुमचे कौशल्य ओळखून त्यांना वाव देण्यासाठीच मी आलेय . आपल्यातले धावण्याचे कौशल्य ओळखून व जीवनाचा खडतर प्रवासाचा सामना करून ऑलिम्पिक मध्ये स्वताचे व समाजाचे नाव उंचावणारी कविता राउत किंवा आपल्या चित्रांना जहांगीर कालादालानापर्यंत नेऊन पोचवणारी व आदिवासी समाज जीवनाची ओळख जगाला करून देणारी चित्रगंधा वनगा-सुतार हि आपल्यातल्याच आहेत हे विसरू नका ! मग आपण मागे का राहावे? सख्यांनो ,आजच्या स्पर्धात्मक युगात फक्त प्राथमिक शिक्षण पुरेसे नाही, तर उच्च शिक्षणाची नितांन्त आवश्यकता आहे.उच्च शिक्षणाने यशाची नवी दालने तर उघड्तातच पण आपला आत्मविश्वासही उंचावतो ,आपल्यात एक नवीन धैर्य निर्माण होते.

शिका आणि शिकवा या उक्क्तीप्रमाणे आपण आपल्या सोबत समाजातील सर्व भगिनींना एकत्र आणून त्यांचे जीवनमान सुधारायचे आहे .हि आपली सामाजिक जबाबदारी आहे .शिक्षण आरोग्य ,संस्कृती ,पर्यावरण अशा काही प्रश्नांवर योग्य त्या चर्चेने उपाय योगून त्यावर अंमलबजावणी आहे.आपले शिक्षण व कौशल्य याचा उपयोग स्वताबरोबर समाजासाठी हि करून समाजाला नवी ओळख निर्माण करून द्यायची आहे . पण मी हे एकटीने नाही तर आपण सर्व भगिनींनी मिळून करायचे आहे .
मग येताय न सोबत.. नवीन व प्रगत आदिवासी समाज घडवायला !!....let us do it together !!!!

आम्ही आयुश’ च्या रुपानॆ हे कार्य करत आहोत. आयुश बद्द्ल थोडक्यात सांगायचे झालॆ तर
आयुश  म्हणजे आदिवासी तरुण एकत्र येऊन आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशा सोबतआपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या सामाजिक यशा साठी आणि सामाजिक जाणीव करून देण्याचे प्रयत्न करतो आहोत. आपल्या अखंड आदिवासी एकता टिकवून आपल्या समाजाचे ऋण परत करण्या साठीचा प्रामाणिक प्रयत्न.

आयुश च्या ह्या क्षितीजभरारीला तुमच्याही सहकार्याच्या पंखाचॆ बळ मिळावॆ अशी आम्ही आशा करतो  अन नक्कीच सर्वांच्या सोबतीनॆ समाजाला पुढॆ नेण्यास मोलाचॆ कार्य करु शकतो.मग देणार ना साथ?  

या समाजोपयोगी कार्यात सहभागी होण्या साठी येथे टिचकी मारा – www.in.adiyuva.in
आयुश | let us do it together” विषयी अधिक माहिती साठी येथे टिचकी मारा – www.do.adiyuva.in

Google Group : https://groups.google.com/forum/?fromgroups#!forum/adikanya
Author @ Google

Find us on Facebook