Showing posts with label discussions. Show all posts
Showing posts with label discussions. Show all posts
Adiyuva,
discussions
Tribal Entrepreneurship - S M Sarkunde, Comm. Tribal Development, Maharashtra
Tribal are existed in varies small ethnic groups since long despite it forms 9 percent population of India. Some are trailing for survival and some on the verge of extinct. Their weakness lies in their social exclusion due to geographical seclusion , distinct life style, poor food habits, special dialect, tradition and custom have made them different from the main stream of society. Till yesterday, they were dependent on miner forest produce, fishing, hunting and honey collection for their source of livelihood. To some extent they were engaged in shifting cultivation and used to harvest grain, cereals, pulses etc. Thus, today also they are subjected to subsistence economy. Their peaceful life style got interrupted by Aryan foreign culture ,advent of foreign invasion, introduction of numerous forest legislation like Indian Forest Act, 1927, The Protection of Wild Life Act, 1972, the Forest Conservation Act, 1980 and various land laws. These laws pre and post independent era brought limitation on their way of life, forced them to leave their place of habitation, given up their traditional livelihood pursuit, mutilated their cultural fabric and thus they came into contact with so called civilized society by taking recourse to savage deeds.. Their assimilation with main stream society made them not only dependent for their daily bread but also for cultural ethos. The nature lover tribal now compelled to embrace laballed religion like Hinduis, muslim, Buddhism, Christianity etc and thus they started to loose their cultural identity. The erstwhile nature worshiper tribal turned idol worshiper giving up worshiping totem. The free tribal life style turned into bonded labor in mine, on farm and now a days on construction site. Still their habitation remained in the lap of nature. However, for source of livelihood he became dependent on the land lord, mine mafia, builder, orchard owner etc. His seasonal cultivation for the period of three months of a year forced him to leave his hamlet for in search of daily bread keeping children and better half behind at home and toiled for months together to bring them up. Some time he moved along with children and wife leaving old parent behind at home completely at nobody's mercy. Thus he strives to keep body and soul together. This has endangered his life style. He felt short of assured nutritious food which he used to get from forest in the form of flesh by hunting, fishing, by collection of wild fruits and vegetables etc , resulted in his malnaurishment followed by death of his children. Still the tribal are subjected by this vicious circle. This resulted in high mortality rate of infant and mother . Tribal's children began to go to school due to introduction of elementary school education by Govt despite he faced inhibition with foreign medium of instruction. His dialect not being recognized as medium of instruction in the school made him handicapped from linguistic point of view. The schooling of the tribal children endangered owing to the seasonal migration of tribal parent for in search of livelihood. Forceful migration from hamlet made their life wretched and miserable subjected to various vagaries of malady due to lack of basic amenities. Thus his whole life rotated around the source of livelihood into perpetual uncertainty.
discussions
आदिवासी जीवनशैली आणि शिक्षणाचे महत्त्व -Raju Thokal.
आदिवासी जीवनशैली आणि शिक्षणाचे महत्त्व
“Adivasi is not only a word ; But it’s a culture, community, symbol of identity, hope, dream, reality, origin of being, wisdom, truth but yet invisible for the world……..and simply a lifestyle of tribals”.
-Raju Thokal.
‘आदिवासी‘ या नावावरून भारतात हा समाज फारपुरातन कालापासून राहणारा समाज आहे. डोंगरकुशीत राहिलेल्या या समाजाने इतरसमाजांच्या वाहत्या प्रवाहांपासून स्वतःला दूरच ठेवले. त्यामुळे आधुनिकविकास, साधनसामुग्री, यंत्रे, शिक्षण, आरोग्याच्या सोयी-सुविधा, यांच्याशीत्यांचा संपर्क बरीच वर्षे आलाच नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात काहींनीतो जाणीवपूर्वक येवू दिला नाही. तर काहींना आदिवासींचे हेदारिद्र्य….आदिवासीपण म्हणजे आपले भांडवल वाटत होते आणि आजही अपेक्षितअसा बदल याविचारसरणीत झालेला दिसत नाही. याला काही आदिवासी नेते, अधिकारी, विविध क्षेत्रात काम करत असणा-या व्यक्तीसुद्धा अपवाद नाहीत. आपले स्वताचेघर उभारण्यासाठी काहींनी अगदी उघड्या डोळ्यांनी हजारो आदिवासी समाजबांधवांची घरे बरबाद करण्याचे पातक केले. आपला भविष्यकाळ उज्ज्वलकरण्यासाठी काहींनी आदिवासींचा सुवर्णकाळ पायदळी तुडविण्याचे कामकेले…..आजही आपण डोळसपणे आदिवासी समाजाच्या सद्यस्थितीचा विचार केला तरआश्वासक असे चित्र आपण सापडणार नाही. सध्याच्या राजकीय, शैक्षणिकघडामोडींचा विचार केला तर हे चित्र न बदलण्यातच काहींचे हित सामावलेले दिसतआहे. एकंदरीत शासन, धर्मदायी संस्था व इतर समाजाकडूनही आदिवासी समाजदुर्लक्षितच राहिला आहे. तसे नसते तर मग शिवाजी महाराजांच्या गौरवशालीस्वराज्यामध्ये अनेक आदिवासी मावळ्यांचा इतिहास आज आपणास दिसलाअसता….भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये इंग्रजी हुकुमतीला शह देणा-या अनेकआद्य क्रांतिकारकांचा आज इतिहास आपण पुजला असता. परंतु लेखकांपासूनहीआदिवासी वंचितच राहिला. आदिवासींना जरी ‘अस्पृश्य‘ मानलेले नसले तरी पणसामाजिक प्रतिष्ठा मात्र त्यांना मिळालेली नाही.
अहमदनगर, पुणे, ठाणे, नागपूर, मुरबाड, मावळ, नाशिक, नंदुरबार अशा विविध भागातभटकंती करत असताना आदिवासी समाजाच्या जीवनशैलीचा मला अधिकच उलगडा होत गेला.शैक्षणिक कामानिमित्त फिरत असताना अनेक आदिवासी गावांमध्ये आदिवासीपालकांसोबत चर्चा करण्याची संधी मला अनेकदा मिळाली.आदिवासी गावांतीललोकांच्या राहणीमानाचा जवळून आस्वाद घेता आला. फणसासारखी बाहेरून काटेरीदिसणारी माणसे आतून किती गोड असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मी स्वतःजरी आदिवासी असलो, तरी शिक्षणासाठी कायम घरापासून, समाजापासून, गावापासूनदूर होतो. त्यामुळे आदिवासी संस्कृती, जीवनशैली, राहणीमान यांपासून मी काहीप्रमाणात वंचित राहिलो. आज माझ्या भटकंतीच्या छंदामुळे यासर्व बाबी पुन्हाजगण्याची संधी मला मिळाली. तसेच आदिवासी समाजाच्या अडचणी, आव्हाने या बाबीअभ्यासण्याची जाण माझ्या आदिवासी मनाला झाली.
अज्ञान, दारिद्र्य यांनी ग्रासलेल्या, आधुनिक प्रगतीच्या संपर्कापासून आजहीसर्वदूर असलेल्या या आदिवासी पाड्यांपर्यंत आज मेड इन चाईना मोबाईल मात्रमला दिसला. जेमतेम वरण भात, कंदमुळे, रानातली फळे, भाज्या यावर गुजराणकरणा-या असंख्य समाजबांधवांना आपल्या जीवनातील या उणिवांची जाणीवहीनसल्याचे चित्र मला दिसले. उलट आपण जंगलात राहतो याचा पुरेपूर अभिमानकाहींच्या चेह-यावर दिसला, तर काहींनी त्याबाबत खंत व्यक्त केली. परंतु५०-६० वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात खूप फरक पडलेला आहे असे काहीजाणकार व्यक्तींच्या मुखातून आशादायक शब्द बाहेर पडलेले मला ऐकायला मिळाले.
प्रत्येकाचाजीवन जगण्याचा आणि आपल्या सभोवतालची परिस्थिती अभ्यासण्याचा एक स्वतंत्रदृष्टीकोन असतो. माझ्या वैयक्तिक दृष्टीकोनातून जेव्हा मी आश्रमशाळांच्याभूमिकेचा आजपर्यंतचा अभ्यास करतो, तेव्हा ज्ञानाची दीपज्योत या आदिवासीसमाजापर्यंत पोहचविण्याचे पवित्रच नव्हे तर दैवी काम आश्रमशाळांनी केलेलेआहे. आश्रमशाळांच्या अस्तित्वामुळेच मी शिक्षणाच्या महासागरात आपलीज्ञानाची तहान भागविण्यासाठी उतरू शकलो…काही तरी जीवनाला आकार देवू शकलो.आदिवासी समाजातील व्यक्तींनाही लाजवेल अशी नैपुण्यपूर्ण कामगिरी आमच्यागुरुजनांनी केलेली आहे. याचे प्रत्यंतर या आदिवासी भागात गेल्याशिवाय आपणासयेत नाही.
प्राचीनकालापासून आदिवासींचे वास्तव्य असूनही आज स्वताची शेती वाचविण्यासाठीआदिवासींना सरकार दरबारी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यातही स्वताची शेतीअसणारे आदिवासी बांधव बोटावर मोजण्या इतकेच शिल्लक आहेत. ज्यांची जमीन आहे , त्यांचीही २-३ एकर डोंगरावर-खडकाळ माळरानावर. त्यामुळे यातून मिळणा-यातुटपुंज्या उत्पन्नाच्या मदतीने कुटुंब, मुलांचे शिक्षण, आरोग्य, राहणीमानयावर होणा-यासाठी खर्चासाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे प्रसंगीमजुरीसाठी इतरत्र स्थलांतर करावे लागते. त्यातही मजुरीसाठी जी कामे मिळतातती सारी प्रासंगिक असतात. त्यामुळे आदिवासींच्या जीवनाला आर्थिक स्थैर्यनाही.
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत आणि शिक्षण व वैद्यकीय सेवाह्या सुसंस्कृत समाजाच्या गरजा आहेत. या सर्व बाबतीत आदिवासींचा फक्तनिवा-याचा प्रश्न काही प्रमाणात सुटलेला आपणास दिसतो. फार वस्ती नसलेल्यादूरदूरच्या प्रदेशात या समाजाचे वास्तव्य असल्याने रानातून लाकडे, कारवी, झावळ्या, झाडाची पाने आणून मोकळ्या जमिनीवर झोपड्या उभारण्याचे कामस्वताच्या श्रमावरच आपले घर उभारण्याचे काम केले जाते. पण या कामात व्यस्तअसताना वर्षातील काही महिने उपासमार सहन करण्याची वेळ अनेक कुटुंबांवरयेते. स्त्रीचे अंग जुन्या पण फाटक्या लुगडयाने झाकलेले असते. गरीब घरातीलपुरुषांचीही तीच अवस्था असते. लहान मुले तर उघडी-नागडीच फिरत असतात. झोपडीतडोकावले तर एखादी जुनी वाकळ, बाज, पाण्याची व स्वयंपाकाची जेमतेम भांडीघडवंचीवर ठेवलेली…..एवढेच सामान. त्यात अजून भर असते ती गोधड्यांची.अलीकडे शिकलेल्या, शिक्षक, साहेब, कारकून, शिपाई म्हणून कुठेतरी ‘चाकरी‘ की ‘नोकरी‘ करणा-या लोकांच्या घरात स्टीलची भांडी, ब-यापैकी कपडे, टी.व्ही….., काहींचा गावातील एकमेव दुरून नजरेत भरणारा टुमदार बंगला वत्यासमोर चारचाकी, दोबचाकी वाहने दिसत आहेत. परंतु हे चित्र खूपच कमी आहे.आदिवासी समाजाला या शिक्षित वर्गाकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. परंतुखेदाची बाब म्हणजे या नोकरदार मंडळींनीसुद्धा आदिवासी सामाजाकडे पाठफिरविली आहे.
प्राचीन काळापासून आदिवासी समाजावर अनेक प्रकारचे अन्याय, अत्याचार करण्यात आले आणि आजही हे वेगवेगळ्या स्वरूपात सुरूच आहे. कधी धरणासाठी जमीन पाहिजे म्हणून तर कधी आपली जमीन वनविभागाच्या अंतर्गत येते असे म्हणून भूमिहीन करूनही अनेक अत्याचारांना आदिवासींना सामोरे जावे लागत आहे. शिक्षणाच्या अभावामुळे त्याविरुद्ध पाहिजे तसा कोणी आवाज उठविला नव्हता; परंतु सध्या कासा, तलासरी याभागात लोकांनी एकत्र येवून अशा प्रकारे अन्यायाविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. अन्यायाचे अनेक पाठ आपल्या समोर असतानाही सुशिक्षित आदिवासी हे सर्व आपल्या उघड्या डोळ्यांनी बघतो आणि गप्प बसतो हि सुद्धा खेदाची बाब नव्हे काय?
स्वच्छतेच्या बाबतीत आदिवासींची घरे किंवा झोपड्या शेणाने सारवलेली आपणास दिसतील. शहरी वातावरणापलीकडे कदाचित हे चित्र आज तरी डोळे मोठे करून पाहण्यासारखे आहे. त्यात जर आपण डहाणू परिसरात गेलात आणि एखाद्या घराच्या भिंतीवर वारली चित्रकला दिसली तर या समाजाचा जीवन जगण्याचा निव्वळ स्वच्छंदी नैसर्गिक दृष्टीकोन आपणास दिसेल. घराच्या समोरच मोठे प्रशस्त अंगण अन तेही शेणाने सारवलेले असते. कोठेही घाण दिसणार नाही. परंतु आरोग्याबाबत अज्ञान आणि अंधश्रद्धा दोन्हीही आड येतात. मुलांना खरुज असण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. अगदी शाळांमध्ये जाणा-या विद्यार्थ्यांमध्येही हे प्रमाण आपणास दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे सकस आहाराची उणीव होय. यावर उपाय म्हणून सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जातात. उदाहरणार्थ आदिवासी लोकसंख्या असणा-या भागात आश्रमशाळा स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या शाळांमध्ये शिक्षणाबरोबरच सकस आहाराची सोय करणे अपेक्षित असते. परंतु आज काळ बदलला, विज्ञानाने प्रगतीची पावले वेगाने धावायला लागली. या प्रमाणात आज ज्या सोयी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे त्या आपणास दिसत नाहीत. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून विविध बाबींवर प्रकाश टाकणारे वृत्त नियमित प्रसिद्ध होत असते. त्यातून यातील भयानकता, विदारकता दिसून येते.
आदिवासी समाजात सर्व धार्मिक, सामाजिक, आनंदाच्या, दुखाच्या प्रसंगात दारूला फार महत्त्वाचे स्थान आहे. लग्न असो किंवा गावाचा उरूस असो, महत्त्वाच्या माणसांना दारू पाजणे, झिंगून नाचत राहणे या गोष्टी इतक्या सर्रास आहेत कि त्यामुळे समाजात व्यसनाधीनता फार वाढली आहे. आदिवासींना व्यसनमुक्त करणे हे अतिशय कठीण काम आहे. दारू न पिणारा पुरुष सापडणे फारच कठीण. पण काहीही असो मुला-बाळांचा त्यांना कधी विसर पडत नाही. त्यांना व्यसनांपासून दूर नेण्यासाठी जनजागृतीविषयक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविणे गरजेचे आहे.
आदिवासी लोकांना जंगलाचे भारी प्रेम आहे. अशी हि सदाफुलीसारखी सदैव हसणारी, फुलणारी आपली माणसं जवळून पाहिली कि अनेकदा मनात विचार येतो, ही गुणी माणसे अशीच का रानावनात कोमेजून जाणार ? त्यांच्या गुणांचा सुगंध बाहेरच्या जगाला कधीच नाही का जाणवणार? त्यांच्या गुणांची पारख, कदर जगाला कधीच नाही का करता येणार? आज या संगणकाच्या युगातही अज्ञानाचा अंधकार पसरलाय….ज्ञानाचा प्रकाश त्यांना केंव्हा दिसणार?
अज्ञानाच्या अंधकारात बुडालेले, मागासलेपणाच्या भोव-यात सापडलेल्या आदिवासी जनतेपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहोचविण्यासाठी आश्रमशाळांबरोबरच महाविद्यालये, तंत्रनिकेतने, व्यावसायिक शिक्षण संकुले, क्रीडा प्रबोधिनी, व्यायामशाळा, व्यावसाय मार्गदर्शन मंच, स्पर्धा परीक्षा केंद्रे आदि शैक्षणिक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे. यातूनच आदिवासींच्या उद्याच्या नवनिर्माणाचे भवितव्य घडेल. सक्तीचे व मोफत शिक्षण असूनही ‘झाडांची पाने गळावित तशी शाळेतून लेकरं टपाटपा गळत आहेत’ हे चित्र बदलण्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज आहे.
आजचा आदिवासी समाज असंतोषाच्या ज्वालामुखीवरच उभा आहे. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची आधुनिक बीजे लावणे अधिक महत्त्वाचे आहे. परंतु जागोजागी आधुनिक शिक्षणसम्राट किंवा शिक्षणमहर्षी यांची आलिशान, अत्याधुनिक साम्राज्ये निर्माण झाली आहेत. यात ब-याच मोठ्या प्रमाणात आजचा विद्यार्थी होरपळून जात निघत आहे. म्हणून इथे आजच्या शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शाळेत आदिवासींची मुले शिक्षण घेण्यासाठी येत असतील तर त्यांना शिक्षणाचा योग्य न्याय मिळवून देण्याचे काम शिक्षकाने करणे गरजेचे आहे.
आदिवासींमध्ये शैक्षणिक क्रांति हवी असेल तर आवश्यकता आहे शिक्षकांनी जबाबदारी स्वीकारण्याची. केवळ अभ्यासक्रम बदलून क्रांति येणार नाही किंवा मोफत शिक्षण देवूबाही क्रांति होणार नाही, तर शिक्षकांची फक्त हुशार मुलांकडून उत्तरे मिळवून, पान पळटी करून, धडा दुसरा करून, स्वताची समजूत काढण्याची वृत्ती बदलाने आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये असणारा नेतृत्वगुणांचा अभाव, वाढणारी बेशिस्त, गैरहजेरीचे वाढते प्रमाण, अभ्यासाकडे दुर्लक्ष्य करण्याची प्रवृत्ती, वक्तशीरपणाचा अभाव, अनैतीकपणाचा स्वीकार आणि नेमून दिलेले काम पूर्ण करण्याची वृत्ती यांची कारणे शोधून त्यांच्या उपायांवर लक्ष्य केंद्रित केल्यास खरोखर आपल्या शाळांचा दर्जा तर बदलेलच परंतु या ‘आदिवासी वादळा’मुळे भविष्यात समाजाचे होणारे नुकसान टळेल. याकार्यातून मिळणारे समाधानही आपणासच मिळेल. या समाधानासाठी आपणाकडून मला सहकार्याची अपेक्षा करतो.धन्यवाद !!!
राजू ठोकळ
शिवस्पंदन युवा
माझी संस्कृती….सह्यभ्रमंती !!!
Adikanya,
AYUSHonline,
discussions,
Tribals and tribal area
दहशतीखाली वावरतेय आदिवासी मुलांचे भविष्य ! - संचिता सातवी
दहशतीखाली वावरतेय आदिवासी मुलांचे भविष्य !
धिक्कार ! धिक्कार ! धिक्कार!
डहाणू आगर येथे घडलेली आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील सुरक्षारक्षकाने(….? कि भक्षक) त्याच वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थांना मारहाण व आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द उच्चारल्याबद्दल एक आदिवासी म्हणून या नीच कृत्याचा व हे कृत्य करणार्यांचा मी धिक्कार करते.
अरे समजतात काय हे स्वताला …? यांना रोजी रोटी आदिवासी विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यास दिली जाते ,पण इथे तर कुंपणच शेत खाण्याचे प्रकार घडताहेत ,कोल्ह्याला काकडीचे शेत राखायला द्यावे आणि त्याने ते फस्त करावे , असे प्रकार आज सर्रास आदिवासी आश्रम शाळांमध्ये घडतं आहेत .
येथील वसतिगृहात आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द दारू पिउन आलेल्या सुरक्षारक्षकाने उच्चारले आणि आदिवासी मुलांची समाजाबद्दलची अस्मिता जागृत झाली, या गोष्टीला विरोध करणाऱ्या विद्यार्थांना या सुरक्षारक्षकाने स्थानिक गुंडांना बोलावून मारहाण व शिवीगाळ केली, आज या वस्तीगृहातले विद्यार्थी प्रचंड दहशती खाली वावरत आहेत, त्या सुरक्षारक्षका विरुद्ध बोलण्यास एकही विद्यार्थी पुढे यायला तयार नाही. आणि इतके करूनही हे लोक उजळ माथ्याने फिरताहेत .
आवाज उठवणारे विद्यार्थी टार्गेट!
आज या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालेय कि ,शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या वसतिगृहात व आश्रम शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी केवळ असुरक्षितच नाहीत तर प्रचंड मोठ्या दहशतीखाली वावरत आहेत . मग काय आधीच अनेक समस्यांनी पिडीत असलेला व आपल्या कुटुंबापासून लांब राहत असलेला विद्यार्थी इतक्या प्रचंड दहशतीखाली असेल तर काय भविष्य घडवणार तो स्वतःचे व समाजाचे …? हा विषय खूपच गंभीर बनत चाललेला आहे ,कारण आश्रमशाळा वा वसतिगृहात चाललेल्या गैरप्रकारामुळे विद्यार्थांना मुळातच मुलभुत सुविधांसाठी झगडावे लागत आहे, हे कमी होते कि काय म्हणून आता विद्यार्थांना मारहाण व बलात्कारासारखे सारखे प्रकार घडताहेत ,याचा दुष्परिणाम विद्यार्थांच्या अभ्यासावर होवून त्यांची गुणवत्ता खालावत चाललेली आहे ,व विद्यार्थ्यांचे भविष्यच धोक्यात आले आहे . आणि याविरुध्द आवाज उठवणाऱ्या विद्यार्थांनाच निशाणा बनवले जात आहे . व यामुळे विद्यार्थांना मानसिक व शारीरिक त्रास होत असतो . आणि मुख्य म्हणजे याचा ना आपल्या तरुण पिढीला चीड येतेय, ना आदिवासी समाजातून किंबहुना वस्तीगृहातूनच मोठे होवून बाहेर पडलेल्या उच्चशिक्षित आदिवासींना ,न स्वतःला आदिवासींचे कैवारी समजणाऱ्या आदिवासी नेत्यांना ।! सर्व आपापले खिसे भरण्यात मग्न आहेत .
उदासीन उच्चशिक्षित आदिवासी तरुण पिढी!
आणि एरवी कोंबड्यालाही लाजवेल इतके नियमित facebookवर वा twitter वर गुड मोर्निंग बोलणारे माझे आदिवासी बंधू_ भगिनी आता कुठे गायब झाले,या प्रकरणाबद्दल ची post facebook वर टाकली गेली ,जेणेकरून आजच्या तरुण पिढीचा धगधगता राग comment च्या रूपाने दिसेल पण …। मी विसरलेच कि कोंबड्यांना केवळ गुड मोर्निंग बोलता येते. अरे मित्रांनो हे काय चालवलेय तुम्ही…? जिथे googleव facebook माध्यम बनवून आज तुमच्यातीलच काही तरुण समाज बदलाची भाषा करताहेत,आणि आपण कुठे केवळ गुड मोर्निग व नट नट्यांच्या फोटोला like करत बसताहेत,अर्थात हेही आहे कि मौजमस्तीसाठी गरजेचे ! पण समाजाबद्दल आपण एव्हडे उदासीन कसे, कि ते वाचायलाही आपल्याजवळ वेळ नसतो . केवळ ४ ते ५ जण आपली मते comment व like करून मांडत असतात ,मग बाकीचे कुठे गेले ….?शेवटी social networking site वर दिल्या जाणार्या comment आणि like म्हणजेच आपल्या विचारांचा व दृष्टिकोनाचा आरसा असतो हे विसरून चालणार नाही . आपण तलवार घेवून युध्द करायला नाय जावू शकत तर निदान जखमींना मलम तर लावू शकतो न …?केवळ या online माध्यमातून आपले विचार तर मांडू शकतो ,कि आपला सामाजाबद्दलचा स्वाभिमानच हरवला आहे ….?
केवळ आगरचीच घटना नाही तर अलीकडेच घडलेली धुंदलवाडी येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणाची घटना असो, या न अशा अनेक गुन्ह्यांचे ठिकाण आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहे बनत चाललेली आहेत आणि हे नीच कृत्य करण्यात त्या त्या आश्रमशाळेतील अधीक्षक व सुरक्षारक्षकाचे हात बरबटले आहेत . .
नेत्यांना
आपल्या सभेत तारपा नाचवण्या पुरतेच आदिवासी
आठवतात …?
आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे ऐकूनही आपल्या तरुणाईचे रक्त खवळत नाही .त्यांच्या मनात या असल्या नीच लोकांबद्दल चीड निर्माण होत नाही कारण आमचे रक्तच थंड पडलेय ।अगदि बर्फासारखे थंड ! कि असे तर नाही नाही न कि आपण स्वतःला आदिवासी समजणेच सोडून दिलेय !
एका आश्रम शाळेला भेट दिली , तेथील मुलींच्या सौचालाय /बाथरुमला दरवाजेच नाहीत ,सताड उघडी बाथरूम ! सदर अधीक्षकाला जाब विचारला असता त्या "महान" व्यक्तीचे उत्तर आले,"आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनी लहान आहेत (७ वी,ते ११वी) म्हणून त्यांना कशाला दरवाजे हवेत …?"
धिक्कार असो अशा मानासिकतेचा !. १०वी,११वी च्या विद्यार्थिनी लहान…? आणि लहान असल्या म्हणून का त्यांनी उघड्यावर शौचास व अंघोळीला जावे …? मित्रांनो हे सर्व आपल्याच समाजाच्या बाबतीत घडते 'वर्षानु वर्षे उघड्यावर हगणाऱ्या आदिवासींना कशाला हवेत दरवाजा बंद बाथरूम …?' अशी त्या मागची नीच भावना या लोकांच्या मनात असते .
आज या अशा अनेक घटना आदिवासी विद्यार्थांचे हक्काचे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत व वसतिगृहात घडत आहेत,आहेत ,परंतु त्याविरुद्ध कोणता आदिवासी नेता आवाज उठवताना व संसदेत हा विषय ठोसपणे मांडताना दिसत आहे …? कि केवळ दुसर्यांच्या हातातले बाहुले बनून राहणाऱ्या या नेत्यांना आपल्या सभेत तारपा नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात …? एरवी बेगडी पाठींबा दाखवून आदिवासीच्या सेवेच्या आणाभाका घेणारे नेते अशावेळेस कापुराच्या वडीसारखे कुठे उडून जातात …?
आयात केलेले बिगर आदिवासी, कर्मचारी मोठे संकट !
विद्यार्थांचे पालकही या बाबतीत उदासीन दिसतात ,पालकांनी मिळून जर आवाज उठवला तर पुन्हा असली हिम्मत कुणी करायला शंभरदा विचार करेल .परन्तु गरिबीने ग्रासलेले व संसाराच्या रहाटगाड्यात अडकलेले पालक आपल्या पाल्यांच्या या समस्यांविरुद्ध आवाज उठवताना दिसत नाहीत ,कुणी पालकांनी आवाज उठवलाच तर तो बड्या प्रवृत्तींकडून दाबला जातोय .
आणखी एका मुद्द्याकडे मला सर्वांचे लक्ष वेधून घ्यावेसे वाटतेय कि ,आज बहुतेक आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षक म्हणा अधीक्षक किंवा सुरक्षारक्षक वा इतर कर्मचारी हे स्थानिक आदिवासी नसून देशावरून आलेले बिगर आदिवासी असतात ,या लोकांना न आदिवासी समाजाबद्दल आपुलकी असते ना अस्मिता (काही अपवाद वगळता)केवळ अर्थार्जनासाठी नोकरी करायची म्हणून करत असतात . जर स्थानिक आदिवासींची निवड या ठिकाणी झाली तर नक्कीच हे प्रकार बदलू शकतात . निदान तशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही
काही "अभ्यासू"(…?) लोकांनी आम्हालाही प्रश्न विचारलेत कि ''तुम्ही काय करता या असल्या प्रश्नांवर… ? ,काहींनी तर निर्णयच दिला कि 'तुम्ही काहीच करताना दिसत नाहीत' .अशा अभ्यासू मंडळींना मी सांगू इच्छिते कि केवळ इतरांना "तुम्ही काय केले ""असे विचारण्यापेक्षा " आपण सोबत मिळून करूया 'असे म्हणा ; मित्रांनो हा समाज आपला आहे, मग कुणी एक व्यक्ती किंवा संघटना एकटीने लढून चालत नाही. त्यासाठी एकजूट होणे गरजेचे आहे . कारण एकटा आवाज दाबला जातोय पण तोच आवाज जेव्हा पूर्ण समाजाकडून उठवला जाईल , तेव्हा तो एल्गार असेल .,
मित्रांनो हा लेख त्या तमाम आदिवासी तरुणांना जागे करण्यास आहे जे समाजात होणारे अन्याय बघूनही शांत आहेत .ज्यांची बोटे केवळ नट नट्यांच्या फोटोला like करण्यात मग्न असतात . आपण या समाजाचे भविष्य आहोत. पण इतके उदासीन भविष्य काय कुणाचा उद्धार करणार …?
उपाय
या घटनाच्या निमित्ताने आपण तरुण पिढी एकत्र येवून पुढील गोष्टी तर नक्कीच करू शकतो .
१) पालक ,आजी व माजी विद्यार्थी यांची एक समिती स्थापन करून एक दबाव गट बनविणे ,जेणेकरून असे प्रकार घडल्यास आपला दबाव गट प्रशासन व आपले नेते दोघांवरही दबाव आणून या असल्या प्रकरणाचा छडा लावण्यास व दोषींना योग्य ती शिक्षा देण्यास आपण त्यांना भाग पाडू शकतो .
२ ) याशिवाय सर्व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा एक गट बनवून ते आपल्या पाल्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देवू शकतात ,शेवटी एकीचे बळच कामी येते .
३ ) आश्रमशाळेतील व आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द बोलण्यास पुढे आणायला हवे ,याशाठी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना अभय देणे गरजेचे आहे .
४ ) पालक व विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून अन्याय झाला तर त्याबद्दल दाद कशी मागावी ,कुठे तक्रार करावी हे सर्व मुद्दे त्यांना पटवून देवून त्याची माहिती त्यांना देणे आवश्यक आहे .
यासाठी सर्वांनी एकत्र लढा देणे गरजेचे आहे शेवटी आजचे विद्यार्थी हे उद्या समाजाचे भविष्य ठरतील .
लक्षात घ्या ,आता शांत बसले तर छत्तीसगड व झारखंड च्या आदिवासिंसारखी (लाखो आदिवासींची गावेच्या गावे पेटवून देणे ,त्यांना त्यांच्या जमिनीवरून हुसकावणे ,आदिवासी स्त्रियांवर बलात्कार ,नक्षलवादी सांगून आदिवासींवर गोळीबार ,खून आणि प्रचंड प्रमाणात आदिवासींची पिळवणूक ) आपली गत व्ह्यायला वेळ नाही लागणार, किंबहुना ही त्याच पर्वाची सुरवात मानायला हरकत नाही.
संचिता सातवी, आदिवासी युवा शक्ती
Online Photo : https://plus.google.com/photos/103801329114961339077/albums/5936457438279297025
Subscribe to:
Posts (Atom)