Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

आदिवासी माणसांची बाजू भक्कमपणे मांडणारे आत्ता समोर आणावे लागणार आहेत - विजयकुमार घोटे



पृथ्वीवरील महान संस्कृती म्हणून आदिवासी संस्कृतीकडे पाहिले जाते ,वेळोवेळी झालेल्या परकीय आक्रमणाने आणि तयार झालेल्या जुलमी परिस्थिती विरोधात सर्वात प्रथम आदिवासी माणसाने बंड केला आणि भारत भूमीच्या रक्षणासाठी नेहमीच सिंहाचा वाटा उचलला .इतिहासाची पाने लिहिणार्यांनी जर अभ्यासपूर्वक इतिहास लिहिला असता तर आज इतिहासातील ”हिरो” हा आदिवासी माणूस असता मात्र आदिवासी वीरांना नेहमी इतिहासात दुयम स्थानी ठेवले पण त्यांच्या लक्षात हे नाही आले कि ,कोंबड झाकून ठेवल म्हणजे सूर्य उगवायचा राहत नाही परकीयांच्या विरोधात “उलगुलान” पुकारणार्या आदिवासी माणसाला मात्र आज आमच्या स्वार्थी राजकारणी लोकांनी पूर्ण गुलाम करून ठेवलाय कुणी “वनवासी” म्हणतंयतर कुणी आदिवासींमध्ये समावेश करा म्ह्णून बोंबा मारतय
आज आदिवासी समाजा समोर मोठ भयानक संकट उभं राहिलंय ते “ घुसखोरी” आणि बोगस आदिवासी लोकांचे महाराष्ट्र सह देशात आदिवासींवर आणि त्यांच्या आरक्षणावर परकीय जातीचे आक्रमण होत असून या आक्रमणाला आमचे राजकीय नेते , पुढारी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत फक्त महाराष्ट्र राज्यापूरता विचार करायचा झाला तर महाराष्ट्र राज्यात असणारया ४७ आदिवासी जमातीवर आत्ता मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे .निवडणुकीचा पंचवार्षिक हंगाम जवळ येताच आरक्षणाची आणि आदिवासींमध्ये समावेशाची मागणी करणार्या बेडकांची डराव डराव सुरु झाली आहे लोकसभा निवडणूक सुरु होण्याच्या आधीपासून सुरु झालेला आरक्षण आणि आदिवासींमध्ये समावेश हा सामाजिक मुद्दा अधिक भडकत जात आहे “ वंजारी समाजाचा आदिवासीमध्ये समावेश करा “ “धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करा “ “ कोळी समाजाला आदिवासींमध्ये घ्या “ अस्या बातम्या झळकायला सुरुवात झाली आहे , मोर्चे आंदोलने होत आहेत ,आरक्षण आणि आदिवासींमध्ये समावेश हा संघर्ष वाढत असला तरी हि सर्व तयारी म्हणजे “” मिशन २०१४ “ ची जोरदार तयारी आहे हे आज कुणाच्या लक्षात येत नाही फक्त याला सामाजिक मुद्दा म्हणून आग दिली जात आहे ...! आदिवासींमध्ये समावेश करावा म्हणून कुणी मा . शरद पवार यांचेकडे जातात तर कुणी अजित पवार यांचे पाय धरताना दिसत आहेत .आणि महाराट्रातील आमचे लोकप्रतिनिधी कोणतेही ठोस पाउले उचलताना दिसत नाही किव्हा या संघर्षात प्रत्यक्षात सहभागी न होता “ तुम लढो हम कपडे सांभालते है” या पद्धतीत वागत आहेत .
महाराष्ट्रात एकूण २५ आमदार हे आदिवासी असले तरी त्यांची आदिवासी हि ओळख फक्त आरक्षण आणि निवडणूक एव्हढीच आहे सर्वच्या सर्व २५ आमदार पाळलेले कुत्रे आहेत , कुणी राष्ट्रवादीचा कुत्रा आहे ,कुणाला कॉंग्रेस ने पाळलाय , कुणी भाजपा ची राखणदारी करतोय , कुणी शिवसेनेचे उकिरडे उकरतोय , कुणी अपक्ष होऊन नेत्यांचे पाय चाटतोय .महाराष्ट्रात सर्वात जेष्ठ आदिवासी नेते म्हणून मा. मधुकरराव पिचड यांची ओळख आहे तर राजेंद्र गावित , वसंत पुरके ,पद्माकर वळ्वी, यांनाही मंत्रिपद आहे आणि सर्वच्या सर्व २५ आमदार आदिवासी मतदार संघातून निवडून आले आहेत म्हणजे यांच्या पाठीशी प्रत्येकी ५/१० हजार कार्यकर्ते आपापल्या मतदार संघातून असायलाच पाहिजे मात्र परिस्थिती उलट आहे फक्त आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड सोडले तर बाकीच्या आमदारांना चा “ स “ देखील समजत नाही आणि कोणत्याही आमदाराच्या मागे जनता नाही हे पण हे पण महत्वाच आहे . धनगर समाजाला आदिवासींमध्ये घेण्याचे अश्वासन हे सर्वात पाहिल्यादा शरद पवार यांनी दिले होते ,आणि लगेचच अजित पवार यांनीही या मागणीला हवा दिली होती तेव्हापासून धनगर समाज्यातील नेत्यांचे पाउले नेहमीच बारामतीच्या दिशेने पडत राहिली आणि बाराम्तीमाधुनच अस्वास्नाचा प्रसाद पण मिळत राहिला आणी त्याच पक्षातले जेष्ठ नेते मधुकर पिचड या सर्वांच्या विरोधात राहिले म्हणजे एकाने आश्वासन द्यांचे आणि दुसर्याने विरोध करायचा म्हणजे आग त्यांनीच लावली आणि विझवायला पण त्यांचेच नेते नाशिक मध्ये राजीनाम्याची भाषा करणारे पिचड नागपूरमध्ये म्हणतात कि मी राजीनामा दिला तर हि लढाई मला लढता येणार नाही ,या पुढारी मंडळींची डबल ढोलकी नेहमीची आहे . आदिवासी समाजाचे जर २५ आमदार आहेत तर प्रत्येक मेळाव्यात , सभेत , ५/६ सोंगेच नाचताना दिसतात . घुसखोरी आणि आरक्षण हा भयंकर सामाजिक मुद्दा आहे आणि सर्वसामान्य जनतेने एकत्र येण्या आधी आपल्या २५ आमदारांनी एकत्र यायला हवे होते आणि प्रत्येकाला जर वाटते कि मी आदिवासी आहे आणि माझ्या मागे आदिवासी माणूस आहे तर यांनी प्रत्येकी ५००० कार्यकते आपापल्या मतदार संघातून जरी एकत्र आनले असते तरी हा मोर्च्या राज्यातील एक ऐतिहासिक मोर्चा झाला असता मात्र यांच्या पाठीशी खरोखर कुणी नाही असते तर पुणे येथे २४ जुलै रोजी झालेल्या पुण्यातील मोर्च्या साठी आश्रम शाळेतील मुलाना गाड्या भरून नेण्याची वेळ आली नसती मात्र निवडून आलेले आमचे नेते आमदार यांनी त्यांच्या चडीच्या नाड्या हाय कमांड , साहेब , दादा यांच्या हातात देवून पूर्ण आदिवासी समाज त्यांचा गुलाम करून ठेवला . खरे तर या आंदोलनाची सुरुवात शरद पवार यांच्या पुतळा दह्नाने व्हायला हवी होती कारण त्यांनीच धनगर समाजाला आदिवासी मध्ये घेण्याचे आश्वासन दिले होते पण या राजकीय लोकांनी थेट धनगर विरुद्ध आदिवासी असा संघर्ष पेटवून दिला . आज धनगर आणि आदिवासी मतांवर डोळा ठेवून शिवसेनेनेही धनगर समाजाला पाठींबा दिल्याने अजूनच नवीन भडका उडाला पण आमचे काही आमदार शिवसेनेतही आहेत त्यांनी तोंडातून ब्र देखील काढला नाही .एक आमदार फुटला तरी सरकार पडते मात्र आमच्या २५ आमदारांनी कधीही आदिवासी मुख्यमंत्री का नको असा विचार केला नाही .२५पैकी १८ आमदारांशी मी फोन करून बोललो ,त्यांनी त्यांच्या कार्यकालात आदिवासींच्या कोणत्या सामाजिक विषयावर काम केले हा माझा पहिला प्रश्न होता तर त्याचे उत्तर त्यांच्याकडे नाही आणि राज्यघटनेतील कलम ३४२ बद्दल माहिती आहे हा तर तेही माहित नाही , खरे तर कुणाला आदिवासी जमातीत घ्यायचे याचा निर्णय राज्यपाल , राष्ट्रपती , संसद , घेते मात्र आमचे राजकीय नेते दर पाच वर्षांनी अस्वास्नाची अशी काही आग लावतात कि सर्व समाज संघर्षात जळतो . आताही तोच प्रकार घडलाय सर्व आदिवासी आमदाराना माहित आहे कि आपण कोणत्याही आदिवासी प्रश्नावर आवाज उठवला नव्हता आणि आपल्याच मतदार संघात किती मतदार आपल्या पाठीशी आहेत आणि प्रसिद्धीत येण्यासाठी काही मार्ग दिसेना मग मग काय धनगर , कोळी , वंजारी आणि आदिवासी असा संघर्ष पेटवून निवडणुकीची जय्यत तयारी सुरु करून टाकली ....! आदिवासी मध्ये समावेश हा मुद्दा नवीन नाही या आधीच उच्च न्यायालय , सर्वोचं न्यायालय , राष्ट्रपती , आणि संसद यांचेकडे शेकडो प्रकरने गेल्या ३५/४० वर्षापासून धूळ खात पडली आहेत मात्र अध्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही . समजा जर हाय कोर्ट , सुप्रीम कोर्ट , संसद , राष्ट्रपती , जर या मागण्या मान्य करत नाही तर आदिवासी समावेश करण्याची मागणी करणार्याना आश्वासन देणारे “ उपटसुंभे” मोठे आहेत का ..!
आरक्षण आणि आदिवासी मध्ये समावेश या गोष्टी आणि त्यांची प्रकरणे जशीच्या तसी धूळ खात पडून आहेत मात्र या वेळी राज्यातील सत्ताधारी मंडळींच्या तोंडचे पाणी पळल्याने हा भडका उडालाय ...! आंदोलने पेटवण्यासाठी खास” रसद “ पुरवली जातीय लोकांच्या सामाजिक भावना भडकावून सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय ...! आपलेच राजकीय सुपारीबहादर सुपारी घेऊन सामाजिक संघर्ष भडकवत आहेत ...! आज कुणाला अनुसूचित जमातीत घ्यायचे ते पूर्णपणे संसदेच्या आधीन आहे , मात्र सर्वच राज्यघटना , राज्यपाल , राष्ट्रपती , आणि संसद यांचा अवमान करत आहेत धनगर समाजाच्या नेत्यांना दाणागोटा पुरवून आणि आदिवासी समाजाला त्यांच्या विरोधात उत्रावून सर्वपक्षीय “ सेफ गेम “ खेळण्याची जय्यत तयारी सुरु आहे मात्र त्यात भरडला जातोय तो सर्वसामान्य माणूस . कोणताही आदिवासी आमदार आज पूर्णपणे बोगस आणि घुसखोरांच्या विरोधात उभे राहताना दिसत नाही जे दिसत आहे त्यांचेही वरवरचे आदिवासी प्रेम आमच्या लक्षात येत आहे .... बोगस आणि घुसखोराना हाटवण्या आगोदर आमच्यातील आमचे घुसखोर आधी हाटवावे लागणार आहेत आणि आदिवासी माणसांची बाजू भक्कमपणे मांडणारे आत्ता समोर आणावे लागणार आहेत .
दुसरे लोक आदिवासींमध्ये येवू पाहत आहेत .. आरक्षण हिस्कौ पाहत आहेत ... पण आमचे नेते गप्प पडून तमाशा पाहत आहेत म्हणजे आमचेच नाही धड , आणि जगाशी लढ ,अशी परिस्थिती तयार होत आहे .
विजयकुमार घोटे
९६२३७०१७०९

Find us on Facebook