Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

"Dhikkar" - Book by Sampat Thanakar

धिक्कार.......आदिवासी मने पायदळी तुडविणारांचा धिक्कार....परकीय शक्तींचा धिक्कार
____________________________________________________

आदिवासी संस्कृतीवर होणा-या अन्यायाला वाचा फोडणारे श्री संपत ठाणकर यांच्या 'धिक्कार' या पुस्तकाविषयी थोडक्यात.....

-------------------------------------------------------------------------
धर्म शब्दाच्या अनेक व्याख्या आहेत. त्यातील अत्यंत सोपी व्याख्या मी आपणास सांगतो,
‘’धारण करण्याचा मार्ग म्हणजे धर्म होय.’’
इथे संस्कृती धारण करण्याचा अर्थ अभिप्रेत आहे.
जगात आज विविध धर्म आपापल्या तत्त्वांनुसार अस्तित्वात आहेत. यात हिंदू, मुसलमान, बौध्द, ख्रिश्चन आदी धर्म आपापले विचार व्यक्त करत आहेत. सर्व धर्मांची नावे वेगवेगळी असली....किंवा या धर्मांचे प्रेषित वेगवेगळे असले तरी मानवाचे कल्याण साधण्याचा विचार सर्वांमधून मांडला जातो. परंतु आज धर्माच्या नावाखाली काही तथाकथित धर्मगुरु आपली पोळी भाजत असल्याचे चित्र आपणास पाहावयास मिळत आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्येचा असणारा हा धर्म आज आदिवासींच्या मुळावर उठला आहे.....दिव्याखाली अंधार वाढत आहे.......आणि त्याचा सर्वाधिक तोटा आदिवासी समाजाला बसत आहे. आदिवासी माणूस हा स्वताचा निसर्ग धर्म जपण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. परंतु हिंदू धर्मीय लोकांशी अधिक जवळीक आल्याने कायद्याच्या चौकडीत अनपेक्षितपणे हिंदू नावाच्या लेबलखाली आदिवासींचा समावेश करण्यात आला. परंतु असो....आजही आदिवासी हि स्वतंत्र ओळख सिध्द करण्यासाठी आदिवासींची महान संस्कृती जपली जात आहे.
परंतु अलीकडच्या काही वर्षात तलासरी, डहाणू या भागात ख्रिस्ती मिशन-यांनी आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेवून त्या भागात आपले ख्रिस्ती धर्म प्रसाराचे कार्य सुरु केले. येशु ख्रिस्त यांनी खरच समाजाला अतिशय चांगला मार्ग या धर्मातून सांगितला आहे. परंतु या भागात धर्मगुरू म्हणून काम करणा-या थोतांड लोकांनी बायबलचे विचार गुंडाळून ठेवून आपले विकृत विचार आदिवासी लोकांमध्ये पेरायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात शिक्षण, दवाखाने आदींच्या माध्यमातून सुरु झालेले कार्य नंतर चर्चच्या माध्यमातून अधिक विस्तारले. एवढेच नाही तर भारत सरकार कडून आलेल्या निधीवर चालणा-या ख्रिस्ती मिशनरीन्च्या या भागातील शाळा चक्क फक्त ख्रिस्ती धर्म प्रसाराचे काम करत आहेत....नव्हे नव्हे आदिवासी समाजाच्या अस्तित्वावर खूप मोठा घाला घालत आहेत.
तलासरी, डहाणू भागातील आदिवासींची सारी दैवते नासविण्याचे काम अतिशय नियोजनबध्द केले जात आहे. आदिवासी विचारांमध्ये परकीय विचारांचे विष कालवले जात आहे. धर्मगुरूंची घरे दारूचे अड्डे बनत आहेत. यातून आदिवासी माणूस वेगळ्या वळणाला जात आहे. चुकीच्या प्रबोधनाच्या सहाय्याने आदिवासी स्त्रियांना नासवले जात आहे. आदिवासींना चर्चमध्ये बोलावून आळशी, उद्धट, रागीट बनविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आदिवासी धर्माची पायमल्ली करून येथील आदिवासींचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचे कटकारस्थान आपल्या लेखणीतून स्पष्ट आणि परखडपणे मांडण्याचे काम संपत ठाणकर यांनी आपल्या ‘धिक्कार’ पुस्तकातून केले आहे.
पुस्तकातील अनेक संदर्भ स्वतः लेखकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत...आदिवासी मनात चीड आणणारे असेच काही अनुभव यात त्यांनी मांडलेले आहेत. वसई येथील फादर आदिवासी तरुण, कोवळ्या मनाला मोहिनी घालून मुलींबरोबर लैंगिक संभोग करून कशा आदिवासी कळ्या आपल्या क्रूर हातांनी धर्माच्या नावाखाली कुस्कारत आहेत याचे वर्णन तर राग आणणारे असेच आहे. येथील स्थानिक ग्रामपन्चायत कशी या लोकांची गुलाम बनवून नागवली जात आहे याचे वास्तव चित्रण आदिवासी भविष्य किती विकृत असेल याचा धोका आपणास दाखविते.
आदिवासी समाजाचे लचके तोडणा-या या परकीय शक्तींविरोधात जर आपण आज आवाज उठविला नाही...तर उद्या या परकीय शक्ती नक्कीच आपल्या आदिवासीपणाला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून आपल्यामध्ये जागृतीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी वारली प्रकाशन, जीतगाव यांनी प्रकाशित केलेले संपत ठाणकर लिखित ‘धिक्कार’ हे पुस्तक नक्की वाचा. हे फक्त पुस्तक नसून या भावना आहेत. नक्कीच या आपल्या मनाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाहीत. या पुस्तकाच्या लेखनामुळे या आदिवासी लेखकाच्या जीवाला धोका निर्माण होवूनही त्यांनी पुढाकार घेवून न डगमगता हा विचार आपल्या पर्यंत पोहचविण्याचे महत्तम कार्य केले आहे. आपल्या वाचनाने लेखकाच्या कार्याला बळकटी मिळणार आहे.
पुस्तकाची किंमत ५० रुपये असून आपण सदर पुस्तकाच्या खरेदीसाठी लेखक श्री संपत देवजी ठाणकर, मु.जीतगाव, पो.दापचरी, ता. डहाणू, जि.ठाणे, पिन-४०१६१० या पत्त्यावर संपर्क साधून घेवू शकता.
या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी भाषेतील कठीण अलंकारिक शब्दप्रयोग टाळून आदिवासी वारली बोलीभाषेचा व सरळ साध्या मराठी भाषेचा वापर केला आहे. यातून आदिवासी समाजाच्या अन्यायाची दाद मागण्यासाठी नव्या दिशेने वाटचाल सुरु होत आहे....
संपत ठाणकर यांचे विचार फक्त पुस्तकात कैद राहावेत असे नक्कीच नाहीत....आदिवासी समाजाचे भले जोपासणारांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे....या विचारांच्या प्रसारातून आदिवासी मने जोडली जावून क्रांतीची मशाल आग बनून प्रज्ज्वलित झाली पाहिजे अशी अपेक्षा......!!!
आदिवासी समाजापुढे अस्तित्वाची लढाई!
ठाणे ग्रामीण परिसरात पारंपारीक आदिवासी संस्कृतिक ओळख पाश्चिमात्य शक्तींकडून नियोजितपणे मिटवली जात आहे
आदिवासी लेखक, अभ्यासक यांच्या लेखणीतून
धिक्कार
संस्कृती संकट ओळखण्या साठी जरूर वाचा !
लेखक :
संपत देवजी ठानकर
9975670275

Find us on Facebook