Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

Sign Petition for Swayatt Adivasi Jilha


Shared with you
Hello, I just signed this petition and wanted to ask for your support. The more people who join the campaign, the more likely it is to win. Will you help by adding your name?
Thanks,
AYUSHonline team










शू …आदिवासींनो शांत झोपा !

शू …आदिवासींनो शांत झोपा !
ठाणे जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात आदिवासी उपयोजनेतून बांधण्यात आलेल्या सूर्या धरण प्रकल्पाचे पाणी फक्त पूर्वीच्या जव्हार व आताचा विक्रमगड, डहाणू आणि पालघर या तालुक्यासाठी राखीव होते. परंतु शासनाने या धरणाचे पाणी आता वसई - विरार महानगरपालिका (185 mld) व मिरा - भांईदर महानगरपालिकेला (403mld) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या साठी 1325.77 कोटी मंजूर केले आहेत !
हा प्रकल्प तुझे घर, पाडा, गाव, गावदेव बुडवून बनवला पण तू ३० वर्षा पासून तहानलेला. येथून २किमी वर असलेले तुझे आदिवासी पाडे कोरडे !
आणि आता सुसरी, पिंजाळ तुमचे पाणी शहरात पळवणार !
निसर्गाचे जतन करायचे असेल तर ५वी अनुसूची आणि PESA नुसारT TSP चा “स्वायत्त आदिवासी जिल्हा” हाच एक उपाय
Swayatt Adivasi Jilha Kruti Samiti - Thane



Swayatt Adivasi Jilha Kruti Samiti - Thane

मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा पालघर, आम्हा आदिवासींसाठी फक्त पत्ता बदल… 
आदिवासींची जमीन, पाणी, संस्कृती, परंपरा, शिक्षण, रोजगार, व्यवसाय, अस्मिता जतन केली जायील का?
भारतीय संविधानाच्या ५ व्या अनुसूचीनुसार व Pesa Act १९९६ मधील तरतुदीनुसार ठाणे जिल्हा विभाजन होवून Tribal Sub Plan Area चे विभाजन न करता फक्त आदिवासी भागाचा असा 'स्वायत्त आदिवासी जिल्हा' झाला पाहिजे!

आदिवासी विकासाच्या पोकळ बढाया न मारता आदिवासींना विकासाची संधी उपलब्ध झाली पाहिजे. अन्यथा तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही !

Independent District of undivided TSP (Tribal Sub Plan) area on basis of 5th Schedule & PESA 1996 Act. Solution to Tribal Development
& preserve Nature, Resources
Independent TSP Area District
Thane District is largest Tribal Population in Maharashtra

Swayatt Adivasi Jilha Kruti Samiti - Thane
 


मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा पालघर, आम्हा आदिवासींसाठी फक्त पत्ता बदल…

मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा पालघर, आम्हा आदिवासींसाठी फक्त पत्ता बदल…
आदिवासींची जमीन, पाणी, संस्कृती, परंपरा, शिक्षण, रोजगार, व्यवसाय, अस्मिता जतन केली जायील का?
Letter from Secretory about Independent District on Basis of Fifth Schedule and PESA 1996

Lets spread awareness about Natural resources & Tribal Community.Swayatt Adivasi Jilha Kruti Samiti - Thane 



शांत आदिवासींना पेटवू नका!

शांत आदिवासींना पेटवू नका!

नाशिक - अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करून शांत असलेल्या आदिवासींना पेटवू नका, असा खणखणीत इशारा आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी आपल्याच आघाडी सरकारला दिला. विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनीही पिचडांच्या भूमिकेला पाठिंबा देत आरक्षण बदलण्याचा निर्णय घेऊन आघाडी सरकारने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये, असा आघाडी सरकारला आज घरचा आहेर दिला. खऱ्या आदिवासी जमातीमधील बिगरआदिवासी जातींची घुसखोरी थांबविण्यासाठी विविध पक्ष- संघटनांतर्फे आयोजित केलेल्या आदिवासींच्या निर्धार मेळाव्यात हे दोन्ही नेते आज बोलत होते. पिचड म्हणाले, की "एसटी‘मध्ये अन्य जातींचा समावेश करू नये यासाठी राज्यातील सर्व
आदिवासी आमदारांनी सनदशीर मार्गाने शासनाला निवेदने दिली आहेत. मात्र, आपल्या स्वाभिमानासाठी व आपल्या हक्कांसाठी सर्व आदिवासींनी जागरूक राहिले पाहिजे.

नव्याने होऊ घातलेला पालघर जिल्हा हा घटनेच्या सहाव्या सूचीनुसार स्वायत्त व्हायला हवा.
त्याबाबतचा निर्णय झाल्यानंतर या जिल्ह्यातील आदिवासीबहुल क्षेत्राच्या विकासासाठी मदत
मिळेल आणि पुढच्या पिढीला स्वाभिमानी करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. या समाजासाठी आज सर्व
आमदार व खासदार राजकारण सोडून एकत्र आले आहेत. वसंत पुरके म्हणाले, की आदिवासींच्या हक्कांवर होणारे अतिक्रमण पाहता आजची रात्रच नव्हे, तर दिवसही वैराचा आहे. ही वेळ सर्वांनी निश्चिंत बसायची नसून येत्या 22 जूनला नागपूर येथे होणाऱ्या निर्धार मेळाव्यात सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आम्ही आदिवासी जनतेच्या बाजूने उभे राहिलो म्हणून अनेकांनी आमचे पुतळे जाळले काय किंवा आम्हाला जाळले काय मात्र, आमच्या विचारांना ते कधीही जाळू शकत नाहीत. राज्य सरकारकडून "एसटी‘मध्ये घुसखोरी करणाऱ्यांना आश्वासने दिली गेली असल्याचे समजते. मात्र, नियमानुसार तसा बदल होणे शक्य नसल्याचे पुरके यांनी सांगितले.



आदिवासी बांधव आपणास धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही !

धनगर समाजाचा विकास होवू नये असे एक आदिवासी म्हणून मी नक्कीच म्हणणार नाही. कोणताही आदिवासी इतका स्वार्थी विचार कधीच मांडणार नाही. परंतु आदिवासिंच्या ताटातिल काढून त्यांच्या ताटात टाकने म्हणजे आदिवासिंवर उघड उघड केलेला अन्याय आहे. धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र तरतुदी कराव्यात... त्यासाठी आदिवासिंच्या तोंडाला पाने पुसण्याचे क्रूर राजकारण खेळु नये....

अन्यथा तमाम आदिवासी बांधव आपणास धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही !



---------------------------------------------------

राजू गाईड

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार धनगर समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट करण्याचा विचार करत आहेत. राजकारणात सत्तेसाठी ते असा राजकीय डाव खेळत आहेत. ज्या आदिवासी समाजाने यांना आजपर्यन्त एकहाती सत्ता मिळविण्यात हातभार लावला, त्या आदिवासी समाजाच्या सोयी-सवलतींवर इतरांचा अतिरिक्त भार टाकू पाहत आहेत. 

धनगर समाजाचा विकास होवू नये असे एक आदिवासी म्हणून मी नक्कीच म्हणणार नाही. कोणताही आदिवासी इतका स्वार्थी विचार कधीच मांडणार नाही. परंतु आदिवासिंच्या ताटातिल काढून त्यांच्या ताटात टाकने म्हणजे आदिवासिंवर उघड उघड केलेला अन्याय आहे. धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र तरतुदी कराव्यात... त्यासाठी आदिवासिंच्या तोंडाला पाने पुसण्याचे क्रूर राजकारण खेळु नये....अन्यथा तमाम आदिवासी बांधव आपणास धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

पवारांना कदाचित आदिवासींचा क्रांतिकारी इतिहास माहीत नसावा. बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या मामा आदि आदिवासी विरांचे विचार आजही आमच्या रक्तात जिवंत आहेत. त्या रक्ताला आपण उगाच आपल्या स्वार्थी नितिमत्तेने पेटवू नका.....नाही तर उद्या रक्ताची होळी आम्ही खेळु शकतो हे आपणास उघड्या डोळ्यांनी बघावे लागेल.

आपल्या पराभवाची कारणे आपण स्वता अंतर्मुख होवून शोधावित. जर आपण प्रामाणिकपणे सामान्य जनतेची सेवा केली असेल तर त्याचे उत्तर नक्की सापडेल. एकीकडे देश प्रगतीच्या मार्गावर असताना आदिवासी समाजाची अवहेलना आपल्या कारकिर्दीत होत असेल तर यावेळेस आदिवासींना पर्यायी चिन्हाचा वापर करणे भाग पडेल.

खुर्चिसाठी आरक्षनाचे राजकारण आपणास सुचणे यासारखे दुसरे दुर्दैव आपल्या नशिबात काहीच नसेल. कारण येत्या निवडणुकित आदिवासी समाज बांधव याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहित.

आदिवासिंच्या विकासाची फार मोठी जबाबदारी आपणावर असताना आपण आपल्या सत्ताकालावधीत नक्की कोणाचा विकास साधला हां अगदी साधा प्रश्न एक आदिवासी म्हणून मला पडलेला आहे. विकासाचे गाजर दाखवून तुम्ही आपलेच खीसे ओतप्रोत भरले आणि बिच्चारा कष्टकरी आदिवासी आजही पाण्यासाठी वणवण करत अनवाणी फिरत आहे. विजेचे स्वप्न तर दिवास्वप्नच ठरले. उलट आमच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात आपण अपयशी ठरलात. आपण आपल्या कार्याचा मागोवा घ्यावा. उगाच सत्तेसाठी आदिवासी समाजाच्या मागे लागू नये.

आज आदिवासी जागृत झाला आहे. काय वाईट आणि काय चांगले याची जाण आली आहे. त्यामुळे गैरसमजुतीचे राजकारण आपण खेळुन आदिवासिंची फसवणुक करू नये.

एक तीर...एक कमान
सर्व आदिवासी एक समान 



---------------------------------------------------


प्रती 
मा.शरद पवार साहेब
सप्रेम जय बिरसा .

आम्ही असे ऐकतो कि आपण धनगर समाजाला आदिवासीमध्ये घालण्याचा खटाटोप
करत आहात.आदिवसी आणि धनगर हे मूलतः वेगेवगळे समाज समुह आहेत हे तुमच्यासारख्या सुज्ञ व्यक्तीला सांगण्याची गरज नसावी. आदिवासी सुरवातीपासून
तुमच्या पाठीशी उभे राहत आले आहेत, तुम्ही त्यांच्या आता पाठीत खंजीर खुपसू नका

एक कोटी २३ लाख आदिवासी महाराष्ट्र आहेत.पुढे विधान सभेच्या निवडणूक आहेत 
्याचीआठवण ठेवा.लोकसभेत तुमची काय फसगत झाली हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे.आतापर्यंत आमचे शोषण सर्वानीच केल.आता मात्र आमची सहनशक्ती संपली आहे.कुण्याही जातील आदिवासीमध्ये घुसडण्याचा अव्यापारेषु व्यापार कुणीच करू नये. एवढी विनंती आम्हा या ठिकाणी करावीश वाटते. धन्यवाद.

आपला स्नेही
प्रा माधव सरकुंडे

Adivasi Lokavichar Manthan Mahasabha @Kasa, Taluka Dahanu


Facebook Event Page : https://www.facebook.com/events/870979926252356/ 


Lagin | Tribal matrimonial Service

# Adivasi Matrimonial Service

Marriages play significant role in any social system. In our tribal society one of the most important challenges is to maintain our traditional value & culture and pass on to the next generation. As the modern tribal generations have been moving out from the indigenous habitat and scattered to different parts of India as well as abroad. So, there was need to create a platform where the all prospective bride and groom could find the suitable life partner within the tribal society.

आया लगीन !

आज कालचे तरुणांना नोकरी, शिक्षणाच्या धावपळीत वैयक्तिक जीवनाकडे लक्ष देण्या साठी बऱ्याचदा वेळ मिळतोच असे नाही ....

शहरात राहणाऱ्या तसेच उच्च शिक्षित तरुणांच्या पालकांना पडलेले मोठे कोडे म्हणजे आपल्या पाल्यांना आपल्या समाजातील जीवन साथी शोधणे,

किवा काही आणखीन वेगळी करणे असतील, आपला समाज विखुरलेला असल्या मुळे आपण एक प्रयत्न करतो आहोत कि समाजातील तरुण पिढी संपर्कात आणु. त्यातून जर एकमेकांचे स्वभाव, आवड, निवड जुळली तर त्यांना जीवन साथी निवडणे सोप्पे जायील... हा असा आपला पहिला प्रयत्न आहे

भविष्यात आपण तरुण पिढीला एकत्र आणण्या साठी वेग वेगळे कार्यक्रम आयोजित करणार आहोत. तसेच आपल्या समजातील जीवनसाथी निवडण्या साठी आपण एक वेब साईट बनवणार आहोत, जर आर्थिक सहकार्य मिळाले तर लवकरात लवकर आपण सुरवात करू शकू 


Facebook page : https://www.facebook.com/pages/Lagin/719567474771615 



AYUSH Picnic | Gambhir gad, 4th May 2014

आयुश वनभोजन | AYUSH picnic cum get together!

Agenda : Tribal Empowerment, Traditional knowledge & cultural Intellectual, AYUSH activities (& Promoting Tribal Tourism | आदि पर्यटन)
Date : 4th may 2014, Sunday 
Time : 9.00 ~ 5.00 
Meeting Point : Uchal Dev (9 am)
Gambhir Gad, Kajal Barichi Khind. Taluka Dahanu. Dist Thane 

Submit Participation form atwww.picnic.adiyuva.in

FB Event Page : https://www.facebook.com/events/488242107969949/ 
Map : https://mapsengine.google.com/map/edit?mid=zZhuTvZBP95I.kIa91DMMj658


Contact : Sachin Satvi 09246 361 249, Vasant Bhasara 08087 546 675, Chetan Gurada 9869 197 376 Karan Pawar 9930 729 139, Sandip Sathe 9029196 354

Live Pages : https://www.facebook.com/media/set/?set=a.631766900210241.1073741841.122481367805466&type=1 




"Dhikkar" - Book by Sampat Thanakar

धिक्कार.......आदिवासी मने पायदळी तुडविणारांचा धिक्कार....परकीय शक्तींचा धिक्कार
____________________________________________________

आदिवासी संस्कृतीवर होणा-या अन्यायाला वाचा फोडणारे श्री संपत ठाणकर यांच्या 'धिक्कार' या पुस्तकाविषयी थोडक्यात.....

-------------------------------------------------------------------------
धर्म शब्दाच्या अनेक व्याख्या आहेत. त्यातील अत्यंत सोपी व्याख्या मी आपणास सांगतो,
‘’धारण करण्याचा मार्ग म्हणजे धर्म होय.’’
इथे संस्कृती धारण करण्याचा अर्थ अभिप्रेत आहे.
जगात आज विविध धर्म आपापल्या तत्त्वांनुसार अस्तित्वात आहेत. यात हिंदू, मुसलमान, बौध्द, ख्रिश्चन आदी धर्म आपापले विचार व्यक्त करत आहेत. सर्व धर्मांची नावे वेगवेगळी असली....किंवा या धर्मांचे प्रेषित वेगवेगळे असले तरी मानवाचे कल्याण साधण्याचा विचार सर्वांमधून मांडला जातो. परंतु आज धर्माच्या नावाखाली काही तथाकथित धर्मगुरु आपली पोळी भाजत असल्याचे चित्र आपणास पाहावयास मिळत आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्येचा असणारा हा धर्म आज आदिवासींच्या मुळावर उठला आहे.....दिव्याखाली अंधार वाढत आहे.......आणि त्याचा सर्वाधिक तोटा आदिवासी समाजाला बसत आहे. आदिवासी माणूस हा स्वताचा निसर्ग धर्म जपण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. परंतु हिंदू धर्मीय लोकांशी अधिक जवळीक आल्याने कायद्याच्या चौकडीत अनपेक्षितपणे हिंदू नावाच्या लेबलखाली आदिवासींचा समावेश करण्यात आला. परंतु असो....आजही आदिवासी हि स्वतंत्र ओळख सिध्द करण्यासाठी आदिवासींची महान संस्कृती जपली जात आहे.
परंतु अलीकडच्या काही वर्षात तलासरी, डहाणू या भागात ख्रिस्ती मिशन-यांनी आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेवून त्या भागात आपले ख्रिस्ती धर्म प्रसाराचे कार्य सुरु केले. येशु ख्रिस्त यांनी खरच समाजाला अतिशय चांगला मार्ग या धर्मातून सांगितला आहे. परंतु या भागात धर्मगुरू म्हणून काम करणा-या थोतांड लोकांनी बायबलचे विचार गुंडाळून ठेवून आपले विकृत विचार आदिवासी लोकांमध्ये पेरायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात शिक्षण, दवाखाने आदींच्या माध्यमातून सुरु झालेले कार्य नंतर चर्चच्या माध्यमातून अधिक विस्तारले. एवढेच नाही तर भारत सरकार कडून आलेल्या निधीवर चालणा-या ख्रिस्ती मिशनरीन्च्या या भागातील शाळा चक्क फक्त ख्रिस्ती धर्म प्रसाराचे काम करत आहेत....नव्हे नव्हे आदिवासी समाजाच्या अस्तित्वावर खूप मोठा घाला घालत आहेत.
तलासरी, डहाणू भागातील आदिवासींची सारी दैवते नासविण्याचे काम अतिशय नियोजनबध्द केले जात आहे. आदिवासी विचारांमध्ये परकीय विचारांचे विष कालवले जात आहे. धर्मगुरूंची घरे दारूचे अड्डे बनत आहेत. यातून आदिवासी माणूस वेगळ्या वळणाला जात आहे. चुकीच्या प्रबोधनाच्या सहाय्याने आदिवासी स्त्रियांना नासवले जात आहे. आदिवासींना चर्चमध्ये बोलावून आळशी, उद्धट, रागीट बनविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आदिवासी धर्माची पायमल्ली करून येथील आदिवासींचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचे कटकारस्थान आपल्या लेखणीतून स्पष्ट आणि परखडपणे मांडण्याचे काम संपत ठाणकर यांनी आपल्या ‘धिक्कार’ पुस्तकातून केले आहे.
पुस्तकातील अनेक संदर्भ स्वतः लेखकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत...आदिवासी मनात चीड आणणारे असेच काही अनुभव यात त्यांनी मांडलेले आहेत. वसई येथील फादर आदिवासी तरुण, कोवळ्या मनाला मोहिनी घालून मुलींबरोबर लैंगिक संभोग करून कशा आदिवासी कळ्या आपल्या क्रूर हातांनी धर्माच्या नावाखाली कुस्कारत आहेत याचे वर्णन तर राग आणणारे असेच आहे. येथील स्थानिक ग्रामपन्चायत कशी या लोकांची गुलाम बनवून नागवली जात आहे याचे वास्तव चित्रण आदिवासी भविष्य किती विकृत असेल याचा धोका आपणास दाखविते.
आदिवासी समाजाचे लचके तोडणा-या या परकीय शक्तींविरोधात जर आपण आज आवाज उठविला नाही...तर उद्या या परकीय शक्ती नक्कीच आपल्या आदिवासीपणाला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून आपल्यामध्ये जागृतीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी वारली प्रकाशन, जीतगाव यांनी प्रकाशित केलेले संपत ठाणकर लिखित ‘धिक्कार’ हे पुस्तक नक्की वाचा. हे फक्त पुस्तक नसून या भावना आहेत. नक्कीच या आपल्या मनाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाहीत. या पुस्तकाच्या लेखनामुळे या आदिवासी लेखकाच्या जीवाला धोका निर्माण होवूनही त्यांनी पुढाकार घेवून न डगमगता हा विचार आपल्या पर्यंत पोहचविण्याचे महत्तम कार्य केले आहे. आपल्या वाचनाने लेखकाच्या कार्याला बळकटी मिळणार आहे.
पुस्तकाची किंमत ५० रुपये असून आपण सदर पुस्तकाच्या खरेदीसाठी लेखक श्री संपत देवजी ठाणकर, मु.जीतगाव, पो.दापचरी, ता. डहाणू, जि.ठाणे, पिन-४०१६१० या पत्त्यावर संपर्क साधून घेवू शकता.
या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी भाषेतील कठीण अलंकारिक शब्दप्रयोग टाळून आदिवासी वारली बोलीभाषेचा व सरळ साध्या मराठी भाषेचा वापर केला आहे. यातून आदिवासी समाजाच्या अन्यायाची दाद मागण्यासाठी नव्या दिशेने वाटचाल सुरु होत आहे....
संपत ठाणकर यांचे विचार फक्त पुस्तकात कैद राहावेत असे नक्कीच नाहीत....आदिवासी समाजाचे भले जोपासणारांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे....या विचारांच्या प्रसारातून आदिवासी मने जोडली जावून क्रांतीची मशाल आग बनून प्रज्ज्वलित झाली पाहिजे अशी अपेक्षा......!!!
आदिवासी समाजापुढे अस्तित्वाची लढाई!
ठाणे ग्रामीण परिसरात पारंपारीक आदिवासी संस्कृतिक ओळख पाश्चिमात्य शक्तींकडून नियोजितपणे मिटवली जात आहे
आदिवासी लेखक, अभ्यासक यांच्या लेखणीतून
धिक्कार
संस्कृती संकट ओळखण्या साठी जरूर वाचा !
लेखक :
संपत देवजी ठानकर
9975670275

Tarpa Mahotsav 2013 @ Dahanu - Sanchita Satvi

तारपा नृत्य ,बोहाडा ,गौरी नृत्य ,ढोल तसेच डांगी नृत्य अशा विविध भागातील आदिवासी नृत्यांचा थरार!… वारली चित्रकलेने सजलेली दुकाने,आदिवासीच्या साध्या परंतु समाधानी स्वावलंबी राहणीमानाची साक्ष देणारी शेणामातीने सारवलेली झोपडी !तांदळाचे लाडू,पापड्या,सावेली,नाचणीची भाकरी तसेच कोहळ्याची भाजी यांचा सुटलेला घमघमाट! प्रचंड संख्येने उलटलेला जनसागर आणि या सर्व ऐतिहासिक क्षणाची साक्षठेवणारा डहाणूचा नयनरम्य समुद्र किनारा!
                    हे दृश्य होते डहाणू बीच ,पारनाका येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय (दि . २१डिसें २०१३ ते २३ डिसें  २०१३ ) तारपा महोत्सवाचे !
                 प्रस्तुत स्थळी जेव्हा प्रवेश केला तेव्हा प्रथम तर डोळ्यांवरती विश्वासच बसेना ,कारण हजारोंच्या  संख्येने लोटलेला जनसागर आणि त्यात घुमणारा ताराप्याचा सुर…! हे दृश्य निदान मी  तरी पहिल्यादांच पाहत होते . शाळकरी मुलांपासून ते क्लास १ ऑफिसर पर्यंत आणि शेंबड्या पोरांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कुणीही स्वताला या महोत्सवात सामील होण्यापासून रोखु शकले नव्हते .
                मग आमची आयुशची टीम पण मागे कशी राहणार … ?आदिवासी युवा शक्ती - आयुश ची टीम महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सकाळीच मोठ्या उत्साहाने प्रस्तुत स्थळी हजार झाले ,मग वारली चित्रकलेची दुकाने सजवण्यापासून ते 'वारली आर्ट सेशन ' मध्ये भाग घेण्यापर्यंत टीमचा उत्साह ओसंडून वाहत होता . या वेळेत आपल्या वारली तरुण चित्रकारांनी एक नवीन ट्रेंड सुरु केला तो म्हणजे taoo गोंदवून देण्याचा! शरीरावर tatoo गोंदवणे काही नवीन नसले तरी ,या tatoo मध्ये वारली चित्रकलेतील चिन्हांचा वापर करून नवीन fashion चा शुभारंभ आमच्या वारली कलाकारांनी केला . आणि त्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .
              या महोत्सवात आयुश टीमच्या सर्व वारली चित्रकारांनी आपापली चित्रकला व हस्तकलांचे प्रदर्शन भरवले होते ,हस्तकला वस्तू ,वारली चित्रकला ,बांबू आर्ट यासारख्या इविध वस्तू या प्रदर्शनात विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या. आमच्या या दुकानांना या तीन दिवसात  हजारोंच्या संख्येने आलेल्या सर्व पर्यटकांनी तसेच बऱ्याच विदेशी पर्यटकांनी सुद्धा भेटी दिल्या . पर्यटकांची वारली चित्रकलेबद्दलची उत्सुकता व पसंती हि खरेच वाखाणण्याजोगी होती ,प्रत्यक्ष पेंटीग शिवाय विविध वस्तूंवर वारली कला साकारलेल्या वस्तूंकडे स्त्री वर्गाचा  कल जास्त दिसून येत होता . यामध्ये शोभेच्या वस्तू ,दागिने तसेच कपड्यांवर केलेल्या वारली कलेला खूप मागणी असल्याचे दिसून आले ,हि आपल्या कलाकारांसाठी खूप महत्वाची बाब आहे . आमच्या कलाकारांनी आलेल्या पर्यटकांना कलेबद्दलची माहिती व योग्य मार्गदर्शन करून आदिवासी कलेचा प्रसार करण्याचे उत्तम कार्य केले . .
             खरे पाहता ते तीन दिवस आम्ही खऱ्या अर्थाने 'आदिवासी 'म्हणून जगलो ,तारपा नृत्यावर मनसोक्त ठेका धरून नाचण्याचा मोह तर आम्ही कसाबसा आवरला ,परंतु मन मात्र 'भिंदोडत … भिंदोडत… 'करतच होते .
             तीनही दिवस आपल्या आदिवासी स्त्रियांनी बनवलेल्या अस्सल 'tribal food ' पुढे आजचे पिझ्झा बर्गरही कस्पटासमान वाटू लागले आहेत ,विविध भागातून आलेल्या आपल्या आदिवासी बंधुभागीनींनी सादर केलेली नृत्ये व त्यातील थरारक कसरती पाहून तर एखादा action पटसुद्धा फिक्का वाटावा !सर्व वातावरणाच जणू 'आदिवासिमय' झाले होते.  कधी नव्हे तेव्हडा उत्साह व अभिमान आदिवासींच्या डोळ्यात अवतरला होता .
              संपुर्ण जगाला आदर्श घालून देणारी व साधी परंतु स्वावलंबन शिकवणारी आदिवासी संस्कृती प्रत्यक्ष अनुभवली व आदिवासी असण्याचा अभिमान डोळ्यात अवतरला ,कारण तसे आपल्यासारख्या सुशिक्षित आणि स्वतःला mordenसमजणाऱ्या आदिवासी जनतेला हे सर्व नवीनच ,नाही का …?
              परंतु मोठ्या प्रमाणावर एकत्र जमलेल्या आदिवासी तरुणाईने घेतलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहुन आपली संस्कृती नक्कीच जपली जाईल ,अशी अशा वाटू लागली आहे .
      एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या सौजन्याने आयोजित या तारपा महोत्सवाचे हे प्रथम वर्ष !डहाणू परिसरात आदिवासी भागात पर्यटनाचा विकास व्हावा,व आदिवासी संस्कृतीची ओळख सर्व दहानुकारांना व्हावी हा या मागचा उद्देश ! 
      एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे तत्कालीन प्रकल्पाधिकारी मा. श्री. शैलेश नवाल यांच्या सुंदर कल्पनेतून साकारलेल्या या तारपा महोत्सवामुळे डहाणू परिसरात पर्यटनाचा विकास होण्यास नक्की हातभार लागेल . 
       खरेतर आम्हाला आमचीच संस्कृती अनुभवायला महोत्सवात जावे लागतेय हीच मोठी खेदाची बाब आहे . कारण आपली संस्कृती हि आपल्या दैनंदिन जीवनातुन प्रकट होत असते ,ती आपण रोज जगायला व अनुभवायला हवी ,त्यासाठी चतुर्थी व एकादशीची गरज नसते.  असे असूनही आपल्या उत्सवाचे प्रतिक समजल्या जाणारा  'तारपा नृत्य 'पाहायला आज आपल्याला u tube वर सर्च करावे लागत आहे . 

      हि परिस्थिती आपल्यासारख्या शिक्षित पिढीमुळेच  निर्माण झाली आहे . आपल्या पूर्वजांनी जपलेला सांस्कृतिक वारसा जपण्यास व तो आपल्या पुढच्या पिढीला देण्यास आपण असमर्थ ठरलो आहोत,कारण आधुनिकीकरणाच्या नावाखाली व सांस्कृतिक मुल्यांची ओळख न करून घेता ,आपण भलतीकडेच भरकटू लागलो आहोत , व यामुळेच आपल्याला आपलीच संस्कृती तुच्छ वाटू लागली आहे .
     परंतु हीच महान संस्कृती अभ्यासायला जेव्हा पांढरपेशी व विदेशी लोक येतात,तेव्हा मात्र आम्हा सुशिक्षितांना (?) प्रश्न पडतो कि, "ज्या संस्कृतीचा आदर्श आज जगात घालून दिला जातोय ती संस्कृती नाकारणारे आम्ही  खरेच सुशिक्षित आहोत का… ? हा प्रश्न पडू लागला आहे. 
         म्हणता म्हणता ते तीन दिवस संपलेही ,आणि हा तारपा महोत्सव आम्हा शिकलेल्यांना खूप काही शिकवून गेला 
    कल्पना प्रत्यक्षात कशा उतरवता येतील यांचे उत्तम उदाहरण मा. श्री. नवाल यांनी घालून दिले. त्यांच्या या कार्याबद्दल आयुषच्या संपूर्ण टीमतर्फे अभिनंदन व खूप खूप आभार !
                    हा महोत्सव असाच चालू राहावा, असे वाटत असतानाच नाईलाजाने त्याला निरोप द्यावा लागला.परंतु येणाऱ्या तारपा महोत्सवाची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय ,निदान या निमित्ताने तरी समाजापासुन भरकटत चाललेल्यांना 'आदिवासी 'असण्याचे महत्व कळेल !

Sanchita Satvi 

Find us on Facebook